Posts

Showing posts from June, 2017

GST 2

जीएसटी बद्दल खूप संभ्रम आहेत, आमच्या सारख्या छोट्या उद्योजकांची पुरती कोंडी झालीये, CA म्हणतात अजून काही सांगू शकत नाही १ जुलै नंतरच सगळे चित्र स्पष्ट होईल.... .. ह्यात कसली आलीये गोपनीयता ?? टॅक्स भरणाऱ्यांना कळायला नको का तांत्रिक बाबी ? परवा एका कार्यक्रमात भाजपचे राज पुरोहित म्हणाले की विश्वास ठेवा मोदी सगळे चांगलेच करणार आहे. विश्वासावर टॅक्स प्रणाली चालते ??  .. नोटबंदीवेळी झाला त्यापेक्षा भयाण आणि जास्त गोंधळ उद्यापासून होईल...  . याहीपेक्षा वाईट घडणारी गोष्ट म्हणजे संघराज्य व्यवस्था, राज्यसरकारे, महापालिका आर्थिकदृष्ट्या केंद्राच्या ताब्यात जातील... स्पष्ट शब्दात सांगायचं तर भिकारी होतील.. आपण जो टॅक्स भरू तो केंद्रात जाणार - तिथून राज्यांना ग्राहकसंख्येवरुन तो देण्यात येईल... केरळ, उत्तर प्रदेश आणि बंगाल यांना जास्त वाटा मिळेल... थोडक्यात मी महाराष्ट्रात राहतो - पुण्यात चित्रपट पाहीला त्यावर १८ टक्के टॅक्स भरणार, तो टॅक्स पुण्याच्या नाही तर यूपीच्या रस्त्यावरचं खड्डं बुजवणार... महाराष्ट्र बसणार केंद्राकडे दे माय करत... ! . अप्रत्यक्ष्य परीणाम नागरी विकासकामं... शेवटच...

GST And Confusions

Image
जीएसटी बद्दल बराच गोंधळ आहे, सामान्य नागरीक राहीले ठिकाणावर, छोट्या मोठ्या कंपनीचे सीईओ (ज्यांना जास्त मार पडणार आहे...) सीए,सीएस सुद्धा गोंधळलेले आहेत... नेमकं प्रकरण काय ह...

HitlarKaka

सोसायटीत काही लहान मुलं क्रिकेट खेळत होती... खेळता खेळता छोटाश्या कारणाने भांडण झालं... एकमेकांच्या गचांड्या पकडून पार पटकून पटकून आपटणं सुरु होतं... दे दणादण... . इतक्यात बर्व...

HajiAli

Image
बरीच स्थानं आहेत जी आशिर्वाद देतांना हिंदू मुस्लीम बघत नाहीत... मनापासून केलेली प्रार्थना तिथे फळाला येते... काही अनुभव येतात आणि ती स्थानं श्रद्धास्थानं होतात... ! "दरगाह" हे मुस्लीम पंथाचं जागृत स्थान... मुस्लीमच नाही तर हिंदू धर्मीयही मनापासून दरगाह समोर नतमस्तक होतात... ! .. "हाजीअली" हे माझं श्रद्धास्थान... मी तीन ठिकाणं माझं घर समजतो... हक्काचं स्थान असावं असं... ! एक : गाणगापूर, दोन : शेगांव आणि तिसरं मुंबईतला हाजीअलीचा दरगाह... ! . दरगाह हे मूळातच जागृत असल्याची प्रचिती अनेक घटनांतून मिळालीय... हाजीअलीच नाही, तर इतरही अनेक... ! धुळ्यात आमच्या घराशेजारी एका पडक्या वाड्यात दरगाह होता... तिथे ते पिरबाबाका ठाणा म्हणून प्रसिद्ध आहे. पण वाडा पडला तसं ती जागा दुर्लक्षित झाली. वाड्याच्या ढिगाऱ्यात दाबली गेली. नंतर तो वाडा विकत घेऊन टॉवर बांधायचे प्रयत्न अनेकांकडून झाले, पण काहीतरी व्हायचं आणि काम बंद पडायचं... पाच वर्षांपूर्वी एका माणसानं तो घेतला, आधी तो दरगाह शोधून त्याचं व्यवस्थित बांधकाम केलं... एक फकीर सेवेसाठी ठेवला. नंतर त्याचं बांधकाम कुठल्याही अडचणीशिवा...

Cinematic Wedding

लग्नाची Cinematic फोटोग्राफी, व्हिडीओ फील्म तयार करण्याच्या नादात मूळ गाभा हरवतो... आणि Artificial क्षण तयार करण्यासाठी खऱ्या क्षणांशी छेडछाड होते... ! एका मित्रानं तीन लाख रुपये खर्च करून स...

Happy Birthday ABP Majha

Image
Happy Birthday ABPMajha २४ तास बातम्या देणारं पहिलं मराठी न्यूज चॅनेल स्टार माझा बरोब्बर दहा वर्षांपूर्वी सुरु झालं. सहज भाषा, आकर्षक आऊटलेट, आपले वाटणारे विषय आणि २४ तास मराठी बातम्या या बळ...

Cricket Legends

जम्बो (अनिल कुंबळे) द वॉल (राहूल द्रविड) दादा (सौरव गांगुली) VVस्पेशल (व्ही.व्ही.एस लक्ष्मण) मास्टर ब्लास्टर (तेंडूलकर सचिन) .. दुसऱ्या गृप मध्ये विरेंद्र सेहवाग गौतम गंभीर हरभ...

President Election नांदी !

Image
राष्ट्रपती निवडणूक २०१७ चा शंख निवडणूक आयोगानं फुंकलाय.... राष्ट्रपतीपदाच्या संभाव्य लढतीत जी नावे समोर आली ती किती पात्र किती नाही हा भाग वेगळा, पण - अमिताभ बच्चन, रतन टाट...

Nitin Gadkari

Image
नेत्यांमध्ये फार थोडी नावं आहेत ज्यांची भक्ती करावी... ! नितीनजी गडकरी हे त्यातलंच एक नांव... चाणाक्ष, हुशार, कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू माणूस... आपल्याला मिळालेल्या जबाबदारीची जाणिव ठेवून निरपेक्ष भावनेने ते विकासाचं काम करत असतात... इन्फ्रास्ट्रक्चर - रस्तेबांधणीमध्ये या माणसाच्या प्रशासकीय बुद्धीमत्तेची बरोबरी कुणीही करू शकत नाही... सखोल अभ्यास करून, एक एक कडी जोडत ते भव्य, उदात्त कामाची साखळी सहज तयार करतात... आणि काम पूर्ण झालं की त्याचा गवगवा न करता पुढच्या कामाकडे वळतात... अजातशत्रू असलेला हा माणूस प्रत्यक्षात तितकाच साधा आहे... ! . सावित्री पुल दुर्घटनेनंतर नव्या पुलासाठी १८० दिवसांचं (६ महिन्यांचं) वचन देऊन कामाची निविदा काढणं ते लोकार्पण हा रुटीन शेड्यूलमध्ये सात आठ वर्षांचा प्रवास यांनी अवघ्या ५ महिने १५ दिवसात (१६५ दिवसात) पूर्ण केला. काम घाईत उरकलं आणि येवून फोटो काढले असं नाही तर स्वतः जातीनं लक्ष घालून संपूर्ण काम प्रामाणिकपणे दर्जेदार, मजबूतरित्या पूर्ण करून घेतलं, पुढची १०० ते १५० वर्षासाठी सोयीचा ठरेल असा भक्कम पूल बांधला आणि दिमाखात त्याचं लोकार्पण केलं... .. साधेप...

शंभराची नोट

Image
काही गोष्टी या कालातीतअसतात... आणि त्या गोष्टींवर माझं खूप प्रेम आहे... काही नोटा पण... एक रुपयाची नोट, एक रुपयांचं जुनं जाडसर नाणं, दोन रुपयांची नोट, पाचचं जुनं डबल लेअर्ड नाणं, ...

Environment Day

Image
प्रोजेक्ट रिपोर्ट - मारा प्रिंट... ऑडीट करायचंय - मारा प्रिंट... अर्ज करायचाय - मारा प्रिंट... केवायसी हवं - मारा झेरॉक्स्... परीक्षा आली - लिहा रद्दी... काहेका डिजीटल इंडिया भायो... इथं ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved