अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी....

''अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी....
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रिती..."
पाडगावकरांच्या दर्दभऱ्या ओळींना यशवंत देवांनी तितकंच आर्त संगीत दिलंय... आणि भावगीतांचे भगवंत अरुण दातेंनी अक्षरशः जीव ओतलाय यात...
ऐकलं... म्हणायचा ट्राय केला...
.
"तेजा आतून नाय येतय राजा... पून्हा एकदा ट्राय कर..."
राजा... राजा... करत पाच - सहा वेळा झालं...
तरीपण समाधान होईना... आतून येईना...
काय करायचं ?
आजींनी गुगली टाकली...
- कॉलेजचं प्रेम आठव... प्रेमभंग आठव... त्याशिवाय नाही येणार आतून !
- कॉलेजचं प्रेम त्यात पण प्रेमभंग...
हे म्हणजे परवा खालून वरुन जोरदार पाणउतारा झालेल्या "त्या" माणसाने "मी पंतप्रधान झालो तर" असा वस्तूनिष्ठ निबंध लिहीणं आणि त्यात पहिलं बक्षीस मिळवणं वेग्रेे...
"नाय येणार ब्बॉ.... प्रेमभंग वगैरे नाय झालंय कधीच... प्रेमच नाय, तर प्रेमभंग कुठे ? - आडात नाय तर पोहऱ्यात कुठून येणार..."
- मग गाणं बदलूयात कां ?
ठिकंय...
.
आधी मी आगाऊपणा करुन हे गाणं घेतलेलं, तंगडं गळ्यात पडलं,
नानांचंही काय वेगळं झालं ?
त्यांनी पाय आपटला, आव्हान दिलं, त्यांनीच गाडलेलं म्हडं उकरलं गेलं...
.
निघतांना माझा चेहरा सेम तस्साच झालेला,
जसा
परवा विपतून निघतांना नानांचा झाला असावा तसा...
...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved