Helmate

हेल्मेट असेल तर पेट्रोल मिळेल ही शुद्ध चुतीयागिरी आहे... आणि सगळ्यांनी मिळून उधळून लावायला हवंय !
कारण यामूळे फक्त उद्धट पेट्रोलवाल्यांची चांदी होणार इतकंच. जर खूप घाईत हेल्मेट विसरलो, किंवा अपरीहार्य कारणाने (फॉर एक्स डोकं फुटलंय, मान दुखतेय वगैरे) घातलं नसेल आणि गाडी ठणठण असेल, emergency असेल, तर एकतर त्यांच्या दे भाऊ करत पाया पडा, किंवा ५-१० रुपये लिटरमागे जास्त मोजा...
काळा बाजार वाढेल...
परत मागे बसलेल्यांनापण हवंच... ISI मार्क असलेलंचं हवं वगैरे नाटकं आहेच !
.
ज्याच्या डोक्यातून हे आलंय तो माणूस एकतर स्टार प्रवाह-झी मराठीचा नियमित प्रेक्षक असावा, किंवा यूगपूरुष केजरीवाल त्याचे आदर्श असावेत... नाहीच काही तर महागुरु पिळगांवकर त्याचे गुरु असावे...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved