Posts

अर्थसंकल्प 2016

चांगला अर्थसंकल्प . आयकर : स्लॅबमध्ये काहीच बदल नाही. - स्टार्ट अप कंपनीकरता सवलत. ३ वर्षे नफा करमुक्त - 5 लाख उत्पन्नाकरता ३ हजारांची सवलत. - ५ कोटीँच्या उलाढालींना सवलत. - लहान करदात्यांना मोठ्ठा दिलासा. . १. नवीन उद्योजकांसाठी खूप फायदेशीर. स्टार्ट अप करता नोँदणी प्रक्रीया सोपी केली. एक दिवसात परवाना देणार. :-):-) . २. प्रत्येक कुटूंबाचा संयुक्त आरोग्य वीमा ३. चिटफंड करता नवा कायदा ४. डायलिसिस स्वस्त होणार. ५. दुकानांसाठी सातही दिवस वर्किँग. ६. बुडीत सहकारी संस्थांना मदत. ७. शेअर मार्केटमध्ये विमा संस्था लिस्टेड असतील. ८. १६० विमानतळांचा विकास करणार. ९. गृह :  ३५ लाख गृहकर्जावर ५० हजारांची सूट. ६०० चौ. फूट करता सेवाकर माफ. १०. तंबाखूजन्य वस्तू, कपडे, डिझेल कार, सोन्याच्या वस्तू महागल्या. ११. घरं, औषधं स्वस्त. १२. सगळ्या करयुक्त गोष्टीवर ०.५ कृषी कर. :-| १३. मत - सातवा वेतनकरता घाई होतेय.

मराठी राजभाषा दिन

हाय हॅलो नं सुरुवात केल्यावर कुणीही असु देत, मी मराठीतच बोलतो... जास्तीत जास्त मराठीतच लिहीतो... "भावना" शक्यतोवर मराठीतच प्रगट करतो... मग त्या प्रेमाच्या असो वा ठोकायच्या... I Like it, I like you पेक्षा "हे मला आवडलं", तू मला आवडतेस, आणि Idiot, Mad पेक्षा भxx... बोलायला भारदस्त, ऐकायला गोड आणि आतून येतं... एकाच फटक्यात खेळ खल्लास... ! थोडक्यात काय, तर मी मराठीचा जास्तीत जास्त वापर करतो... . कारण मराठी माझी मातृभाषा आहे... त्यामुळे तिचा वापर करणं हा माझा हक्क आहे... . इंग्लीशचं म्हणाल तर, मी दिवसभर कार्पोरेट वातावरणार राहणारं पोरगं आहे... यूएस यूकेच्या गिऱ्‍हाईकांसोबत गप्पा सुरु असतात... पण ते कंटाळवाणं... च्यायला काय सुरुय टाईप मख्खं चेहरा घेऊन बसा... राग आला तर च्युइंगमसारखी इंग्लीश वाक्य फेकावी लागतात, पण अस्सल खान्देशी दोनच शिव्या हासडल्यावर मिळणारं समाधान त्यात नसतं. हिँदी तसं चांगलंच. मराठीसारखं. . आईपप्पांनी मला मराठी शिकवलं, पुस्तकांशी मैत्री करु दिली त्यामुळे मी मराठी बोलू-लिहू-वाचू शकतो. हे खूप उपकार आहेत. . मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छ...

मधुबाला

Image
= मधुबाला = आज तिच्या चिरनिद्रेला ४६ वर्ष झालीत... . 'शापित अप्सरा' या विशेषणाचं करोडो काळजात जिवंत असणारं उदाहरण. तेव्हाच्या सगळ्यांची 'दिल की धडकन'... मुघल ए आजम ची खरी अनारकली फिकी पडेल असं स्वर्गीय रुप... ती आली... तिने पाहिलं... ती जगली... तिने जगवलं... आणि ती गेली... २३ फेब्रुवारी १९६९ ला ऐन भरात ही दंतकथा संपली... . मधुबालाचं बालपण तसं दिल्लीतलं. झगडलेलं... तिच्या नालायक बापाचा प्रभाव आणि त्रास तिला आयुष्यभर भोवला. चार बहिणींत सगळ्यांत मोठी आणि सुंदर बेबी मुमताज... नावाला वलय मिळाल्यावर वेश्यांच्या वस्तीत असलेल्या तिच्या झोपडीवर " ये किसी तवायफ कां घर नही, सुपरस्टार बेबी मुमताझ यहां रहती है " असा बोर्ड लावून तिने स्वतःची ओळख दिली होती. पुढे देविकाराणींनी मुमताजची मधुबाला केली. मुघल ए आजम, महल, चलती का नाम ने ते नाव सगळ्यां ऋदयांवर कोरलं. . मधुबालाचे चित्रपट पाहतांना तीच्या अस्मानी सौंदर्याने लोकांचं ऋदय धडधडायचं... खुर्ची घट्ट पकडली जायची आणि तोंडातून सsss चे हुत्कार सुटायचे... . बापाचा लोभ,  दडपण, कामातले हिंदोळे, नात्यातलं अपयश आणि शारीरीक ...

= विश्वाचे दैवी मूळ =

= विश्वाचे दैवी मूळ = विश्व ही संकल्पना भव्य, उदात्त, अखंड, अमर आणि अनंत आहे. गूढ कधिही न संपणारं रहस्य. आपली पृथ्वी, आकाशगंगा, विश्व, ग्रह, तारे, आकाश, वेळ, देव, काल या प्रचंड गुंतागुंतीचा उलगडा कधीही होत नाही. या आकाशाच्या पुढे काय ? विश्वाचं दार कुठे - अंत कुठे ? त्यापल्याड काय ?... प्रचंड गोंधळ... विचारांची मर्यादा त्यापुढे शून्य आहे... सरतेशेवटी सगळं दैवावर सोडलं जातं. पण दैवाचा जन्म कुठे ? त्याआधी काय ?हे विश्व निर्माणाचा विचार केला तरीही काळाचं चक्र आहेच... येणारा वेळ कुठून येतो ? जाणारा वेळ कुठे जातो... काहीच अनूमान लावू शकत नाही... . मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं ?मूळ आपण स्वतः आहे. प्रत्येकासाठी विश्व, घडामोडी, देव यांचं मूळ, उगमस्थान आपलं मन आहे. आपला भूतकाळ - भविष्यकाळ, शक्ती या आपल्यापासून आहेत. " मन " हेच विश्वाचं मूळ असावं. कारण कुठल्याची गोष्टीची सुरुवात आपल्यापासून होते. शून्यावर आपण असतो. आणि मनातून जन्म झाल्यावरच प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व आपण मान्य करतो. एक विचार करा... जर मी नसेन तर माझ्यासाठी या विश्वाचं अस्तित्व काय ? आपण मेल्यावर आपलं अस्तित्व, आप...

Valentines Day

= सिंगल मित्र मैत्रिणींसाठी = Whats your plan on this Valentine's day ? असं विचारल्यावर बरेच सिंगल मित्र - मैत्रिणी छोटंसं तोंड करून बसतात. ब्रेकअप झालंय यार... किंवा अजून कुणी भेटलीच / भेटलाच नाही रे तेजा... असं ...

RIP Mangesh Padgaonkarji

Image
कविवर्य मंगेश पाडगांवकर गेले... तृणातल्या फुलापासून वादळी वाऱ्‍यापर्यँत, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी हळूवार मनाची, हसतमुख धग शांत झाली... जिप्सी कायम कसा राहील ?  . मंगेश पाडगांवकर... तुम्ही खूप दिलं हो, सगळे खिसे भरुन भरुन दोन्ही मुठांमध्ये गच्च भरलेलं असतांनाही आम्ही तुमच्या कवितांसाठी हापापलेले आहोत... इतक्यात तर कुठे दिवस उजाडलाय. कसं सांगू ?? . शुक्रताराचे सुर पुढे गेले... आज शब्द गेले... चटका लावून गेले...

Gurucharitra Parayan

Image
कालपासून गुरुचरीत्राचं पारायण सुरु केलंय. दरवर्षी हे सात दिवस मला खूप शिकवणारे असतात. स्वत:च्या अनेक गोष्टीँवर ताबा ठेवला जातो.  आणि या सात दिवसात कुठल्याना कुठल्या रुपात दिव्य दृष्टांत मिळतोच. . कालच रात्री स्वप्नात मी गाणगापूरात असल्याचं दिसलं. आणि आज सकाळीच आमचे एक नातेवाईक गाणगापूरला गेल्याचा फोन आला. महाराजांनी स्वत:हून सेवा करुन घेतली... कुठल्या ना कुठल्या रुपानं मी तिथे पोहचलोच. आणि आज दुपारी पहिल्यांदाच मनीध्यानी नसतांना अचानकच "देऊळ बंद" चित्रपट बघायला मिळाला. देऊळ ब ंद चित्रपटात दत्तसंप्रदाय आणि दत्तस्थानांचं अप्रतिम दर्शन दिलंय. आणि महाराजांचं आपल्याकडे कसं लक्ष आहे याचा उत्तम साक्षात्कार दाखवलाय. शहारे येतात अंगावर. . अनुभूती कशाला म्हणतात याची "याची देही, याची डोळा" प्रचिती आली... या सात दिवसांत खूप शांत वाटतं, कितीही टेँशन असू देत - सात दिवस महाराज आपल्याबरोबर असल्याचं पदोपदी जाणवतं.

अखेरचा क्षण मृत्यूचा थंडगार स्पर्श

. काल रात्री माझ्या एका मित्राची नव्वदीतली आजी देवाघरी गेली. नव्वद वर्षांची होती, शरीर पूर्ण गेलेलं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मेंदू आणि वाचा तल्लख होती. तिचा शेवटचा अगदी जीव जायच्या वेळेचा क्षण मला प्रत्यक्ष बघता आला. शेवटचा क्षण कसा असतो, इतक्या वर्षाचं आयुष्य संपत असतं, जे जे माझं माझं म्हणून जमवलं ते इथेच सोडून जायचं असतं, पुढे काय असेल याची एक उत्सुकता अश्या असंख्य भावनांचे काहूर त्यावेळी मनात उठत असावं. त्या आजींच्या शेवटच्या  क्षणाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्यांची वाचा आणि मेंदू शेवटपर्यंत शाबूत होता त्यामुळे नेमक काय होतंय हे जाणून घेण सोप्प झालं.  . शेवट जसा जसा जवळ येत होता तसा आजूबाजूंच्या मंडळींची हुरहूर वाढत होती. संपूर्ण शांत आणि भयाण वातावरण. नकळत कुणाच्यातरी मुखातून हुंदका बाहेर पडायचा. आजीं घरभर नजर फिरवत होत्या. त्यांच्या मुलांकडे, मुलींकडे वैगेरे बघत होत्या. खुणेनेच त्यांना शांत व्हा असा इशारा केला. त्यांच्या मोठ्या मुलाने शांतपणे विचारलं, "काही हवंय का आई??" आजी सगळी शक्ती एकवटून "मी खूप थकलीय आणि मला झोप येतेय" इतकंच बोलल्या, आणि समोरच लावलेल्या ...

कालनिर्णय

Image
"भिँतीवSरी... कालनिर्णय असावे." किँवा "वामनराव, तुमच्या ठणठणीत तब्येतीचं रहस्य काय ?  - नियमीत व्यायाम, बदामाचा शिरा,  पुरेशी झोप,  व्यसन नाही आणि कालनिर्णय आरोग्य... - आता ही कुठली गोळी ? - गोळी नै ओ, कालनिर्णयची खास आरोग्य आवृत्ती... भिँतीवर लावा आणि शड्डू ठोका...!! हा शिवाजी पार्कातला दोन आजोबांमधला सकाळचा संवाद... कडाक्याच्या थंडीचे दिवस असतांना, डिसेँबरच्या सुरुवातीला पहाटे पहाटे पहील्या चहाबरोबर रेडीओवर ऐकू येणाऱ्‍या या दोन जाहिराती सकाळी लवकर उठणाऱ्‍या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतात... मला तर माझी स्कूलटाईम मॉर्निँग आठवते... डिसेँबरच्या थंडीत सकाळी स्कूलबस पकडण्यासाठी उठल्यावर डोळ्यावर अलगद झोप, थोडासा संताप आणि ग्लासभर दूध यामागे बॅकग्राऊंड म्यूजिक भिँतीवssरी कालनिर्णय असावे... हेच असायचं... आणि वामनराव... संपायच्या आत दूध संपवायचं...! . साधेपणा आणि सुटसुटीतपणा या बळावर गेली बेचाळीस वर्ष कालनिर्णय मराठी घरातल्या आणि मनांतल्या भिँतीवर राज्य करतंय. मराठी माणसाची एकादशी-चतुर्थी सारखी नाजूक नस पकडून कालनिर्णयच्या माध्यमातून जयंत साळगांवकरांनी ८.५ मिली. ड...

असहीष्णू

Image
"असहीष्णू :: ये क्या होता है भाई ??" . कालच... ऑफीसच्या गेटवर उभ्या असलेल्या "उत्तर भारतीय" वॉचमनला निघता निघता Happy Diwali केलं... त्यानं मस्त हसून रिप्लाय केलं... त्यानंतर रस्त्यावर, चौकांत ओळखीचे ट्रॅफीक पोलीस भेटले. पाच मिनिटं थांबून प्रत्येकाशी बोललो, शक्य असेल तर सुट्टी घ्या आणि दिवाळी घरी करा असा न मागताच सल्ला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या...  "आमच्या नशीबी कसली रे सुट्टी... धुळ्याहून आलास की घरी ये फराळाला" असं आग्रहाचं निमंत्रणही घेतलं... पुण्याहून धुळ्याला आल्यावर सकाळी उतरतांना ट्रॅव्हल्सच्या ओळखीच्या ड्रायव्हर- आणि "ख्रिश्चन" मॅनेजरनं स्वत:हून Happy Diwali केलं... परत जातांना मिठाई घेऊन ये अशी मागणीही झाली. . आणि आत्ता इतक्यातच... गाडी सर्व्हिसीँगला नेली, ओळखीचाच मेकॅनिक... २३६ रुपयांचं बिल फाडतांना सवयीप्रमाणं "कितना दूँ रहमान ? दिवाली डिस्काउंट देके बिल बना..." म्हणत २०० त आवरलं... निघतांना तो आठवणीनं Happy Diwali tejaabhai बोलला... . "असहीष्णू" वातावरण झालंय नां ? मला तर नाही ब्ब्बॉ दिसलं कुठे... उलट, चाँद, ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved