Om Puri RIP

ओम पुरी यांचं निधन !
.
सलग दोन दिवस दोन सिनेमे एकाच अभिनेत्याचे पाहिले की पूर्णपणे वेगवेगळ्या भूमिका बघून आदर दुणावतो. सलग दोन दिवस परेश रावलचे 'सरदार' आणि 'हेराफेरी' बघितले की हे होतं.
सलग दोन दिवस ओम पुरीनाही असाच बघितला. एके दिवशी 'चायना गेट' मधून नुसत्या नजरेच्या धाकातून साक्षात अमरीश पुरीला जरबेत ठेवणारा ब्रिगेडियर पुरी आणि दुसऱ्याच दिवशी टीव्हीवर 'चाची ४२० ' मधला त्याच व्यक्तिमत्वाच्या अमरीश पुरीचा लोचट आणि लाचार असिस्टंट.
अर्धसत्य, तमस, घायल, नरसिम्हा, किंवा अगदी 'ओह माय गॉड' अथवा 'दुल्हन हम ले जायेंगे' सारखे टुकार सिनेमे. अगदी शाहरुख खानचा डॉन. अफाट अफाट अफाट.
'भारत एक खोज' मध्ये औरंगजेब (आणि 'शिवाजी' नासिरुद्दीन शाह, अफलातून)
.
... धूप, चायना गेट, अर्ध सत्य, आक्रोश सारख्या अनेक असामान्य चित्रपटात त्यांनी नितांतसुंदर गंभीर भूमिका साकारली होती...
तर चाची ४२०, मालामाल विकली, हेरा फेरी मध्ये हलका फुलका रंग भरला...
त्यांच्या निधनाने अभिनयाची जाण असलेला माणूस गमावला...
... ओम पूरी श्रेष्ठ निवेदक, अभिनेता होते... खर्जातला गंभीर आवाज, सहज अभिनय ही त्यांची खासीयत होती...
.
. ओम पूरी राजकारणावर हक्काने बोलायचे...
... आयुष्याच्या शेवटी शेवटी एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यांचा कंट्रोल सुटला. दुर्देवाने ती त्यांच्या आयुष्यातली शेवटची चूक ठरली. आणि त्या एका वाक्याने त्यांचं आयुष्य संपवलं... डाग लावून घेतला...
जर ती चूक झाली नसती तर त्यांच्या अनेक भूमिकांची पर्वणी आपल्याला मिळाली असती....
.
... मृत्यूनंतर वैर संपतं, चूक संपते... त्यांच्या मृत्यूने त्यांची ती चूकही संपली...
..
आपल्यातून एक असामान्य दिग्दज, माणूस निघून गेला हेच सत्य ! अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाही...!
भावपूर्ण श्रद्धांजली !
.
- त्यांच्या भूमिकांचा डायहार्ट चाहता ... तेजस कुळकर्णी
हॅट्स ऑफ मॅन, हॅट्स ऑफ. अखेरचा सलाम.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved