Mahaveer Jayanti

महावीर, तथा वर्धमान हे जैन समुदायाचं आद्य दैवत. जैनांमधले २४ वे तिर्थांकर. इश्वाकू कुळात सिद्धार्थ आणि त्रिशला यांच्या पोटी  कुण्डवपूरला त्यांचा जन्म झाला... तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वी... ! इ. स. पू ५९९  मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी दिगंबर संन्यास घेतला आणि साडेबारा वर्ष तपसाधना करून ज्ञान प्राप्त केले... त्यांनी सत्य, अहिंसा, अपरीग्रह, अयौर्य, अस्तेय चा पाठ दिला ...
...
जैनांमध्ये असलेली साधु - साध्वी - श्रावक - श्राविका ही रचना महाविरांचीच आहे... जगातले सगळे प्राणीमात्र समान आहेत, त्यामुळे सर्वांप्रति समभाव असावा यासाठी त्यांनी उपदेश केला... जगा आणि जगू द्या... या साध्या सोप्या तत्वावर जैन समाज उभा आहे...
...
जैनांविषयी आदर कां ?
धुळ्यात, एकदा आमच्या घरासमोरच्या जुनाट पडक्या वाङ्यात एक कुत्रं अडकून पडलं होतं. ज्याने तब्बल तीन दिवसांनी दर्शन दिलं. त्याआधी त्याच्या रडायचा आवाज येत होता. पण नेमकं कुठे ते कळत नव्हतं.
तीन दिवसांनी त्या वाड्यात ते कुत्र असल्याचं समजलं... खंगलेलं - उपासमार झालेलं... अर्धमेलं...!
ते त्या बंद वाङ्यात गेलं कसं यापेक्षा त्याला काढू कसं हा प्रश्न होता. आम्ही त्याला दाराच्या फटीतून पाणी - पोळी वगैरे दिली.. पण जर आजच्या आज ते निघालं नाही तर उद्याचा दिवस ते कुत्रं बघणार नाही हे कळलं होतं... कारण ते घाबरलेलं, तीन चार दिवस उपाशी - त्यामुळे त्राण गेलेलं... ते कुत्र त्या पोळीपर्यंत येत येत गचकेल की काय अशी अवस्था होती...
वाडा उघडावा तर मालकाचा पत्ता नाही...
"दया तोड दो दरवाजा" च्या धर्तीवर "तेजा तोड दो दरवाजा" ..
पण दरवाजा तगडा - जुना - जड असल्याने पाच डोकी लावूनही तो तुटेना... दरवाजा तोडता तोडता आपल्यातलाच एखादा कुत्र्यासारखा होवू शकतो याची कल्पना आल्यानं तो नाद सोडला...
...
जुगाड करुन त्या मालकाचा नंबर मिळाला...
मी त्या वाड्याच्या मालकाला फोन केला. (त्यांनी ती जागा चार महिन्यांपूर्वीच घेतलेली, आणि फोनवर कळलं ते पुण्यात मुलीकडे जाऊन बसलेत... तो अवे ? )
त्या माणसाला पूर्ण हकीकत सांगितली...
मी -  माणसं लावून दार तोडू कां ? सगळे मिळून भरपाई देवू ?
तो - हा चलेगा, ... पर कुलकर्नी साब, अंदरका जो डोअर है वो नही टूटेगा क्यो की ग्रिफ ही नही है...  चाबीही लगेगी.. आप ट्राय करो... कोई वांधा नही... मै निकलता हूँ  .. पर मेरे आनेतक नही खूला तो प्लिज वो कुत्तेको रोटी और पानी देते रहीये...
...
तो माणूस त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी ३५० किमी यायला निघाला .... ९ तासांचा प्रवास करून ....
...
आम्ही दार उघडण्याचे प्रयत्न केले, पण फेल !
...
मध्ये मध्ये त्या माणसाचे कॉल्स येत होते....
....
सकाळी ७ ला सुरु झालेल्या कार्यक्रमाचा क्लायमॅक्स संध्याकाळी ६ वाजता झाला... ७२ वर्षीय माणसाचं आगमन झालं, ९ तासाचा प्रवास फक्त तो जीव वाचवण्यासाठी... त्यांनी ते घर उघडलं, त्या कुत्र्याला बघून शांततेत समोर गेले, पोळी दिली पाणी दिलं आणि त्या कुत्र्याची माफी मागितली.... खाणं वगैरे झाल्यावर ते कुत्रं उघडं दार बघून धूssम पळत सुटलं....
....
सगळ्यांच्या जीवात जीव आला...
त्या जैन आजोबांनी आमचे आभार मानले,
खरं तर ती वेळ त्यांच्या भूतदयेविषयी आम्ही कृतज्ञ होण्याची होती...
" परस्परोपग्रहो जीवानाम् "
जीवांचे एकमेकांवर उपकार आहेत...!
...
नकळतही घडलेल्या चुकांसाठी माफी मागायची सुंदर पद्धत याच परंपरेत दिसते... !
यांच्यापासून खूप शिकायला मिळतं...
...
जैन धर्मियांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...
जय जिनेन्द्र... !
- तेजस कुळकर्णी
#JaiJinendra #MahavirJayanti #Jain

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved