Panchamda

=Birthday of पंचमदा=
.
आजच्या एव्हरग्रीन गाण्यांची गंगोत्री आर डी बर्मन... पंचमदा आहेत. रफीसाहेब, आशाताई अश्या संगीत देवतांचा परमात्मा पंचमदांना म्हणलं जातं... एस. डी. बर्मन यांच्याकडे पंचमदांनी २७ जून १९३९ रोजी जन्म घेतला, भारतीय संगीताला त्याचदिवशी नवा आकार मिळाला. एस. डी. षडजं (सा) पासून लावायचे, तर आर. डी. पंचम (प). त्यामुळे अशोक कुमारांनी त्यांना "पंचम"  नाव दिलं.
.
जिथे तंतूवाद्यापासून गाण्याची सुरुवात करायचा प्रघात होता, पंचमदांनी तिथे बिनधास्त ब्रास पासून सुरुवात केली. भारतीय गाण्यात वेस्टर्न संगीताचा तडका मारून पंचमदांनी "पंचम टच" ला जन्म दिला. अमेरीकन, यूरोपीअन, जॅझ्झ्झ, लॅटीन संगीताचा प्रभाव त्यांनी दिग्दर्शीत केलेल्या प्रत्येक गाण्यात दिसतो. पंचमदा माऊथ ऑर्गनचे त्याकाळचे जगातील सर्वोत्कृष्ठ कलाकार होते.
.
त्यांची पहिली अगदी लहान वयातच केलेली ट्यून "सर जो तेरा टकराये" ने गुरुदत्तना अगदी वेड लावलं आणि प्यासा साठी ती घेतली सुध्दा ! तुमसे मिलके ऐसा लगा, फुलो के रंग से, मेहबूबा मेहबूबा, रिमझिम गिरे सावन, चुरा लिया है तुमने, करवटे बदलते रहे, यम्मा यम्मा, देखो मैने देखा है ये इक सपना, रैना बिती जाऐ, ओ मेरे दिल के चैन, जब हम जवॉं होंगे..
यासारख्या अनेक गाण्यांना पंचमदांनी आत्मा दिला. या गाण्यांत वेस्टर्न संगीताचा टच आहे... वेस्टर्न वाद्यांचा पुरेपूर वापर आणि त्यातही भारतीय संगीताचा पाया ढळू न देता दिलेलं संगीत.. हीच पंचमदांची खासीयत आहे. यातली बहूतेक गाणी डिस्को, ऑर्केस्ट्रा फेम झाली ती यामुळेच. पंचम टच भारतीय संस्कृतीत रुजवली. आणि पंचमदा करोडो गळ्यातले ताईत बनले. तीसरी मंझील आणि कटी पतंग हे त्यांचे खरे ब्रेक थ्रू होते.
.
पहिल्या पत्नीला घटस्पोट देऊन त्यांनी आशा भोसले- बर्मन यांच्याशी विवाह केला. गोड गळा आणि संगीत ह्रदय असा तो सुरेल संगम होता. पंचमदांना सिगारेट ओढण्याचं प्रचंड वेड होतं. राहूल देव बर्मन हा बंगाली बाबू भारतीय संगीत सृष्टीचा सूर्य होता. ४ जानेवारी १९९४ ला शरीराने संपले, पण "बर्मन ट्च" ने अजरामर आहेत... आणि राहतील.
.
पंचमदा... Happy Birthday... You never died... only born !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved