ती सध्या काय करते ?

"ती सध्या काय करते ?"
यावर झक मारी करत बसायला वेळ आणि इच्छा दोन्हीही नाही...
कारण तशी कुणी "ती" कधीच नव्हती... !
दहावी पर्यंत बॉईज स्कूल,
तोपर्यंत हे असलं काही असतं हे डोंबल पण माहीत नव्हतं..
नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर बारावीचं ९०% चं टार्गेट, सीईटी या भानगडीत कुणी ती कडे बघायला वेळ नव्हता...
पुढे एम वन टू एम थ्री विथ प्रोग्रॅमिंग च्या आकंठ प्रेमात बुडालो होतो, ... दिसायला वगैरे बरा असलो, तरीही माझ्या तुसड्या, फटकळ  स्वभावामूळे माझ्यावर क्रश असूनही बऱ्याच पोरींनी बोलायची हिम्मत केली नाही... असे मेसेजेस आत्ता मिळतात...
बरं केलंत !
..
नंतर मला माझी "ती" भेटली...
माझी कंपनी... !
तीच माझी जान वगैरे... जी आयुष्यभर सोबत असेल...
स्वतःचा व्यवसाय, त्यामुळे सकाळ ते रात्र मी त्यातच असतो...
मैत्रिणी, दिदी वगैरे पण "तेजा, तुला वेळ नसतो" ची पिंगाणी वाजवतात... मित्र बिचारे समजून घेतात, गप्प बसतात...
बाकीच्यांची चिडचिड
बरोबर असेलही - नसेलही..
...
पण, आता जी मुलगी येईल तीच आयुष्यभर राहील...
...
याव्यतिरीक्त...
दुसरी "ती"
असती तरी,
वेगळे झाल्यानंतर
तिच्याकडे ढुंकूनही पाहीलं नसतं,
इथून गेली - संपली... ती तिकडे गोंधळ घालू दे...
ते झुरणं वगैरे गोष्टींच्या भानगडीत आपण नै... आय मीन, नसतो !
दुनिया गोल है... सिर तो टकराएंगे...
टकरा देनेका - बाद मे भूल जानेका...
इतना दिल पे नई लेने का रे बाबा...
बाय द वे - तसं काही नव्हतं, नाहीय हा भाग वेगळा...
..
बाकी ठिक... !
.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved