शेवटची ७ मिनिटं...
शेवटची ७ मिनिटं...
मृत्युनंतर माणसाच्या मेंदूत चालणाऱ्या घटनांवर एक चांगलं आर्टिकल वाचत होतो. अध्यात्मिक वगैरे नव्हतं. अगदी शुद्ध वैज्ञानिक होतं.
बऱ्याच शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे किंबहुना त्यांचा असा अभ्यास आहे की माणसाच्या मृत्युनंतर सात मिनिटं त्याचा मेंदू काम करत असतो. त्या सात मिनिटात मेंदू त्याचं सर्व आयुष्य रिवाईंड करून दाखवतो. स्वप्न पडावं तसा काहीसा प्रकार असतो हा.
साधारणपणे स्वप्नं हि विअर्ड असतात. एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या घटना स्वप्नात दिसतात. मात्र ह्या शेवटच्या सात मिनिटात मेंदू काहीही विचित्र दाखवत नाही. जे काही घडलं ते तसंच्या तसं दाखवतो, अगदी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये!
काय दाखवत असेल ना मेंदू माणसाला?
प्रत्येकाचा वेगळा फ्लॅशबॅक, वेगळ्या घटना!
कुणाचं सुखी लहानपण, कुणाचे कळकटलेले दिवस...
कुणाची मुजोरी, कुणाची लाचारी...
कुणी उत्कट केलेलं प्रेम, कुणी विनाकारण केलेला द्वेष...
कुणाची पूर्ण झालेली स्वप्नं, कुणाच्या चुरगळून गेलेल्या आशा...
कुणी गाठलेली उंची, कुणाच्या वाटेला कायमच आलेला खुजेपणा...
कुणी पसरवलेला चांगलेपणाचा सुवास, कुणाच्या नजरेतला हलकटपणा...
कुणाचे अत्युच्च आनंदाचे क्षण, कुणी आयुष्यभर गर्तेत केलेली गोताखोरी...
कुणाला केलेली मदत, कुणी ठरवून केलेली फसवणूक...
कुणाकडे असणारं मार्दव, कुणाचा असल्यानसल्या सगळ्याचा दर्प...
समाजाकडून काही घेतलेलं, समाजाला काही दिलेलं...
समाधानाचे छोटे दिवस, दुःखाच्या मोठ्या रात्री...
असं आणि अनेक...
हे सगळं सगळं मेंदू दाखवत असेल का? आणि तेही ऑब्जेक्टिव्हली दाखवत असेल? की त्यालाही आयुष्यभरासाठी आपणच जोडलेला आपला पॉईंट व्ह्यू असेल?
ज्या मेंदूचा मानवजातीला अभिमान असतो, ज्याच्या जोरावर माणसं आपला टेम्बा मिरवतात तोच मेंदू शेवटच्या क्षणाला शाळेत बाकावर उभं केल्यासारखं समोर उभं करून आयुष्याचा लेखाजोगा तटस्थपणे वाचून दाखवत असेल.
आणि त्यावेळी निःशब्द निश्चल निपचित पडलेल्या देहाकडे, बुद्धीकडे मूक साक्षीदार असण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नसेल...
पॉईंट ऑफ नो रिटर्नवर शरीर, मन आणि बुद्धी पोचलेले असतील...
फळ्यावर लिहिलेला एखादा धडा वाचून झाला की डस्टरने तो पुसून टाकावा तसं काही सातव्या मिनिटाला होत असेल...
त्यानंतर कदाचित पुन्हा एकदा नवीन प्रवास आणि नवीन वर्ग!
-
साभार !