इच्छेला मरण नसतं... :-P

जुन्या अल्बममध्ये हा फोटो सापडला...
२००७, साधारण ९ - १o वर्षांपूर्वीचा फोटो आहे. दिल्लीला लाल किल्ल्यावर गेलो होतो. मी, पप्पा आणि मम्मा पुढे चालत होतो, तुषारने कोडॅक कॅमेरात नकळत क्लिक केला...
...
नेहरू कुर्ता, तेव्हापासूनच असलेली (शारीरीक) उंची आणि अगदीच गर्दी नसलेल्या लाल किल्ल्याकडे स्वतःला रुबाबात जातांना पाहून खूप छान वाटतंय...
...
काही गोष्टी या नकळत भव्य होतात, छान होतात... हा फोटो त्यातलाच एक...
या फोटोचे अर्थ जुळवायला खूप जूळतील...
पण,
तेव्हा जाणवलं नाही ते आत्ता जाणवलं...
...
Don't mind...
आत्ता एका क्षणासाठी मी स्वतःला "नमो" फिल केलं... :-P
रुबाबात भाषण द्यायला जातोय वगैरे... :-D :-D :-D
...
इच्छेला मरण नसतं... :-P
...
(एकदा स्पेशल रिक्वेस्टवर, सेटींग लाऊन मुंबईच्या मंत्रालयात सीएमची केबीन, ती खुर्ची बघायला गेलो होतो. ते नव्हते तिथे... पण तेव्हा माझी त्या खुर्चीवर बसायची खूप मनापासून इच्छा झाली होती, मी स्वतःला तसं फिल पण केलं... पुर्ण किस्सा नंतर कधीतरी सांगेन....)...
...
तुर्तास इतकंच !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved