RIP Vinod Khanna

अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन !
द बर्निंग ट्रेन, अमर अकबर ऍंथोनी यातल्या त्यांच्या भूमिका अप्रतिम होत्या.
चांगला माणूस गेला.
कॅन्सरने घात केला...
...
अश्या सुपरस्टार रांगड्या माणसाला आजारात खितपत पडलेलं बघवत नव्हतं... सुटका झाली बिचाऱ्याची..
भावपूर्ण श्रद्धांजली !
...
हम तुम्हे चाहते है ऎसे
मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे
#विनोद_खन्ना
....
प्रिय विनोदजी
अनेक दिवसांपासून तूम्ही आजारी होतात.
आज जातो, उद्या जातो
अशी मृत्युला सतत हुलकावणी देत देत
शेवटी 'हलचल' माजवून आज 'अचानक'
तूम्ही आमच्यातून निघून गेलात...
आज तुमच्या अशा निघून जाण्याने
'अमर, अकबर, अँथोनी'
'इना मीना डिका'
आणि
'रेश्मा और शेरा' देखील
नक्कीच हळहळले असतील!
जन्माला आलेला प्रत्येकजण शेवटी जाणार
हा जरी 'कुदरत' चा 'फैसला' असला,
तरी 'एक्का, राजा, रानी' चा
प्युअर सिक्वेंस दाखवून
खेळ अर्धवट सोडून
तूम्ही असं निघून जायला नको होतं!
शेवटी आपल्या आयुष्याचा 'लगाम'
वरच्याच्या हातात आहे हेच सत्य आहे!
चित्रपटसृष्टितले आमचे जेवढे म्हणून
'मेरे अपने' होते
त्यात तूम्ही अभिनयातला एक 'उस्ताद' होतात...
तेंव्हा, तुमचा वेगळा 'परिचय' करून देण्याची
गरज आहे, असे मला तरी वाटत नाही!
'खुदा कसम' तुमच्या अभिनयाची 'ताकत'
हीच तुमची 'अलग' अशी 'पहचान' होती.
आणि त्यात आम्ही कधी 'कैद' झालो
ते आमचं आम्हाला कळलंच नाही बघा !
तुमच्या अनेक सुंदर सुंदर सिनेमांवर
आमची सांस्कृतिक 'परवरिश' झाली!
'खून पसीना' एक करून आणि
कोणतीही 'हेरा फेरी' न करता 
तूम्ही अनेक सिनेमे मिळवले
आणि या क्षेत्रात
तुम्ही 'मुकद्दर का सिकंदर' ठरलात!
शेवटी कॅन्सर हा रोग तुमच्या जीवनाचा
'हत्यारा' बनला, कॅन्सर ही व्यक्ती असती
तर तिच्यावर 'आखरी अदालत' समजून
मी नक्की 'मुकदमा' लढवला असता!
अभिनयातली तुमची 'हाथ की सफाई' आणि
तुमच्यासारख्या देखण्या 'युवराज' ला बघून
कित्येक तरुणींचे तूम्ही 'मन का मीत' बनलास!
कित्येक जणीनां 'प्यार का रोग' जडला.
तूम्ही ओशोंच्या नादी लागलात, असा एक 'आरोप' वारंवार तुमच्यावर झाला, आजही होतोय!
'लेकिन' ओशो ही काय नशा आहे
हे फक्त आणि फ़क्त तूम्हीच जाणत असाल...
या 'इंसानियत के देवता' च्या आयुष्याचा शेवट
अशा दुर्धर रोगाने का व्हावा?
'टेल मी ओ खुदा'..... !
- साभार

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved