Younger Brother : Tushar Kulkarni

Happy Birthday तुषार... असा भाऊ मिळायला नशिब लागतं, आणि माझ्या नशिबानं हा माझा भाऊ आहे... लहान भाऊ, जीव, सर्वस्व... !
यामध्ये उपजत काहीतरी खास आहे... लाखात एखादं व्यक्तीमत्व ठरावं असं. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हा सहज करतो... काहीही... रॅदर जिथे माझी विचार करण्याची लेव्हल संपते, तिथे हा सुरु होतो... लहान आहे, पण माझ्यासाठी मोठ्याप्रमाणे उभा आहे... !
..
वेळप्रसंगी न डगमगता खंबीर उभं राहण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, समजूतदारपणा आहे ... आमच्यावर आलेल्या अनेक भयंकर प्रसंगात जिथे सगळे कोसळले तिथे हा खंबीर उभा राहिलाय... - त्याला मनातलं कळतं...
एक चार महिन्यांचा फेज आलेला जेव्हा मी आर्थिक कोंडीत होतो, रोजच्या गरजा पूर्ण करायला पैसे नव्हते -
एक दिवस माझ्या ट्रॅवल्स बॅगमध्ये मला अनपेक्षित काही रुपये दिसले... तो फेज सहज काढता येईल इतके...
कुठून आले - कुणी ठेवले हे कुणीच सांगितलं नाही, सांगत नव्हतं... तो फेज निघाला, प्रॉब्लेम्स संपले आणि नंतर समजलं तुषारने माझ्या नकळतच ते घडवलं...
कुठल्याही शब्दांत व्यक्त होवू शकत नाही अशी गोष्ट आहे ही... Speechless करणारी... !
..
क्रिकेट खेळतांना लवकर आऊट न होण्याचा चिकटपणाही त्याच्याकडे आहे... तो उत्तम गातो... तो ६०० किमी ड्रायविंग एक दिवसात न थकता करतो... माझ्यासाठी काही मोक्याच्या-भानगडीच्या क्षणी तो गेम चेंजिंग रोल प्ले करतो ... कुठून शिकला माहित नाही, पण तो इंडोनेशिअन भाषा fluently बोलतो... !
..
By Profession
He is Jr. Civil Engineer at Dhule (City).
By Qualification He is BE Civil Engineer, BBA and Diploma MCJ
Pursuing Madhya Pratham (4th level of 7) in Singing.
...
Happy Birthday Tushar... खूप मोठ्ठा हो... ! आपली साथ एकमेकांना कायम अशीच राहणार... **touchwood*** bless you always....

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved