गुरुपोर्णिमा

गुरुपोर्णिमा
जितकी अक्कल पुस्तकं वाचून, शिकवून येत नाही तितकी एकदा अनूभवातून येते...
अनूभव माणसाला शहाणं करतं.
अनूभवातून बऱ्याच गोष्टींना उत्तर मिळतं.
.
माझ्या अनुभवाचे ग्रंथ !
माझे गुरू...!
१० वर्षांपासून मी दररोज न चुकता डायरी लिहितो... पूर्वी आलेल्या अनूभवांतून, घटनांतून शिकतो...
भूतकाळात वर्तमानातील अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली असतात...
.
"तेजा... समोर खड्डा आहे, पडला तर लागतं आणि खूप दुखतं... मागे दुखलं होतं नं तसं !" - आणि मी सांभाळून चालतो !... खड्ड्यात पडण्यापासून वाचतो... माझा अनूभव वाचवतो !
आणि नकळत पडलोच तर पून्हा वर येण्यासाठीची धडपडही तो अनुभवच शिकवतो...
.
कठीण काळात फक्त अनूभव आणि आपलं मन यांवरच आपण टिकू शकतो...
.
जन्मापासून मृत्यूपर्यंत सदासर्वकाळ सोबत राहणाऱ्या, सदैव जागृत राहणाऱ्या आणि प्रामाणिक मार्ग-दर्शन करणाऱ्या स्वानूभवरुपी गुरुंचे कृतज्ञतापूर्वक स्मरण...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved