Cinematic Wedding

लग्नाची Cinematic फोटोग्राफी, व्हिडीओ फील्म तयार करण्याच्या नादात मूळ गाभा हरवतो... आणि Artificial क्षण तयार करण्यासाठी खऱ्या क्षणांशी छेडछाड होते... !
एका मित्रानं तीन लाख रुपये खर्च करून सिनेमॅटीक व्हिडीओ फिल्म तयार केली... ती दाखवली... त्यात बरेच एक्स्प्रेशन्स होते, पण नॅचरल वाटत नव्हते, ....
यासाठी दोनदा रिटेक घेतला,
बाबांना रडायची अॅक्टींग जमत नव्हती
एकदा मंगळसूत्र घालतांना नीट एक्स्प्रेशन्स आले नाही म्हणून दोनदा घालावं लागलं ..
फोटोतूनपण बऱ्याच गोष्टी एक तर गायब, किंवा ओव्हर इफेक्ट्सनी डेकोरेट केलेल्या...
सगळं छान, पण बरंच मिसिंग होतं..
लग्नसोहळा नाही, तर चित्रपट वाटलं !
.
त्या मित्राला घोड्यावर बसतांना खूप धडपडावं लागलं..
ते प्रकरण गाजलं... कुजबूज / चर्चा / मस्करी झाली... पण तो अख्खा सिन त्या वेडींग फिल्ममधून गायब ... त्या लग्नाची आयडेंटीटी ठरावी अशी गोष्ट... !
Its not a commercial movie... इथे सगळं चालतं, तेच हवं असतं...
.
मूळात लग्न/मुंज हा सोहळा आहे, त्या सोहळ्यातले प्रत्येक क्षण जगायचे, आणि कुठलाही Artificialness न ठेवता साठवायचे यासाठी फोटोग्राफी... त्यात येणारे एक्स्प्रेशन्स तितकेच नॅचरल हवे... रुसवे फुगवे, येडेचाळे, लाजणं, मज्जा सुद्धा... ज्यांचं लग्न मुंज आहे त्यांनी ते क्षण पूरेपूर भोगायचे.. फक्त व्हिडीयो फिल्म करता नको..
.
लग्नासाठी फोटोग्राफी.. फोटोसाठी लग्न नको.. !
.
सिनेमॅटीक कितीही मस्त दिसलं तरी ते नाटकीच ! तो "सोहळा" पूर्णपणे साठवू शकेल ही शक्ती फक्त साधेपणातच आहे.. !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved