Fact

काल लावलेल्या झाडांपैकी बरीच झाडं दिवसभरात मोकाट गुरांनी खाल्ली, काही झाडं फुकट्यांनी नेली, तर रस्त्यावर अडचण होते म्हणून चालणाऱ्यांनी बरीच तोडली...
महापालिका आता खड्डे बुजवायला टेंडर काढतील.
.
वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, डस्टबीन ठिकठिकाणी आहेत. पण उघड्यावर बसायची आणि आहे त्याच ठिकाणी घाण टाकायची सवय जात नाही.
वारी पुढे सरकली की तिथे पुढचे चार दिवस बघायलाच नको...
(सदा दुखी भावनांना आवर घालून मुद्दा समजून घ्या.)
.
येत्या ६ ला तर मत पूछो भै...
७ ला सफाई कामगारांचे जीव जातील...
(सदा दुखी भावनांना आवर घालून मुद्दा समजून घ्या.)
.
सरकारने स्वतःची मान कापून समोर ठेवली तरी उपजत दळभद्री लक्षण असल्याने यांना फरक पडणार नाही... चांगलं सहन होत नाही च्यायला... स्वच्छ भारत होईल, आधी वैयक्तीक स्वच्छता करू देत...
भावना बाजूला ठेऊन प्रॅक्टीकल व्हा...
.
गुटखा खाणाऱ्यांना चौकात फोडायला हवं... गुटखा खाऊन थुंकतांना दिसला की बमकाव तेच्यामारी.. सगळ्यांना फूल फ्रिडम.
.
जर सरकार ९० पावलं पुढे येतंय तर, १० आपण चालायला नको ?
वारी पुढे गेल्यानंतर राहणारा कचरा,
इफ्तार नंतर उरणारा ढिग...
हे कोण आवरणार ?
काल लावलेली झाडं चालणाऱ्यांनीच तोडलीत...
कशासाठी ?
.
कसंही वागायला राज्य काय बापाची जहाँगीर समजलाय कां ?

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved