Engineers Day 2017
इंजीनिअरची डिग्री येते चार वर्षात - आठ सेमिस्टर, ४०-५० विषय, प्रॅक्टीकल्स वगैरे आवरतं... पण ते भिनायला कुणाला जीवाचं Java करावं लागतं तर कुणाला जीवाचं concrete करावं लागतं... इतकं सहज नसतं ते !
.
इंजिनीअर माणूस वरुन सिमेंटसारखा निगरगट्ट दिसत असला तरीही त्याचं ऋदय कापसाचं असतं... एखाद्या माऊलीला तिने जन्माला घातलेल्या बाळाचं जितकं कोडकौतूक असतं तितकंच इंजिनीअरला त्याच्या प्रॉडक्टचं असतं... तितकंच ! ते बाळ पहिल्यांदा हातात घेतल्यावरचा आनंद त्या आईच्या डोळ्यांतून वाहतो - तितकाच काम पूर्ण होवून हँड ओव्हर करतांना त्या इंजिनीअरच्या डोळ्यातूनही वाहतो... त्याशिवाय डिग्री सार्थकी लागत नाही... !
..
एखादं घर बांधलं तर त्यासमोरुन जातांना नजरेनेच तो ते घर कुरवाळतो... आपण बनवलेली वेबसाईट दिवसात एकदातरी प्रेमानं फिरून येतो... कारण त्यात त्याचा जीव अडकलेला असतो... तोच जीव - कुणाचा concrete तर कुणाचा Java... !
..
इंजिनीअर घडवतात !
सोपेपणा आणतात...
Engineering is a thrill... भारी असतं ते...
मी जर इंजिनीअर नसतो तर काय असतो ?
कदाचित मी नसतोच... थोडक्यात - हे माझं आयुष्य, जीव, प्राण, पोट वगैरे आहे...
म्हणून आदर, अभिमान आहे.
...
व्यावसायिक इंजीनीअर्स सारखी अजून एक जमात आहे,
घरगुती इंजिनीअर्स -
यात कूकरची शिट्टी रिपेअर करणं, पाईपलाईनमध्ये काड्या करणं, तुटलेल्या वस्तूंची जोडजाड करणं वगैरे कामं असतात...
व्यावसायिक इंजिनीअर्सना इंजीनिअर, डेव्हलपर वगैरे म्हणतात.
घरगुती इंजिनीअर्सना नवरा म्हणतात !
Jokes Apart.....
..
Happy Engineers Day - All of US... !
Congratulations and Proud to be an Engineer ! .... Majjani Life....