तृतीयपंथी
=तृतीयपंथी=
.
मी स्लाईसच्या बॉटल्स घेण्यासाठी एका कोल्ड्रींग कम आईसक्रीम शॉपवर आलो. शॉपमध्ये मोजून चार टेबल्स होते. आणि चारही टेबल वर कुणी ना कुणी होतं. इतक्यात दोन तृतीयपंथी तिथे आले. (त्यातली एक लंगडत चालत होती. तिला बहूदा जोरदार ठेच लागली असेल.) त्यांनी पैसे देऊन दोन आईसक्रीम घेतले.(दुकानदाराने ते अक्षरशः पटकले.)...
चारही टेबल्स बिझी... तीनपैकी जिथे एकटा माणूस होता त्या टेबलपाशी ते गेले. आणि "हम बैठे यहाँ पे ?" असं अदबीने विचारलं...
तो माणूस त्यांच्यावर वसकन ओरडला... "ऐ चल आगे जाव... यहाँपे नही बैठनेका... कहाकहासे आ जाते है..."..
.
"सगळ्यांसमोर वाईट अपमान झाला. !"...
दुसरा अपमान पचवून ते गप्प बाजूला जावून उभे राहीले...
काहींनी अंग चोरलं, तर काहींच्या हिणकस नजरा त्यांना टोचू लागल्या...
लंगडत चालणारी होती तिला उभं राहणं असह्य असावं बहूदा, त्यामुळे बाहेर जाण्याच्या बेतात असतांनाच एक टेबल रिकामा झाला.
आणि ते तिथे बसले... अगदी हिणवलेला, अपमान झालेला चेहरा घेवून !
.
आणि त्यांच्या बाजूच्या टेबलवरचं कपल, "ऐ चल, इथे नको बसूयात... हे येऊन बसले..." म्हणत उठून चालायला लागले...! तर नवीन येणारे बाजूला उभे राहून यांचं संपण्याची वाट बघत होते...
त्यांचा सोडून सगळे टेबल रिकामे..
केवळ "आईसक्रीम घेणं" या छोट्याश्या कृतीत त्यांचा इतका अपमान झाला, कसं जगत असतील ही माणसं ?
त्यांच्या चेहऱ्यावर अपमानाच्या खूणा स्पष्ट दिसत होत्या...
काहीतरी करुन त्यांना तो अपमान विसरायला लावायचा तेजा, भरून काढायचं...
.
" ए उठो यहाँ से..." दुकानदार पुन्हा ओरडला...
- बसू द्या हो... पैसे दिलेत त्यांनी... (च्यायला टाईप... तेजा, कंट्रोल)
- पण कस्टमर थांबलेत...
- बाकीचे टेबल आहेत ना पण... त्यांचं पूर्ण होवू द्या... माणसं आहेत ती...
.
हातातलं स्लाईस अर्ध होतं,
गेलो त्यांच्याकडे...
- "हम बेठे यहाँपे ?"
त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते...
- "आप यहाँ बैठेंगे ? चलेगा आपको ?"
- "हा चलेगा ना..."
त्यांच्या चेहऱ्यावर छानसं हसू आलं. मी खुर्ची सरकवली आणि बसलो...
- आप भी लो आईसक्रीम...
- नही, मेरा ये बहुत है... पहले बोलते तो स्लाईस नही, आईसक्रीमही लेता...
.
अवघे चार ते पाच मिनिटं हसत हसत हा संवाद चालला...
काय लागलं ? क्लीनीक मध्ये जा वगैरे बोललो...
पण त्या पाच मिनिटात त्यांचा पंधरा मिनिटं सलग झालेला अपमान ते विसरले...
आधी खूप वाईट पडलेला चेहरा खुलला...
.
आईसक्रीम संपलं..
- चलो, मै निकलता हूँ...
- "हमसे कोई बात नही करता, ये सब तो रोज का है... आज अच्छा लगा तुमने बात की... हमसे पूछा... सच्चा है तू... तेरी सब मुरादे पुरी होगी"
असं बोलून त्यांनी एक रुपयाचं नाणं काढलं, ते मुठीत धरून काही मंत्र पुटपुटले आणि त्यांच्या बांगड्यांना टच करून मला दिलं...
"कुछ कमी नही गिरेगा तुझे... ये रख अपने साथ..."
.
- आणि चालायला लागले...
अजून कुठेतरी अपमान करुन घ्यायला...
.
त्या लोकांचं मन खरंच शुद्ध असतं... निस्वार्थ असतं... आणि ते धोकेदायक नसतात.
आपण निर्दयी,
त्यांना जीव आहे, मन आहे... त्यांनाही वाईट वाटतं हेच विसरतो...
.
एक मिनिट त्यांच्याशी बोलून, आपुलकीने बोलून त्यांना लाख रुपयांचं समाधान मिळतं...
आणि आपल्याला लाख रुपयांचे त्यांनी शुद्ध मनाने दिलेले आशिर्वाद... !