Hanumaan

हनुमान अष्टचिरंजीवांपैकी एक असल्याची मान्यता आहे. आणि रामेश्वरमजवळ त्यांचे अस्तित्व असल्याचं सांगितलं जातं. आणि त्याबद्दलच्या खुणाही मिळाल्याचे दावे आहेत. विविध कालखंडात हनुमानानी संतांना दर्शन दिलेलं - जसं समर्थ रामदास, रघुवेंद्र स्वामी, सत्यसाई इ.
तुलसीदासांकडून हनुमानानीच गीतरामायण लिहून घेतलं !
...
हा फोटो हनुमानाचा खरा फोटो असल्याचं बोललं जातं. १९८८ मध्ये कुणीतरी भटक्याला हनुमानाची गुहा सापडली आणि त्यांचं दिव्य तेज सहन न झाल्याने त्या माणसाला मृत्यू आला. पण त्यांचा सहकारी कॅमेरा घेऊन पळाला असंही ऐकलंय.
.
खरं खोटं हा भाग वेगळा - पण हनुमान प्रत्यक्ष्यात असतील तर, त्यांचं मन काय विचार करत असेल ?
..
- त्यांनी राम, सीता, लक्ष्मण, रावण, भीम, सुग्रीव, बिभीषण इ. यूगपुरुषांना प्रत्यक्ष्य बघितलंय. त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलाय... त्यात जे अमर नव्हते उदा. रावण, भरत, सुग्रीव, नलनील, लव कुश, वानरसेनेतील सहकारी, अंजनी-पवनदेव अश्यांची त्यांना आठवण येत असेल ?
- सत्ययूग, द्वापारयूग - त्या काळची सृष्टी, माणसं त्यांना लख्खं आठवत असेल - त्या आठवणींत ते भावूक होत असतील ?
- सोन्याची लंका, रामराज्य हे त्यांनी प्रत्यक्ष्य बघितलंय, अनुभवलंय... लंकेतलं युद्ध त्यांच्यासमोर झालंय, लंकादहन, द्रोणागिरी पर्वत, रामसेतू, छाती फाडून रामाचं दर्शन, सूर्याकडे उड्डान या घटनांचा नायक ते स्वतः आहेत... आत्ताच्या दंतकथा ऐकून ते काय feel करत असतील ?
- कितीतरी रहस्य त्यांना माहित असतील...
- त्यांच्यासमोर युगं बदलली, प्रत्येक जीवाचा पूर्व - जन्म - अंत - पूर्नजन्म हे त्यांच्यासमोर होत असेल.
- राम, लक्ष्मण, सीता, रावण यांचं प्रत्यक्ष्य रुप, व्यक्तीमत्व हनुमानाला आजही लख्खं माहित असेल...
- त्यांचे समकालीन बिभीषण, वाल्मिकी ऋषी यांना ते भेटत असतील ?
- त्यांचं मन काय विचार करत असेल ?
..
शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न -
कलीयुगात त्यांच्या शक्ती बांधल्या गेलेल्या - युगानुयुगे याच अवस्थेत असणाऱ्या हनुमानांना
कधीतरी "मुक्तीची" इच्छा होत असेल ?
..
काही कल्पनाही विचारांच्या आवाक्याबाहेरच्या असतात...
जय हनूमान...  - तेजस कुळकर्णी...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved