Posts

Dhule, Gote and Elections

Image
धुळे शहरात तुला ना मला घाल ...ला.... . लोकसंग्रामचे गोटे, अपक्ष कदमबांडे यांच्या लढतीत एमआयएमचा उमेदवार निवडून आलाय...! . माझं मतदान याच मतदारसंघात आहे... . हे धक्कादायक झालंय...! .. काय झालं ? धुळे शहरात मतदान झालं ५० टक्के - त्यालाही कमी. अनिल गोटे यांचा पिंड संघाचा आहे, आणि धुळ्यात त्यांनी केलेली कामे तुफान आहेत. त्यामुळे लोकांनी ३ वेळा केवळ त्यांच्या नावावर निवडून दिलं. अगदी यावेळी देखील तेच येतात असं चित्र होतं. भाजपचे आमदार अनिल गोटेंनी आधी महापालिका, मग लोकसभेवेळी भाजपाची पिसे काढली होती. ज्यामुळे गिरीश महाजन शहरात येऊन अनिल गोटे कसे जिंकतात हे मी बघतोच वैगेरे गोष्टी करून गेले. शहर विधानसभा सुटली सेनेला - आणि सेनेने जो उमेदवार दिला तो मुळात शहरात लढायलाच तयार नव्हता. त्यांचं होमपीच धुळे ग्रामीण (धुळे बाह्य भाग) आहे. त्याला ऐनवेळी उभा केला. त्यामुळे अर्धी लढाई इथेच संपली. दुसरा उमेदवार अपक्ष उभा होता (फुगा)... ज्यांच्याकडून गोटेंना फाईट मिळेल असं वाटलं. ते उमेदवार आधी राष्ट्रवादी मधून बाहेर पडले, आणि अपक्ष लढले. जिथे शहरात विकास हा एकमेव मुद्द

आरेचं जंगल

Image
आरे मिल्कमध्ये घर घेतांना तिथलं निसर्ग हे एकमेव कारण समोर ठेवलेलं... मुंबईच्या गर्दीत राहूनही शहरापासून बाहेर, जंगलाच्या मध्यात राहण्याचा अनूभव देणारं ते ठिकाण आहे. चार लाखाच्या आसपास असणाऱ्‍या डेरेदार वृक्षांमूळेच मुंबईच्या धोकेदायक प्रदुषणातही किमान उपनगरांत तरी वातावरण संतुलीत राहतंय. . सरकारच्या बाजूचा गट सांगतोय... - मेट्रो कारशेड अत्यावश्यक आहे. आरेतल्या चार लाख झाडांपैकी सत्तावीसशे तोडली तरी फार फरक पडणार नाही. समोरच्या गटातील मंडळी राजकारण करताय वगैरे ... . तूर्तास मान्य ! वृक्षतोडीस विरोध करणारा गट राजकीय हेतू मनात ठेवून स्पॉन्सर्ड असेल. त्यांचं बॅकीँग कुणीतरी भलतंच असेल... पक्या वगैरे मंडळी फोटोसाठी थोबाड घेवून आलीत... मान्य ! . पण आरे परीसरात राहण्याचा अनुभव, आणि झाडांची वाढ, फायदे, प्रदुषण, झाडांची गरज यां मुद्यांवर किमान प्रिप्रायमरी पर्यँत झालेलं शिक्षण यांचा विचार केला तरीही झाडांची कत्तल चुकीचीच आहे हेच कळतंय... . ज्या अवस्थेत झाडं कापली ती वाढायला सरासरी किमान तीन वर्ष लागतील. जास्तही ! त्यापेक्षा कमी नक्कीच नाही... झाडं कापायला दोन

RIP विजू खोटे

Image
मराठी वा हिँदी चित्रपटसृष्टीत बरीच मंडळी सहकलाकार म्हणून जन्माला आली, सहकलाकार म्हणूनच संपली... अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चनना तोडीस तोड असूनही आणि अख्खी हयात इंडस्ट्रीला देवूनही चित्रपटाचे मुख्य नायक होणं त्यांच्या नशीबात नव्हतं... तरीही, भारतीय चित्रपटसृष्टीतलं मानाचं पान ते ठरले - अध्याय ठरले ! त्यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. . "विजू खोटे" हा अध्याय आज संपला ! चित्रपटसृष्टीतलं विजू खोटे पर्व संपलं. . भारदस्त आवाज, करारी चेहरा, आणि जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या या माणसाने पदरी पडलेल्या खलनायकी भूमिकांचं सोनं केलंय. "कितने आदमी थे ?" या ऐतिहासिक प्रश्नाचं ऐतिहासिक उत्तर देणारा आवाज शांत झाला. . विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - तेजस कुळकर्णी

पीएमसीच्या निमित्ताने -

Image
पीएमसीच्या निमित्ताने - . सहकारी बॅँका ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था आहेत. आणि या क्षेत्राला शतकोत्तर इतिहास आहे... असं असलं तरीही, सहकारी बॅँका आणि राष्ट्रीयकृत बॅँका यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे... रात्री शांत झोप हवी असेल तर पैसा राष्ट्रीयकृत बॅँकेत ठेवा. . सहकारी बॅँकेचं व्याजदर आत्ता १०-१२ टक्के आहे, राष्ट्रीयकृत बॅँकांचं ६-७ टक्के... पण सहकारी बॅँकांना सरकारी कव्हर हे असून नसल्यासारखं असतं. तिथे राष्ट्रीयकृत बॅँकेतला पै न पै सरकारची जबाबदारी असते. पूर्वी राष्ट्रीयकृत बॅँक ांची संख्या आणि शाखांचा विस्तार मर्यादित होता. मोठ्या शहरांमध्येच फक्त शाखा असायच्या. त्यामूळे ग्रामीण भागात सहकारी बॅँक, पतपेढ्यांचं पेव फुटलं होतं... ज्याचं सार्वभौमत्व संचालक मंडळाकडे आहे. कारखान्यांवर काम करणारी माणसं, शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय यांनी पै न पै साठवून या संस्था वाढवल्या... बॅँकाच्या तुलनेने दुप्पट व्याजदर, सहज कर्ज देणं या बळावर ठेवीदार वाढवले आणि संस्था फुगल्या. यातूनच बऱ्‍याच पुढाऱ्‍यांचा जन्म झाला. . सारस्वत सारख्या संस्था अजूनही जिवंत आहेत. परंतू बऱ्‍याच सहकारी संस्था या त्यातील संचालका

"बाप्पाला निरोप"

"बाप्पाला निरोप" हि कंन्सेप्ट मूळातच वाह्यात आहे. त्यात ते रडणं बिडणं तर अति होतं... सूतक पडल्यासारखं तोँड पाडून बसायचं काय, रडायचं काय... अति भक्ती दाखवण्याचे प्रकार आहेत हे ! . आज फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव संपतो ! गणपती बाप्पा पृथ्वीतलावरुन पुन्हा वर्षभरासाठी निघून जातात वगैरे असं काहीही नसतं. मूळात उत्पत्ती-स्थिती-लय या तिन्ही अवस्थांचं मूळ जिथे आहे त्यांना पृथ्वीवरुन घालवणारे आपण कोण ? मूलाधार चक्रात, चराचरात, ध्यान्यात, देव्हाऱ्‍यातही ते आहेत ! . गणेशोत्सवाच्या आधी ते पार्वती लहान गणपतीला खाऊ वगैरे भरुन देते, गणपती भावूक होतात वगैरे व्हॉटस्अॅपच्या शोधानंतरचे चाळे आहेत. कामधंदा नसलेल्या कवीँचे. आता उद्यापासून पार्वती विचारणार की काय केलं बाळा पृथ्वीवर दहा दिवस ? चे मेसेजेस सुरु होतात. . ते एखाद्या लग्नात बिदाईच्या वेळी ज्याचं देणं न घेणं तो रडायला लागतो, कारण तसंच वातावरण तयार होतं. सेम तेच लोकांनी आजच्या दिवसाचं केलंय.... गणपती चालले, आता वर्षभरानेच भेटणार... काहीँना कसलंच नसतं - उद्यापासून पार्टी-शार्टी सुरु करण्यासाठी ते मनात पक्क हेच ठरवतात. उद्यापासून वर्षभर ऐ न च

RIP जेटली

Image
सुषमा स्वराज, पर्रीकर, मुंडे, अनंथ कुमार, प्रमोद महाजन आणि आज जेटली ! भाजपाचे हे चेहरे कमी वयात गेले... सगळे एकापेक्षा एक विद्वान, प्रकांड पंडीत असलेले... ! त्यांच्या निधनाचं दु:ख झालं कारण त्यांचे पाय जमीनीवर होते. ते तत्वाने जगले... ! भाजपाच्या जडणघडणीत या मंडळीँनी आयुष्य वेचलंय... संघाची बळकट माणसं होती ही. . अर्थमंत्री आणि मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स म्हणून जेटलींचे काही निर्णय वैयक्तीक न पटणारे होते. पण तो एक भाग सोडला तर त्यांची विद्वत्ता, वत्कृत्व, भाजपाच्या वरच्या फळीतलं नेतृत्व आणि कायद्याचं ज्ञान याला तोड नाही... संसदेत बोलायला उभे राहीले की विरोधकही बेँच वाजवायचे... ! कॉँग्रेसच्या बऱ्‍याच नेत्यांची मुलं जेटलीँकडे इंटर्नशीप केलेली...! ते कायद्याचं विद्यापीठ होते. मोदीँनी नोटबंदी, जीएसटी, बॅँक मर्जीँग असे भव्य निर्णय जेटलींच्या भरवश्यावर घेतलेय. जेटली भले मास लिडर नव्हते, पण भाजपाचं पान त्यांच्याशिवाय हलणारं नव्हतं. . अरुण जेटली भाजपासाठी थिँक टॅँक होते. भाजपाची इंटलअॅक्च्यूअल प्रॉपर्टी होते... भाजपाच्या मूळ तत्वाचा चेहरा अरुण जेटली होते... ! भाजपासाठी ते संकटमोचक ह

वरची रेषा मोठी करण्यासाठी खालची रेषा लहान काढावी लागते

Image
एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल किँवा निवड करण्यात गडबड होत असेल तर साधं आणि सोप्पं काम करावं - त्यापेक्षा वाह्यात गोष्टीचा अनूभव घ्यावा... मी अनेकदा असं ट्राय केलंय... . बायकोला गोरेगांवला आवडत नव्हतं. काही ना काही कमी वाटायचं... माझं ऑफीस अंधेरीत, आणि आधीपासून सवय वेस्टर्नची आहे त्यामूळे मी शक्यतोवर वेस्टर्नलाच राहण्याचा ट्राय करतो... मागचा पुर्ण आठवडा तिला फिरवलं... नालासोपारा, वसई रोड, विरार पर्यँत. सेँट्रल लाईनला उल्हासनगर, बदलापूर वगैरे, नवी मुंबईत पनवेल पर्यँत... आता  गोरेगांव आमच्यासाठी स्वर्ग झालंय  :-D . मी स्वत: पुणे की मुंबई अश्या निवडीत अडकलो होतो. तेव्हा एकीकडे मुंबईतल्या इंडस्ट्रीचे फोटो लावले आणि दुसरीकडे पुण्यातल्या मंडईचे... मला तिथली टिपीकल कचकच आवडत नाही. त्यामूळे मुंबईची निवड मला सहज वाटली. . करंट अकाऊंट महाराष्ट्र बॅँकेत उघडावं की नको याच्या विचारात होतो. मी एक दोनदा एसबीआय जावून आलो. आता महाराष्ट्र बॅँकेत अकाऊंट आहे. . गाडी घेवून ऑफीसला जायचं नाही... बाईकवर मस्त वाटतं. .. मनात फूटबॉल सुरु होतं... त्यामूळे रोजच्या ट्रॅकवर मुद्दाम ट्राफीकच्या वेळेला गेलो, पार्कीँ

= बहीण =

काही गोष्टीँना रक्ताच्या नात्याचं कंम्पलशन नसतं... ते कुठेही फुलतं, घट्ट होतं... टिकतं... काही नाती अशीच आयुष्यात आली, बहरली... रक्ताच्या नात्यांइतकीच ती नाती घट्ट झाली... कदाचित कणभर जास्तच ! . ही नाती कुठे जुळली कशी जुळली हे आता निट आठवतही नाही... पण वीण घट्ट आहे. . पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्या वडीलांची ट्रिटमेँट सुरु होती आणि त्यात कुठलीशी फॉर्म्यालिटी करण्यासाठी ओळख हवी होती. तिचा मला फोन आला, फॉर्म्यालिटीज पुर्ण झाल्या. पुढच्या रक्षाबंधनाला राख्या आल्यात. वैयक्तीक नातं कौटूंबिक झालं... ! ७ वर्षाँपासून आता दर रक्षाबंधनाला राख्या येतात. दर आठवड्याला फोन येतात. तिला माझ्या घरी सख्ख्या मुलीप्रमाणे समजतात... तिच्या नवऱ्‍याविषयी सख्या मेव्हण्यासारखा आदर वाटतो... सख्खी मोठी बहीण असती तर तिने जो जीव लावला असता तोच सायलीदिदी लावतेय... ती कुणालाही सांगतांना तिला तीन भाऊ असल्याचं सांगते...! नशीबानं मिळतात काही गोष्टी.. !. . मयुरी-वर्षा... नाशिकच्या दोघी बहीणी. कुठे ओळख झाली, कधी झाली आठवत नाही... राखीसाठी येतात, भाऊबीजेला येतात. कुटूंबही एकमेकांशी दुधात साखर एक व्हावी तशी झाली..

सुषमा स्वराज

Image
जाणारं माणूस जातं, नंतर उरते ती भयाण शांतता. अनेक प्रश्नांचं काहूर मनात साचत जातं - ज्यांची उत्तरं कधीही मिळत नाहीत ! सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं देश हळहळला. पण आज एका माणसावर नियतीने जो घाला घातलाय त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. . ते म्हणजे सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल ! . निवडणूकांपूर्वी जेव्हा सुषमाजीँची मुलाखत झाली तेव्हा त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देतांना "आता माझा पुर्ण वेळ पती, कुटूंबिय यांना देणार" असं जाहीर केलं. ट्विट पण होतं. त्यावेळी त्यांचे पती तिथे होते. प्रचंड आनंद होता त्यांच्या चेहऱ्‍यावर... त्यांनी सुद्धा ट्विट, टिव्ही यांना मुलाखत देऊन आपला आनंद व्यक्त केलेला. . केँद्रात मंत्री असणारी पत्नी - त्यामूळे समाजकारणाभोवती केँद्रीत झालेला संसार, प्रोटोकॉल्स, शेड्यूल यांत कौटूंबिक गोष्टीँचा त्यागच करावा लागतो. सुषमा स्वराज यांच्या राजकीय निवृत्तीने त्या माणसाला मनापासून आनंद झालेला. राजकारणामूळे हरवलेल्या क्षणांना परत मिळण्याचं सुख त्यांच्या चेहऱ्‍यावर दिसत होतं. . नियतीला ते बघवलं नाही. आत्ता तर संसार सुरु झालेला, इतक्यात संपला ! कालचा दिवस

370 - 35 A

Image
लोकसभेत कॉँग्रेसच्या सदस्यांनी आत्ता परत फारुख अब्दुल्ला बद्दल बाउंन्सर टाकला... अमित शहांनी चौथ्यांदा अधिकृत स्टेटमेँट दिलं... की फारुख अब्दुल्ला जेल, नजरकैदेत नाही. त्यांची तब्येत पुर्ण ठणठणीत आहे - ते बाहेर येत नाही तर कनवटीवर बंदूक लावून तर बाहेर आणू शकत नाही... जर आजारी आहेत तर हॉस्पीटल मध्ये जावं..."... . स्पिकर ओम बिर्ला सुद्धा भारी माणूस आहे. ओठांवर आलेलं मिश्कील हसू दाबत त्यांनी अमित शहांना चेअर कडूनच निर्देश केलं... "डॉक्टर्सकी टिम बनाकर आप फारुख अब्दुल्लाजी के घर  भेज दो, और जानकारी लो..." . झालं ! ये लगा सिक्सर... कॉँग्रेसचा नो बॉल ठरला.  :-D फारुख अब्दुल्लाचं देणं न घेणं झालं बेणं...! आता बाहेर यावं लागणार, स्टेटमेँट द्यावं लागणार ! नाही दिलं तर सभागृहातल्या त्यांच्याच सदस्यांच्या तोँडावर मारलं जाणार... तब्येत खराब बोल्ले तर डॉक्टर तयार, आता कॉँग्रेसच्या सदस्यांना फारुख अब्दुल्लाच्या नावाचा वापर करता येणार नाही... :-D . नाक दाबून तोँड उघडणं काय असणं ते असं असतं ! 

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved