साडेसाती आणि मी

=साडेसाती आणि मी=
..
आज संध्याकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी शनीमहाराज धनू राशीत जातील आणि तूळ रास... म्हणजे मी... फायनली साडेसातीतून सुटेल...
साडेसात वर्षांचा बांबू फायनली निघेल...
वयाच्या साडेसोळाव्यांत, साधारण २००९ च्या मध्यावधीत शनीमहाराजांची एंट्री झाली, तो साडेसातीचा फेरा फायनली आज सुटतोय...
...
तेजा... तू हे सगळं मानतोस ?
- तर हो.. नक्कीच मानतो... १०० टक्के !
ते कसं ?
- जर हा साडेसात वर्षांचा काळ बघीतला तर मी सॉलीड भोसडला गेलोय... तगडे तडाखे बसलेय... आणि जितकी लायकी तितकंच मिळालंय...
आणि पटतंय !
..
माझ्या हातून जे जे काही बरं वाईट घडलंय, ती प्रत्येक गोष्ट माझ्यावरच उलटलेली,  त्या प्रत्येक गोष्टीची आठवण झालेलं मी अनुभवलंय !
आयुष्याच्या इच अॅन्ड एव्हरी थिंगवर फोकस होतो... लक्ष जातं.....
.
अनुभवाचे बोल...
साडेसाती नुकसान करते ? -
- नाही.. पण, अपेक्षेच्या उलटं घडतं, लायकीतलं मिळतं हे खरं...
साडेसाती भरभराट करते ? -
- बिलकूल नाही... तेच, लायकीतलं मिळतं...
थोडक्यात -
साडेसाती आपल्याला आपली जागा, लायकी दाखवते !
...
हा पूर्ण काळ डायरीत आहे तो रिवाइंड केला तर एक जाणवलं,
ऑलमोस्ट प्रत्येक दिवस हा अॅवरेजली शून्य होता..
एकीकडे फार मोठं, फार चांगलं घडलं तर दुसरीकडे त्याचं प्रतिबिंब तयार असायचं. काहीतरी नवीन टेंशन...
अगदीच वाईट - अगदीच चांगलं असं नाही... पण न्यूट्रल !
.
सुरुवात झाली तीच एका मोठ्या तडाख्याने... आणि तेव्हा बसलेला तो तडाखा ऑलमोस्ट आजपर्यंत पुरलाय ! प्रत्येक गोष्ट बरोबर त्याठिकाणी घूटमळते...
शिक्षण, करीयर, आयुष्य, नाते, आणि तब्येत या सगळ्यांत सोपं असूनही प्रचंड स्ट्रगल पुरलंय...
आपोआप घडत जातं....
रोज नवीन लेसन मिळाला.
.
साडेसाती आयुष्य ठिकाणावर आणते... हे अगदी खरं आहे...
आपण पतंग असतो, खूप उडतो... पण दोरा जितका तितकंच. कधी खाली येतो, कधी वर जातो... पण कंट्रोल्ड असतो.
.
आपण एकटे असतो
आपण स्वतःला ओळखतो...
आपलं कोण, कोण नाही हे कळतं....
आणि सहनशक्ती येते...
..
ते झतूरा सिनेमा माहितीय कां ?
त्यात ती भावंडं एक गेम खेळतात,
त्या गेममधून प्रचंड अडचणी उद्भवतात, त्रास होतो, पण ते शांतपणे खेळत जातात, अडचणींवर मात करतात...
कारण त्यात लिहीलेलं असतं
"गेम के अंत मे सब पहलेजैसा हो जाऐगा"... आणि सगळं फिरुन फारून ते तिथेच येतात जिथे होते....
काहीच झालं नाही असं... !
त्या अडचणींतही मदत करणाऱ्या गोष्टी तो गेमच पुरवतो... !
साडेसाती डिक्टो तेच आहे...
साडेसात वर्ष गेम टाईम...
आपण प्लेयर !
एकदा सुरु तर पुर्ण खेळल्याशिवाय परत येता येत नाही,
डाव आपले आपणंच खेळायचे... !
...
अडचणी आल्यात, खूप त्रास झाला, रडू रडू जीव झाला... पण त्यावर मार्गही सापडले....
...
साडेसाती अख्खं ब्रह्मांड दाखवून शेवटी तिथेच आणून ठेवते !
शून्यावर... !
उद्यापासून जे होईल तो रिजल्ट +ve, -ve....! ते आपलं आपल्या हातात....!
पण मज्जा आली हे मात्र खरं !
....
गेल्या अडीच वर्षांपासून खूप आतुरतेने या दिवसाची वाट बघीतली... ! फायनली, आलं !
सुटलो !
मानो या ना मानो...
साडेसाती आहे.... ही निसर्गाची रचना आहे !
ती महत्वाची पण आहे !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved