Sena

१९६६ : खंजीर, कोथळा, मावळे, वाघ, निजाम, वार, औरंगजेब, औलाद, रक्त, थडगं... वेग्रे वेग्रे
(५० वर्षांनंतर)
२०१६ : खंजीर, कोथळा, मावळे, वाघ, निजाम, वार, औरंगजेब, औलाद, रक्त, थडगं... वेग्रे वेग्रे
.....
प्रश्न - यूती, भाजपा, मोदी हे मुद्दे रोजचेच आहेत हो,
सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात काहीतरी चांगलं, लक्षात राहील असं हवं होतं...
उठा - हो नं, पण ऐनवेळी मेलं ते आजचं भाषण विसरलो, आणि वेळ मारून नेण्यासाठी विधानसभेवेळी पाठ केलेलं भाषण "म्हणून दाखवलं"...
.
प्रश्न - यूतीचं काय ते व्यवस्थित कळलं नाही...
उठा - मला तरी कुठे कळतंय ? पण युती तोडून कसं चालेल ? स्वबळावर एक ग्रामपंचायत यायचे वांधे... काल बघितलं नाही कां ? आणि भाषणात मुद्दे कुठून आणायचे ?
प्रश्न - पण मावळे तर होsss म्हणता युती तोडायला...
उठा - शूsss... ते आम्हीच सांगितलं होतं... असं बोला मधे मधे
.
प्रश्न - भाजपेयी जर निझामाची औलाद असतील, औरंगजेबाची फौज असेल तर केंद्रात -राज्यात त्या फौजेत तुम्ही सामिल कां ? "निघून जा" असं स्पष्ट सांगूनपण तुम्ही चिटकलेले आहात... कशासाठी ?
उठा - सुटत नै न... यूती तुटली तर हम सेनापती राहणार कैसे ?
.
प्रश्न - आता पुढची काय "रणनिती" ?
उठा - कॅमेरा साफ करतोय... पाऊले उडती पंढरीची वाट...
तेच आवडतं हो !
.
सेनेने एक छान दिवस वाया घालवला. विरोधक वगैरे बाजूला ठेवून "सिंहावलोकन" केलं असतं... छान कार्यक्रम केले असते... किती मस्त झालं असतं...
.
पन्नाशी उलटली... पण...
:-D :-D :-D

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved