Posts

Mumbai Elfisten Station Accident

मुंबईत आल्यानंतर वर्षभरात मी महत्वाचं शिकलोय ते म्हणजे भावनाशून्य राहणं... इथे भावनांना काडीचीही किंमत नाही, तुमच्याभोवती लोकं मरताय, महापूर आलेय, कुणीही येऊन शहराची वाजवून जातंय ... "स्साला रोज का यह्हीच लफडा है यहाँका"... म्हणून  सोयीस्करपणे डोळे झाकून जगणं म्हणजे मुंबई स्पिरीट... यात जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत रोजची जी झक मारायची ती मारावी लागणार आहे... कुणी हात धरणारं नाही - आपलं ओझं आपणंच वाहणार... . मुंबई म्हणजे कुठलं शहर नाही, रस्ता नाही, इमारत नाही - संवेदना मेलेला इथला एक एक माणूस म्हणजे मुंबई. त्याचं स्पिरीट त्याचं जगणं आहे. ना कुठल्या कौतूकाचं मोहताज - ना टिकेचं मिंधं... !... ... एल्फिस्टन परेल रेल्वे पुलावरील दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !

World's Daughter Day जागतिक कन्या दिन

Image
मुलगी असणं भाग्य समजलं जातं. मुलगी खरं तर घरातली पाहुणी समजावी अशी आपली समाजव्यवस्था, पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, माणसं यांना ती असते तोपर्यंत समजूतदारपणे, मायेने जपते, सांभाळते.. जीव लावते... दुखण्यावर तिची एक फुंकर पुरेशी असते... मुलगी घराचा आत्मा असते. स्त्रीरुपाला निसर्गाने उपजत काळजीचं काळीज दिलेलं असतं, त्या काळजीनं घरातली मुलगी आई-वडील-बहिण-भाऊ यांच्यासाठी अदृष्य आधार असते, ती आईला घरात मदत करते - वडिलांच्या मागेही तितकंच खंबीरपणे उभं राहते... मुलगी खरा आधार असते... जिच्यावर घर सोपवून आईवडील निश्चिंत होतात... तिला जबाबदारीचं कोंदण असतं, आई - बाबा दोघंही तिच्याजवळ मनमोकळं रडू शकतात... त्या दोघांनाही समजून घेण्याचं मन तिच्याजवळ असतं... ती पाझरणारं मातृत्व असते - त्या मुलीला कधी आई-बाबांची आई व्हावं लागतं, कधी घरातल्या बाबांची जागा घ्यावी लागते... .. "त्याग" या शब्दाला पूरेपूर जागण्याऱ्या मुली असतात... आईबाबांच्या मुली... ! एक दिवस त्यांचं घर, आईबाबा यांना सोडून कायमचं दुसऱ्या घरी, दुसऱ्या माणसांत जायचं... ज्या घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत मायेनं जपली, सांभ

Theory of Life

आपल्या आयुष्यातली खुप जवळची असणारी ठराविक लोकं सोडली तर इतरांसाठी एक मर्यादा असते, त्या मर्यादेनंतर कुणाचंही मन, मान, नातं, ओळख ठेवू नये... कारण त्यानंतर फक्त आपलीच फरफट होते... .. आपल्याकडून प्रयत्न फार फार तर दोनदा - तीनदा करावा. त्यानंतर Let them go to hell... ! ..

Navratri

Image
पृथ्वी - विश्व हे मातृस्वरुप आहे. जन्म - पालन - मोक्ष या तिन्ही अवस्थांचं कारकत्व स्त्रीरूप-मातृरूप आहे. आपलं आस्तित्व - आयुष्य हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या आदीशक्तीच्या अधीन आहे. ती आदीशक्ती आपल्या आयुष्यात सदैव आहे... वेगवेगळ्या रुपात - वेगवेगळ्या स्वरुपात ती आपला भार उचलत असते, सांभाळत असते... .. मातृयोनीतून जन्म होतो, भूमी आपला भार उचलते, जन्म देणारी आई ही आदीशक्ती... मातृरुप ! पुढे आदीशक्ती स्त्री पत्नी म्हणून येते... संपुर्ण आयुष्य सांभाळते... सहचारीणीरुप... ! हातातला पैसा - धनधान्य म्हणजे लक्ष्मी... ! ज्यांचं नशीब चांगलं त्यांच्या घरात ती मुलगी म्हणून येते... आई, बायको, चांगली मैत्रीण, बहीण, टिचर, आपली गाडी, पैसा, भार उचलते ती भूमी, आपलं सरस्वतीस्वरुप ज्ञान... अनेक रुपात ती शक्तीच आपलं पालन करत असते... कराग्रे वसते लक्ष्मी - करमूले सरस्वती... हे यासाठीच ! . आदीमाया - आदीशक्ती ... ती आपल्या मनातलं ओळखते, सांभाळून घेते... श्रद्धेने तिच्यापुढे नतमस्तक होणं, तिला शरण जाणं यापेक्षा दुसरं काही नको - ती आई आणि आपण लेकरं ! .. ती परब्रह्म, ती सरस्वती, ती महामाया, ती अंबा,

Engineers Day 2017

Image
इंजीनिअरची डिग्री येते चार वर्षात - आठ सेमिस्टर, ४०-५० विषय, प्रॅक्टीकल्स वगैरे आवरतं... पण ते भिनायला कुणाला जीवाचं Java करावं लागतं तर कुणाला जीवाचं concrete करावं लागतं... इतकं सहज नसतं ते ! . इंजिनीअर माणूस वरुन सिमेंटसारखा निगरगट्ट दिसत असला तरीही त्याचं ऋदय कापसाचं असतं... एखाद्या माऊलीला तिने जन्माला घातलेल्या बाळाचं जितकं कोडकौतूक असतं तितकंच इंजिनीअरला त्याच्या प्रॉडक्टचं असतं... तितकंच ! ते बाळ पहिल्यांदा हातात घेतल्यावरचा आनंद त्या आईच्या डोळ्यांतून वाहतो - तितकाच काम पूर्ण होवून हँड ओव्हर करतांना त्या इंजिनीअरच्या डोळ्यातूनही वाहतो... त्याशिवाय डिग्री सार्थकी लागत नाही... ! .. एखादं घर बांधलं तर त्यासमोरुन जातांना नजरेनेच तो ते घर कुरवाळतो... आपण बनवलेली वेबसाईट दिवसात एकदातरी प्रेमानं फिरून येतो... कारण त्यात त्याचा जीव अडकलेला असतो... तोच जीव - कुणाचा concrete तर कुणाचा Java... ! .. इंजिनीअर घडवतात ! सोपेपणा आणतात... Engineering is a thrill... भारी असतं ते... मी जर इंजिनीअर नसतो तर काय असतो ? कदाचित मी नसतोच... थोडक्यात - हे माझं आयुष्य, जीव, प्राण, पोट वगैरे आह

Raaga and Taal

संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही. एकदा एका  कार्यक्रमाच्या वेळी आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ”पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना पंडित भॊमसेन जोशींचा एक  बडॊद्याचा अनुभव सांगितला... रात्रीची वेळ, भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत  पूरियाधनाश्री  गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर... तेवढ्यात काहीतरी झालं आणि टांगा थांबला.   लय थांबली, आणि त्या बरोबरच पं

Younger Brother : Tushar Kulkarni

Image
Happy Birthday तुषार... असा भाऊ मिळायला नशिब लागतं, आणि माझ्या नशिबानं हा माझा भाऊ आहे... लहान भाऊ, जीव, सर्वस्व... ! यामध्ये उपजत काहीतरी खास आहे... लाखात एखादं व्यक्तीमत्व ठरावं असं. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हा सहज करतो... काहीही... रॅदर जिथे माझी विचार करण्याची लेव्हल संपते, तिथे हा सुरु होतो... लहान आहे, पण माझ्यासाठी मोठ्याप्रमाणे उभा आहे... ! .. वेळप्रसंगी न डगमगता खंबीर उभं राहण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, समजूतदारपणा आहे ... आमच्यावर आलेल्या अनेक भयंकर प्रसंगात जिथे सगळे कोसळले तिथे हा खंबीर उभा राहिलाय... - त्याला मनातलं कळतं... एक चार महिन्यांचा फेज आलेला जेव्हा मी आर्थिक कोंडीत होतो, रोजच्या गरजा पूर्ण करायला पैसे नव्हते - एक दिवस माझ्या ट्रॅवल्स बॅगमध्ये मला अनपेक्षित काही रुपये दिसले... तो फेज सहज काढता येईल इतके... कुठून आले - कुणी ठेवले हे कुणीच सांगितलं नाही, सांगत नव्हतं... तो फेज निघाला, प्रॉब्लेम्स संपले आणि नंतर समजलं तुषारने माझ्या नकळतच ते घडवलं... कुठल्याही शब्दांत व्यक्त होवू शकत नाही अशी गोष्ट आहे ही... Speechless करणारी... ! .. क्रिकेट खेळतांना लवकर आऊ

Asha Bhosle

Image
घडण्यासाठी सोसलेले घाव, कोंडी, स्वतःच्या बहिणीकडून होत गेलेली स्पर्धा यातही त्या भक्कमपणे टिकल्या, सहनायिकांची, कुणी फेकलेली गाणी मिळाली त्यांचंही सोनं केलं आणि त्या त्रासाचा लवलेशही न दाखवता, झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत त्या जगल्या... वयाच्या ८५ व्या वर्षातही आशा भोसले ही देवी आपल्याला भरभरून देतेय. कौटूंबिक कलह, करीयरमधले अडथळे, मुलीचं निधन यांसारखे संकटं झेलूनही त्या उभ्या आहेत. गायिका म्हणून त्यांनी जे दिलंय ते अफाट आहे, गेल्याजन्मी मोती दान केला तर आवाज गोड होतो - आशा भोसले या देवानं गेल्याजन्मी मोत्यांनी भरलेला समुद्र दान केलेला असावा... गंधर्वाला जन्म देणारी माता मनुष्य रुपात भूतलावर अवतरली. . हजारो एव्हरग्रीन गाणी त्यांनी दिलीत. तीन पिढ्या त्या गाण्यांनी मोठ्या केल्या. वयाच्या ८५ मध्ये पण पंचवीशीतल्या नायिकेला साजेशा मादक आवाज त्या देऊ शकतात, एखादं उडत्या चालीचं गाणं बहरवू शकतात, शांत - गंभीर प्रकृतीचं गाणं गातात, स्टेज शो करतात, अवांतर टाळून फक्त गाण्याविषयी बोलतात.. कुठल्याही प्रकारचं गाणं त्या गळ्यातून समृद्ध होवूनच बाहेर येतं... स्वर्गातून मधाची नितधार बरसतेय आणि आपलं म

पितृपक्ष.

"आपण", आपलं असणं हे एक चैतन्य आहे, उर्जा, शक्ती... शरीर नश्वर असलं तरीही आत्मा चिरंतन आहे. शरीर फक्त एक माध्यम. आपलं मन, आत्मा, जीव म्हणजे चिरंतन उर्जा. त्या आत्म्याला भावना आहेत, गरजा आहेत. भावना, इच्छा, विचार, अस्तित्व यांचा संगम म्हणजे आत्मा... आत्मा शक्ती आहे. उर्जा आहे. तिला स्वभाव आहे. According to the first law of thermodynamics, also known as Law of Conservation of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another. शक्तीला जन्म मृत्यू नाही, ती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते. शरीर मरतं, नष्ट होतं पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. शरीर सोडल्यानंतरही तो अदृष्य रुपाने आपल्या भोवती जीवन जगत असतो. मृत्यूपश्चातही त्याच्या भूक, तहान, इच्छा या सवयी सुटत नाही. त्या पूर्ण करण्यासाठी तो धडपडत राहतो. पाणी, वीज, प्रकाश, हवा जसं पुढे जाण्यासाठी द्वार शोधतात तसंच आत्मा देखील पूर्नजन्माचं द्वार दिसलं की नव्या शरीरात जन्म घेऊन तो त्या गरजा पूर्ण करून घेतो. युगांनूयुगे ही क्रिया सुरू आहे... मोक्ष वगैरे गोष

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved