भांडणपुराण - भाग १

बऱ्याचदा, समोरचा माणूस नेमकं काय सांगतोय, त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे कि नाही हे न विचारता, न बोलता, रॅदर न बोलू देता एकतर्फी मताने निर्णय घेऊन झटक्यात काहीतरी स्टेप घेतली जाते... आणि तितक्याच वेगात संपर्काची साधनं खंडीत केली जातात...
माझं झालं - तू तूझं तूझ्याजवळ ठेव सारखं...!!
वर वर दिसायला हे सोप्पं वाटलं तरी
अशी लोकं सोबत ठेवणं नेहमी धोक्याचं असतं...
कारण कधी काय पाऊल उचलतील हे सांगता येत नाही...
एका मर्यादे नंतर त्या व्यक्तीविषयी आदर, ओलावा, काळजी संपून भिती, नकारात्मकता याच गोष्टी बळावतात आणि त्या नात्याचा प्रवास अंताकडे सुरु होतो...
...
वाद घालायचेत... नक्की घाला. पण बरोबरीची संधी द्यायला हवी... म्हणजे तुझं संपलं की माझी बाजू ऐकून घ्यावी लागेल... वाद अर्धवट सोडून निघून जाणं आणि नंतर दुसरी बाजू न ऐकता निर्णय घेणं म्हणजे आत्मघातकी ठरतं ... अशी माणसं विघ्नसंतोषी असतात... प्रामाणिक तर बिलकूल नसतात..
..
वाद घालून ते निर्णायक अंतापर्यंत नेले तर त्याचं महत्व राहतं... ते पण निर्णय पक्का... धर तर धर - तोड तर तोड... विषय संपतो... निकाल लागतो ! अर्धवट, मोघम राहीलं तर आधी खदखद नंतर किळस राहते...
आणि ते नातं वाईट प्रकारे शेवटाकडे जातं..
..
अश्या प्रकारच्या भांडणात पूर्वी न सांगता समोरून निघून जाणं, घरातून निघून जाणं, घर बदलवणं वगैरे व्हायचं... आता ब्लॉक करणं, फोन ऑफ करणं वेग्रे होतं.. !
...
भडभड बोलून एकदाच सोक्षमोक्ष लावणारे लोकं मात्र सुखी असतात हे ही तितकंच खरं ...
..
- तेजस कुळकर्णी
#भांडणपुराण - भाग १

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved