RIP Kishori Amonkar

आमच्या घराच्या अगदी जवळच रामाचं जुनं मंदिर आहे... रामनवमीच्या काळात तिथे रोज सकाळ - संध्याकाळ भजनं, शास्त्रीय संगीत होतं, जे माझ्या घरापर्यंत सहज ऐकू येतं... आज पहाटे पाचपासूनच तिथे रामायणातली गाणी, अभंग वगैरे सुरु होतं...
...
साडेपाचच्या सुमारास मला जाग आली, तेव्हा "अवघा रंग एक झाला" चा आलाप घेणं सुरु होतं, तानपूऱ्याचे सूर, आलाप आणि त्यामागचा नितांतसुंदर आवाज.. अगदी उठल्या उठल्या सरप्राईज मिळावं असं काहीसं घडलं... तो आलाप ऐकून बेडवरच थांबलो, डोळे बंद करुन कान - मन त्या आवाजाकडे केंद्रीत केलं, आणि त्या "अवघा रंग एक झाला" च्या अद्भूत संगीतात पहाट समृद्ध झाली... किशोरीजींना मनातून थॅंक्स बोललो आणि खाली गेलो... प्रसन्न मन, सुंदर सकाळ... छान मूड.. !
..
आणि त्या मूडमध्ये असतांनाच रेडियोवर सातच्या बातम्यांत पहिलीच बातमी " जेष्ठ गायिका पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांचं निधन"
एक धक्का बसावा, कुठल्यातरी दुर्देवी योगायोगाचा आपण भाग असावं अशी ती वेळ होती... अर्रर्रर्रर्रर्र... हे काय झालं ? एवढंच निघालं... !
..
देव आपल्या भक्तांना दर्शन देतो,
किशोरीजींनी जाता जाता हा दुर्देवी योगायोग माझ्या नशिबात दिला.
भक्ती करावी अश्या थोड्या लोकांपैकी त्या एक होत्या,
ज्यांना ऐकून ऐकून तयार होतो, ज्यांच्या पायावर डोकं ठेवून आपलं जीवन सार्थकी लागावं अशी इच्छा असते, ज्यांचे सूर प्रत्यक्ष्य कानावर पडले तो क्षण घळघळ अश्रूंनी व्यक्त झाला...
ज्यांची भक्ती करण्याचं भाग्य माझ्या नशीबानं मिळालं अश्या सरस्वतीने जाता जाता योगायोगातून कां होईना पण या भक्ताकडे पाहिलं... फक्त योगायोग दुर्देवी होता...
...
किशोरीजींचं निधन नाही झालं, तर पृथ्वीवरचं अवतारकार्य संपलं... आणि आज त्या स्वर्गात स्वस्थानी परत गेल्या...
कलेला मृत्यू नसतो, ना कलाकाराला...
स्वर्गातले देव त्या त्या रुपात अवतार घेतात आणि कार्य करून परत जातात,
किशोरीजी त्या देवांपैकी एक !
..
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं ।
नको हा वियोग कष्ट होताती जिवासि
दिनु तैसी रजनी मज जाली गे माये ।
अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये
...
ज्यांचा आवाज ऐकून मन शांत होतं,
जे सूर काळजापर्यंत भिडतात
ते सूर शांत झाले...
शास्त्रीय संगीतातली सरस्वती लूप्त झाली...
...
भावपूर्ण श्रद्धांजली...!
...
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved