Mumbai Elfisten Station Accident

मुंबईत आल्यानंतर वर्षभरात मी महत्वाचं शिकलोय ते म्हणजे भावनाशून्य राहणं... इथे भावनांना काडीचीही किंमत नाही, तुमच्याभोवती लोकं मरताय, महापूर आलेय, कुणीही येऊन शहराची वाजवून जातंय ...
"स्साला रोज का यह्हीच लफडा है यहाँका"... म्हणून  सोयीस्करपणे डोळे झाकून जगणं म्हणजे मुंबई स्पिरीट... यात जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत रोजची जी झक मारायची ती मारावी लागणार आहे... कुणी हात धरणारं नाही - आपलं ओझं आपणंच वाहणार...
.
मुंबई म्हणजे कुठलं शहर नाही, रस्ता नाही, इमारत नाही - संवेदना मेलेला इथला एक एक माणूस म्हणजे मुंबई.
त्याचं स्पिरीट त्याचं जगणं आहे.
ना कुठल्या कौतूकाचं मोहताज -
ना टिकेचं मिंधं... !...
...
एल्फिस्टन परेल रेल्वे पुलावरील दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved