Posts

मरण कसं असाव

Image
मरण कसं असावं, एसी हॉलमध्ये झोपून नाकातोंडात नळ्या घेवून, किंवा फाटक्या डोळ्यांनी कडू आसवं गाळत वाट बघत येणारं मरण काय मरण असतं कां ? चालता बोलता हार्ट फेल होवून मरण्यात कसली आलीय मजा ? किडे मोजत वर्षानूवर्ष मरण्यासाठी झटणारे जगतातच काय ? हसत हसत जीव सोडला तर मरणाला काय अर्थ आहे ? गाडी ठोकली आणि मेला, काय कमावलं ? . हायवेवर मरुन पडलेला, शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झालेल्या कुत्र्याचा मला नेहमीच हेवा वाटतो... तो खरा मरतो... तो मरणही जगतो... वेदना, तडफड, त्रास पुरेपूर अनुभवतो... तडफडून जीव सोडतो... जगण्याचं अख्खं थ्रिल त्याच्या मरण्यात असतं... उलट्या लटकलेल्या गिधाडांचं काय ? . मरण कसं असावं ? तडफड, यातना, कठीण, त्रास... सगळे भोग पूरेपूर भरलेलं... फडफड व्हावी मरण यावं तर असं जबरदस्त यावं... शरीराच्या चिंधड्या चिंधड्या व्हाव्यात... तडफडून तडफडून जीव जावा, मरणाच्या वेदना पुरेपूर भोगाव्यात... विव्हळ, यातना अनुभवत संपावं... मरणाचाही क्षण पूर्ण जगून निघावं... . आपलं मरण बघून इतरांच्या अंगावर काटा आला तर ते खरं मरणं... मरण असावं तर असं असावं... भयंकर, भयाण आणि भ

Tejas Kulkarni at Riyaj

Image
रियाज... दिवसातली सगळ्यात सुंदर वेळ ... एकदा सूरांचा राजा "सा" लागला की तिथे स्वर्ग प्रगट होतं... संगीताचा ह्रदयातून गळयाकडे प्रवास सुरु होतो... गळ्यातून एक एक सूर अवतरतात... आणि अनुभूती जन्म घेते.... तेव्हा विश्वात फक्त मी, सात सूर आणि सर्वोच्च कोटीचा आनंद असतो.... "मी" सात सूरांत विलीन होतो. . . Music... The only truth of my life... . तिथे स्वररुपी देवता साक्षात दर्शन देतात... तल्लीन करतात... . रियाजावेळचा Random Click... P.C. Tushar

RIP Veena Sahastrabudhhe

Image
भारतीय शास्त्रीय संगीतात गान विदूषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचं आज निधन झालं. त्या सर्वोत्कृष्ठ शास्त्रीय संगीताच्या गायिकांपैकी एक होत्या, त्यांच्या स्वतःच्या रागांची देखील निर्मिती त्यांनी केली होती. . डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांची गायकी ग्वालीयार घराण्यातली होती, तरीही जयपूर आणि किराना घराण्याचीही छाप त्यांच्यावर होती. त्या ख्याल आणि भजनांसाठी प्रसिद्ध होत्या. . भावपूर्ण श्रद्धांजली !

राग भैरवी Raag Bhairavi

भैरवी… . लहान असताना घरी कुणी नात्यातलं, ओळखीतलं आलेलं माणूस गाणं वगैरे म्हणणारं असेल तर त्याला म्हणायचा आग्रह व्हायचा. मोठ्या माणसांकडून शेवटी 'एक झकास भैरवी होऊ दे' असं म्हटलं जायचं. तो 'राग' आहे वगैरे गोष्टी काही ठाऊक नव्हत्या. चिमुकला मेंदू (अजूनही तेवढाच आहे, उत्क्रांती काहीही नाही) विविध शक्यता तपासात बसायचा. मागच्यावेळेला अभंग होता भैरवी म्हणून यावेळी वेगळंच गाणं कसं भैरवी म्हणून असे अज्ञानी प्रश्नं पडायचे. मैफिलीच्या शेवटी म्हटला जाणारा राग असं नंतर समजलं. मग आयुष्याच्या संध्याछायेला पण भैरवी म्हणायची वेळ आली वगैरे असं झालं. एकदा शिक्का बसला की बसला, तसं झालंय भैरवीचं. अपभ्रंश, अर्धवट माहितीवर आधारित पायंडे, कालबाह्य प्रथा सहसा बदलत नाहीत, उलट त्या नेमाने पाळल्या जातात. क्रॉफर्ड मार्केटच्या उत्तरेला रहाणारे इंग्रज दक्षिण भागाला Behind the Bazar म्हणायचे त्याचं भेंडी बाजार झालं आणि तेच अधिकृत नाव झालं. भारतीय शास्त्रीय संगीतात जे घराणी आहेत त्यात हे भेंडीबझार घराणं पण आहे. . एका मासिकात मी वाचलं होतं. भैरवी हा सकाळच्या पहिल्या प्रहरात म्हणायचा राग. तेंव्हा

Madhav Bhandari

Image
माधव भंडारींनी एक ही मारा, पर एैसा मारा, हलवून ठेव दिया... च्यामारी... . सामनावीरांनी शिकावं. प्रवक्ता असा असावा... एक ही मारता है, पर सॉलीड मारता है... वर्म पे बोट रखके हिला देता है ! . माधव भंडारी... जियो जियो... आम्ही तुमच्या सोबत आहोत. . मस्त फटकारलंय "हम अंग्रेजोके जमानेके जेलर है..." च्यामारी...

Panchamda

Image
=Birthday of पंचमदा= . आजच्या एव्हरग्रीन गाण्यांची गंगोत्री आर डी बर्मन... पंचमदा आहेत. रफीसाहेब, आशाताई अश्या संगीत देवतांचा परमात्मा पंचमदांना म्हणलं जातं... एस. डी. बर्मन यांच्याकडे पंचमदांनी २७ जून १९३९ रोजी जन्म घेतला, भारतीय संगीताला त्याचदिवशी नवा आकार मिळाला. एस. डी. षडजं (सा) पासून लावायचे, तर आर. डी. पंचम (प). त्यामुळे अशोक कुमारांनी त्यांना "पंचम"  नाव दिलं. . जिथे तंतूवाद्यापासून गाण्याची सुरुवात करायचा प्रघात होता, पंचमदांनी तिथे बिनधास्त ब्रास पासून सुरुवात केली. भारतीय गाण्यात वेस्टर्न संगीताचा तडका मारून पंचमदांनी "पंचम टच" ला जन्म दिला. अमेरीकन, यूरोपीअन, जॅझ्झ्झ, लॅटीन संगीताचा प्रभाव त्यांनी दिग्दर्शीत केलेल्या प्रत्येक गाण्यात दिसतो. पंचमदा माऊथ ऑर्गनचे त्याकाळचे जगातील सर्वोत्कृष्ठ कलाकार होते. . त्यांची पहिली अगदी लहान वयातच केलेली ट्यून "सर जो तेरा टकराये" ने गुरुदत्तना अगदी वेड लावलं आणि प्यासा साठी ती घेतली सुध्दा ! तुमसे मिलके ऐसा लगा, फुलो के रंग से, मेहबूबा मेहबूबा, रिमझिम गिरे सावन, चुरा लिया है तुमने, करवटे बदलते रहे,

Sena

१९६६ : खंजीर, कोथळा, मावळे, वाघ, निजाम, वार, औरंगजेब, औलाद, रक्त, थडगं... वेग्रे वेग्रे (५० वर्षांनंतर) २०१६ : खंजीर, कोथळा, मावळे, वाघ, निजाम, वार, औरंगजेब, औलाद, रक्त, थडगं... वेग्रे वेग्रे ..... प्रश्न - यूती, भाजपा, मोदी हे मुद्दे रोजचेच आहेत हो, सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात काहीतरी चांगलं, लक्षात राहील असं हवं होतं... उठा - हो नं, पण ऐनवेळी मेलं ते आजचं भाषण विसरलो, आणि वेळ मारून नेण्यासाठी विधानसभेवेळी पाठ केलेलं भाषण "म्हणून दाखवलं"... . प्रश्न - यूतीचं काय ते व्यवस्थित कळलं नाही... उठा - मला तरी कुठे कळतंय ? पण युती तोडून कसं चालेल ? स्वबळावर एक ग्रामपंचायत यायचे वांधे... काल बघितलं नाही कां ? आणि भाषणात मुद्दे कुठून आणायचे ? प्रश्न - पण मावळे तर होsss म्हणता युती तोडायला... उठा - शूsss... ते आम्हीच सांगितलं होतं... असं बोला मधे मधे . प्रश्न - भाजपेयी जर निझामाची औलाद असतील, औरंगजेबाची फौज असेल तर केंद्रात -राज्यात त्या फौजेत तुम्ही सामिल कां ? "निघून जा" असं स्पष्ट सांगूनपण तुम्ही चिटकलेले आहात... कशासाठी ? उठा - सुटत नै न... यूती तुटली तर हम सेन

Taarak Mehata Ka Ooltah Chashmah

Image
तसं मला सिरीयल या प्रकाराचं वावडं आहे, पण अधुन मधून काही कामधंदा नसेल, किंवा अति खाज असेल, आणि तेव्हाच सिरीयल हा प्रकार किती धोकेदायक आहे यावर बौद्धीक देण्याचा मूड असेल तर मी टिव्हीसमोर बसून इतरांच्या सिरीयल मूडचं सिरीयस किलींग करतो... स्टार प्रवाहच्या नावे तर आयेदिन शिमगा ठरलेलाच ! . पण सब वरचा एकच डेली सोप मी ऑलमोस्ट रोज बघतो. रात्री ११ च्या नाईट शो ला... गुजराथी कलाकार आणि गुजराती संस्कृती यांचा भरणा असलेला उल्टा चष्मा. . तो बघण्यामागचं प्रायमरी कारण - त्यातल्या गुजराती डिशेस... त्यात काम करणाऱ्या एक से एक आठ अॅक्ट्रेसपेक्षा खाण्याच्या डिशेस बढिया असतात... मी त्या "डिशेस" वर क्रश आहे... आणि सेकंडरी कारण : त्यातल्या पटकथा छान असतात. फन, मज्जा, सामुहीक योगदान, मजेदारपणे हळू हळू उलगडत जाणारी समस्या आणि त्यातून मिळणारा सामाजिक संदेश जबरदस्त...! काहीवेळा त्यात अतिशयोक्ती असते, किंवा प्रोड्यूसरचं अति टांग टाकणंही असतं... तेव्हा दोन उत्स्फूर्त शिव्याही घातल्या जातात, तरीही या सिरीयलला तोड नाही... . आत्ता बाघाकी सगाई सुरुय... आपल्या दुकानात काम करणाऱ्या नोकराच्या लग्ना

Day with ABP Majha

Image
दिवस "माझा" ! कालचा दिवस तसा "यादगार" टाईप... "याद" आणि काही क्षण मी "गार" पडलो... (आणी शिकलो) कालचा पूर्ण दिवस @Abp Majha, अंधेरी मुंबई... . एका कामासाठी काल दिवसभर एबीपीच्या स्टूडीयोत होतो. अनपेक्षितरित्या नकळतच काही सुंदर क्षण जमा झाले. ऐकलं होतं तसंच एबीपीची ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन अख्खी टिम फूल सपोर्टीव आणि फ्रेंडली आहे.. . वैयक्तीक ओळख नसतांनाही अगदी आल्याबरोबर छानशी स्माईल देऊन आश्वीन बापटांनी स्वागत केलं... Rahul Khichadi, Vilas Bade, Reshma Salunkhe, संतोष रावूळ... भन्नाट... डाऊन टू अर्थ एबीपीची ही खासियत आहे... मला याची देही अनुभव आला... आणि जबरदस्त मॅनेजमेंट ! इव्हन दोन मिनिट का होईना राजीव खांडेकर थांबले, हाय-हॅलो केलं... माझा कट्टावर पंकजा मुंडे आलेल्या, त्या धावपळीत होते (बाकी, धुळ्यात - पुण्यात एखाद्या साप्ताहीकाचा मालक हवेत उडतो... फोन उचलत नाही.. लोकल चॅनेलकर मंडळी स्वतःला बच्चन, खान वगैरे समजतात...) . आणि, माझा कट्टा संपवून परत जातांना प्रिमाईसेसमध्ये पंकजा मुंडे अचानक समोर आल्या... जरा घाईत होत्या (आजपर्यंत ओव्हरऑल

तृतीयपंथी

Image
=तृतीयपंथी= . मी स्लाईसच्या बॉटल्स घेण्यासाठी एका कोल्ड्रींग कम आईसक्रीम शॉपवर आलो. शॉपमध्ये मोजून चार टेबल्स होते. आणि चारही टेबल वर कुणी ना कुणी होतं. इतक्यात दोन तृतीयपंथी तिथे आले. (त्यातली एक लंगडत चालत होती. तिला बहूदा जोरदार ठेच लागली असेल.) त्यांनी पैसे देऊन दोन आईसक्रीम घेतले.(दुकानदाराने ते अक्षरशः पटकले.)... चारही टेबल्स बिझी... तीनपैकी जिथे एकटा माणूस होता त्या टेबलपाशी ते गेले. आणि "हम बैठे यहाँ पे ?" असं अदबीने विचारलं... तो माणूस त्यांच्यावर वसकन ओरडला... "ऐ चल आगे जाव... यहाँपे नही बैठनेका... कहाकहासे आ जाते है...".. . "सगळ्यांसमोर वाईट अपमान झाला. !"... दुसरा अपमान पचवून ते गप्प बाजूला जावून उभे राहीले... काहींनी अंग चोरलं, तर काहींच्या हिणकस नजरा त्यांना टोचू लागल्या... लंगडत चालणारी होती तिला उभं राहणं असह्य असावं बहूदा, त्यामुळे बाहेर जाण्याच्या बेतात असतांनाच एक टेबल रिकामा झाला. आणि ते तिथे बसले... अगदी हिणवलेला, अपमान झालेला चेहरा घेवून ! . आणि त्यांच्या बाजूच्या टेबलवरचं कपल, "ऐ चल, इथे नको बसूयात... हे येऊन बसले.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved