Environment Day
प्रोजेक्ट रिपोर्ट - मारा प्रिंट...
ऑडीट करायचंय - मारा प्रिंट...
अर्ज करायचाय - मारा प्रिंट...
केवायसी हवं - मारा झेरॉक्स्...
परीक्षा आली - लिहा रद्दी...
काहेका डिजीटल इंडिया भायो...
इथं पर्यावरण दिनाचे संदेश सुद्धा मोठे मोठे फ्लेक्स छापून देतात,
त्याचं अॅप्लीकेशन पण चार पाच पेपरवर देतात...
सरकारी कामात कागदं नाचवावे लागतात,
डिजीटल इविडन्स कोर्टात सिद्ध करायला मारामार होते...
पाणी वाचवणं म्हणजे एलीयन्सचा किस घेण्याइतकं कठीण वाटतं...
तिथे
पर्यावरण.. बोले तो.. environment वगैरे अंधश्रद्धा आहेत... !