Navratri

पृथ्वी - विश्व हे मातृस्वरुप आहे. जन्म - पालन - मोक्ष या तिन्ही अवस्थांचं कारकत्व स्त्रीरूप-मातृरूप आहे. आपलं आस्तित्व - आयुष्य हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या आदीशक्तीच्या अधीन आहे. ती आदीशक्ती आपल्या आयुष्यात सदैव आहे... वेगवेगळ्या रुपात - वेगवेगळ्या स्वरुपात ती आपला भार उचलत असते, सांभाळत असते...
..
मातृयोनीतून जन्म होतो, भूमी आपला भार उचलते, जन्म देणारी आई ही आदीशक्ती... मातृरुप ! पुढे आदीशक्ती स्त्री पत्नी म्हणून येते... संपुर्ण आयुष्य सांभाळते... सहचारीणीरुप... ! हातातला पैसा - धनधान्य म्हणजे लक्ष्मी... ! ज्यांचं नशीब चांगलं त्यांच्या घरात ती मुलगी म्हणून येते... आई, बायको, चांगली मैत्रीण, बहीण, टिचर, आपली गाडी, पैसा, भार उचलते ती भूमी, आपलं सरस्वतीस्वरुप ज्ञान... अनेक रुपात ती शक्तीच आपलं पालन करत असते...
कराग्रे वसते लक्ष्मी -
करमूले सरस्वती... हे यासाठीच !
.
आदीमाया - आदीशक्ती ... ती आपल्या मनातलं ओळखते, सांभाळून घेते...
श्रद्धेने तिच्यापुढे नतमस्तक होणं, तिला शरण जाणं यापेक्षा दुसरं काही नको - ती आई आणि आपण लेकरं !
..
ती परब्रह्म, ती सरस्वती, ती महामाया, ती अंबा, ती जगन्माता, ती आदीशक्ती, ती भगवती, ती लक्ष्मी आणि तिच स्त्री !
..
आजपासून नऊ दिवस तिची सेवा करण्याचे, तिला बघण्याचे, अनुभवण्याचे !
दिर्घ श्वास घेतल्यावर ते चैतन्य, ती सकारात्मकता, तो भार जाणवतोच... तिचं अस्तित्व जाणवतं...
नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा... !
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved