राव

"राव" !
पुण्यात जनरली वापरला जाणारा शब्द. जो जन्मानं पुणेकर असतो केवळ तोच सराईतपणे आणि सहजपणे याचा प्रयोग करू शकतो... आणि त्यानेच करावा... तो पण गरजेच्या ठिकाणी...
बाहेरच्या लोकांसमोर वापरला नाही तरी कळतं !
...
बाकीच्यांचं कसं असतं ?
पुणेरी मराठीला विशिष्ट स्टँडर्ड असतं. त्यामुळे बरीच मंडळी "आपण लै हुश्शार" दाखवण्यासाठी पुणेरी टोनची कॉपी करत असतात. एखाद दुसरं ध्यान पुण्यात दोन तीन दिवस राहून गेलं की किंवा पुण्यातल्या नातेवाईकाबरोबर फोनवर बोललं तरी आपली हुशारी राव राव करून दाखवतं.. म्हणजे ओढून ताणून...
आज खूप थंडीय राव...
मला बोअर होतंय राव...
उ. ठा. ची काल कित्ती मस्त घेतली राव...
वगैरे...
..
ते कितीही बोललं तरी ओढून ताणून म्हणल्यासारखं वाटतं...
आपण राव राव केलं तर लोकं आपल्याला पुण्याच्या गणतीत धरतात असा गोड गैरसमज करून...!
...
मराठवाड्यात राहणारी एक मैत्रिण माझ्याशी बोलतांना हे राव राव लाऊन बोलत होती... तिची मैत्रिण पुण्यात राहून आलेली, ती तिच्याशी तसं बोलायची तर सवय झाली... वगैरे !
मराठवाडी टोन मूळातच गोड, त्यामुळे ओरीजीनल ऐकायची सवय असल्यानं असं ओढून ताणून राव राव ऐकून मळमळ व्हायला लागली...
अगदी "तेजू खूप थंडी वाजायलीनं...राव"... ऐकुन
चक्कर चक्कर होणं सुरु झालं...
मग उद्रेख झाला....
ए गपे... नीट बोल... हे असं ओढून ताणून बोलशील तर फोन फेकून मारेल...
नंतर पुन्हा राव शब्द तिच्याकडून ऐकायला मिळाला नाही...
..
असं ओढून ताणून राव राव करणाऱ्यांच्या अंगावर भर थंडीत फ्रिजमधलं पाणी ओतायची इच्छा होते...
..
राव राव करुन कुणी पुण्याच्या गणतीतही धरत नाही...
ते सेल्समन, मार्केटींगची पोरं सूट घालून मानेला झटके देत ओढून ताणून पोलाईटनेस, शुद्ध भाषा, मॅनर्स वगैरे दाखवत प्रोडक्ट विकायचा प्रयत्न करतात तसं काहीसं वाटतं...
त्यांच्याही अंगावर भर थंडीत फ्रिजमधलं पाणी ओतायचंय...!!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved