Eid Mubarak
डॉ. ए.पी. जे. ए. कलाम..
ए.आर. रहमान... उस्ताद झाकीर हुसैन... बिसमिल्लाह खान...
शमशाद बेगम, मोहम्मद रफी साहेब...
यांचा आदर्श ठेवणाऱ्या,
.
मुस्लीम वस्तीतल्या अनाथ हिंदू विधवेची मृत्यूनंतर हिंदू विधीवत अंत्ययात्रा काढणाऱ्या आणि स्मशानात गुरुजी बोलावून प्रेतसंस्कार करणाऱ्या मुसलमानांना...
.
भाजपा प्रवक्ते शहनावाज हुसैन...
पशूहत्येचा विरोध करणारा इरफान खान..
गणपतीला दरवर्षी ५०१ ची वर्गणी देणारा जावेदभाई...
"तेजाभाय तेरेसे क्या पैसा लेना" म्हणत गाडीत फुकटात हवा भरून देणारा इरफान..
दिवाळीला न चुकता गिफ्ट देणारे आसमाँ, सलमा, अरमान, रझा, फैयाज सारखे मित्र-मैत्रिणी...
आमच्या दुकानात दरवर्षी दिवाळीसारखीच तगडी उलाढाल रमझानच्या महिन्यातही होते... पेमेंट करतांनाही पप्पांना, मला, "शिरखूरमा खाने पधारना सेठ, पिछले साल की तरह भूलना मत" म्हणत आग्रहाने बोलावणारे, आणि नाही गेलो तर आठवणीने दुकानात किंवा घरी डबा भरुन शिरखूरमा आणून देणारेे जिव्हाळ्याचे ग्राहक...
आणि रोजच्या जीवनातले अनेक
निरूपद्रवी,
इथल्या मातीशी एकरूप झालेले,
बंधूभाव जपणारे
मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना म्हणत गुण्यागोविंदाने राहणारे
चांगले मुसलमान...
...
यांनाच ईदच्या खूप शुभेच्छा...
.
- तेजस कुळकर्णी