Taarak Mehata Ka Ooltah Chashmah
तसं मला सिरीयल या प्रकाराचं वावडं आहे, पण अधुन मधून काही कामधंदा नसेल, किंवा अति खाज असेल, आणि तेव्हाच सिरीयल हा प्रकार किती धोकेदायक आहे यावर बौद्धीक देण्याचा मूड असेल तर मी टिव्हीसमोर बसून इतरांच्या सिरीयल मूडचं सिरीयस किलींग करतो...
स्टार प्रवाहच्या नावे तर आयेदिन शिमगा ठरलेलाच !
.
पण सब वरचा एकच डेली सोप मी ऑलमोस्ट रोज बघतो. रात्री ११ च्या नाईट शो ला... गुजराथी कलाकार आणि गुजराती संस्कृती यांचा भरणा असलेला उल्टा चष्मा.
.
तो बघण्यामागचं प्रायमरी कारण - त्यातल्या गुजराती डिशेस... त्यात काम करणाऱ्या एक से एक आठ अॅक्ट्रेसपेक्षा खाण्याच्या डिशेस बढिया असतात... मी त्या "डिशेस" वर क्रश आहे... आणि सेकंडरी कारण : त्यातल्या पटकथा छान असतात. फन, मज्जा, सामुहीक योगदान, मजेदारपणे हळू हळू उलगडत जाणारी समस्या आणि त्यातून मिळणारा सामाजिक संदेश जबरदस्त...!
काहीवेळा त्यात अतिशयोक्ती असते, किंवा प्रोड्यूसरचं अति टांग टाकणंही असतं... तेव्हा दोन उत्स्फूर्त शिव्याही घातल्या जातात,
तरीही या सिरीयलला तोड नाही...
.
आत्ता बाघाकी सगाई सुरुय...
आपल्या दुकानात काम करणाऱ्या नोकराच्या लग्नासाठी त्याने मारलेल्या थापा पचविण्यासाठी, दुकानाचा मालक स्वतः नोकराची भूमिका बजावतो, काबाडकष्ट करतो, स्वतःच्या घरात नोकर बनून राहतो. त्याचं कुटूंबही त्यात सहभागी होतं, आणि स्वतःच्या घराप्रमाणे त्या गरीब नोकराच्या लग्नाचा खर्च उचलतो, आणि नाटकासाठी कां होईना पण त्या नोकराला श्रीमंत असल्याची जाणीव करून देतो...
आणि या सगळ्यांवर त्या नोकराच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू...
केवळ अप्रतिम...
नोकर-मालक यांच्यातलं नातं जपायचं परफेक्ट वर्णन..
या एपिसोडकरता तामेकाउचच्या एपिसोड रायटर्स लोकांना, संवाद लेखकांना टोपी काढून सलाम...
.
प्यार बाँटते चलो...
आयुष्य खूप सुंदर आहे...
.
(फोटोत नोकर बाघा आणि मालक जेठालाल... कालच्या एपिसोडची लिंक पण दिलीय)

https://youtu.be/GWKxIHa5p9k