Day with ABP Majha

दिवस "माझा" !
कालचा दिवस तसा "यादगार" टाईप...
"याद" आणि काही क्षण मी "गार" पडलो...
(आणी शिकलो)
कालचा पूर्ण दिवस @Abp Majha, अंधेरी मुंबई...
.
एका कामासाठी काल दिवसभर एबीपीच्या स्टूडीयोत होतो. अनपेक्षितरित्या नकळतच काही सुंदर क्षण जमा झाले. ऐकलं होतं तसंच एबीपीची ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन अख्खी टिम फूल सपोर्टीव आणि फ्रेंडली आहे..
.
वैयक्तीक ओळख नसतांनाही अगदी आल्याबरोबर छानशी स्माईल देऊन आश्वीन बापटांनी स्वागत केलं... Rahul Khichadi, Vilas Bade, Reshma Salunkhe, संतोष रावूळ... भन्नाट... डाऊन टू अर्थ एबीपीची ही खासियत आहे... मला याची देही अनुभव आला... आणि जबरदस्त मॅनेजमेंट ! इव्हन दोन मिनिट का होईना राजीव खांडेकर थांबले, हाय-हॅलो केलं... माझा कट्टावर पंकजा मुंडे आलेल्या, त्या धावपळीत होते (बाकी, धुळ्यात - पुण्यात एखाद्या साप्ताहीकाचा मालक हवेत उडतो... फोन उचलत नाही.. लोकल चॅनेलकर मंडळी स्वतःला बच्चन, खान वगैरे समजतात...)
.
आणि,
माझा कट्टा संपवून परत जातांना प्रिमाईसेसमध्ये पंकजा मुंडे अचानक समोर आल्या... जरा घाईत होत्या
(आजपर्यंत ओव्हरऑल चौथ्यांदा भेटलो...)
पण त्यांनी भूवया उंचावून ओहोs असं ओळखीचं स्माईल दिलं... हाय केलं...
इथे मी गार...
.
बास... दिवस सार्थकी...
द्वारकानाथ संझगिरी आणि पंकजा मुंडे (चेहऱ्यानी का होईना) मला ओळखतात यार... :-P :-D
.
मुंबईतल्या पहिल्या पावसातही भिजलो !.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved