Happy Birthday ABP Majha

Happy Birthday ABPMajha
२४ तास बातम्या देणारं पहिलं मराठी न्यूज चॅनेल स्टार माझा बरोब्बर दहा वर्षांपूर्वी सुरु झालं. सहज भाषा, आकर्षक आऊटलेट, आपले वाटणारे विषय आणि २४ तास मराठी बातम्या या बळावर न्यूजचा राजा या बिरुदावर स्थिरावलं... ! स्टार माझाचं एबीपी माझा झालं.. दरम्यान शेकडो चॅनेल आले - गेले... पण एबीपी माझाचा आपलेपणा कुणाकडेही नव्हता... !
.
तळागाळात पोहचलेलं नेटवर्क, खात्रीदायक बातमी, ओरडणं नाही, आदळ आपट नाही, आकांड तांडव नाही आणि इगो अॅटीट्यूड नसलेली भाषा आणि बातमीच्या मूळापर्यंत पोहचलेले - सामान्य माणसांत रमणारे प्रतिनिधी ही एबीपी माझाची ओळख झाली. पाणी, हुंडा, विज्ञान, धर्म, व्यवसाय उद्योगधंदा, करीयर, संस्कृती, शेती, दुष्काळ यांवरच्या अभ्यासपूर्ण ग्राऊंड रिपोर्टस् सह बाप्पा माझा, देव माझा, दिंडी, जत्रा सारखे धार्मिक कार्यक्रम, निवडणूक वारी, माझा कट्टा, माझा चर्चा सारखे टॉक शो, महाराष्ट्र देशा, मुंबई इस्ट वेस्ट, माझा एक्स्प्रेस सारखे न्यूज शो आणि घे भरारी, खेळ माझा, ढँड्टॅढॅन सारखे मनोरंजनाचे शो असे एक से एक दर्जेदार कार्यक्रम देशभर लोकप्रिय झाले...!
एबीपी माझा महाराष्ट्राचं, सत्ताधारी ते विरोधी पक्षाच्या नेत्यांचंही लाडकं झालं... !
.
एबीपी माझाची शक्ती म्हणजे त्यांचे अँकर्स आणि प्रतिनीधी ! मिलींद भागवत Milind Bhagwat, Ashwin Bapat आश्वीन बापट, Prajakta Dharmadhikari, Reshma Salunkhe, Vilas Bade, Deepak Palsule, ज्ञानदा, Namrata Wagle, Navnath Ban या ऑनस्क्रीन अँकर्सची लोकप्रियता सूपरस्टारला लाजवेल अशी आहे... कुठलाही आवेश नाही, ओव्हर अॅक्टींग नाही, सहज बोलतात... Amit Bhandari चित्रपट विश्वातल्या पत्रकारीतेचा सूपरस्टार आहे... एबीपीचे प्रतिनिधी अपने आपमे सितारे है... मराठवाड्यातला राहूल दादा कुलकर्णी, नाशिककर Nitin Bhalerao, नागपूरच्या गंभीर टोन असलेल्या सरीता कौशिक, मुद्याच्या वर्मावर बोट ठेवणारी रश्मी पूराणिक, Manshree Pathak-Ajay Sonawane... अपूर्वा भालेराव, भक्ती बिसूरे एक से एक हिरे आहेत... एबीपीचा भाग असलेले द्वारकानाथ संझगिरी सर प्रचंड विद्वान माणूस...  बॅकएंड टिमचे दोघं भारी आहेत... नेहमी Smiling Face असलेले Santosh Rawool आणि जबरदस्त व्हॉईसओव्हर देणारे Rahul Khichadi !!
या रथाचे सारथी राजीव खांडेकर सर... पहिल्याच भेटीत - "सर एक बोलायचंय".... यावर "काय रे बाळा ?" अशी गोड सुरुवात करून त्यांनी क्षणात आपलंसं केलं... !
.
एबीपी माझाचा परीवार बघितला, अनुभवला... बोस्टन हाऊस - अंधेरी इथे एबीपीच्या ऑफीसमध्ये केव्हाही गेलं तरी प्रचंड पॉजिटिव्ह एनर्जी मिळते... हसत खेळत काम करणारी टिम, धगधगणारे विषय, ओसंडून वाहणारी चर्चा आणि क्षणोक्षणी वाहणारं नाविन्य... तुम्ही पहिल्यांदा जातात, त्यांचे होतात ! ... एबीपी माझा बरोबर गेल्या तीन वर्षांपासून संबंध आला, बऱ्याचदा ऑफीसला गेलो आणि त्या ठिकाणी १० - १० तास कसे क्षणात गुडूप होतात ही जादू अनूभवली... !
इतर बरेच चॅनेल बघितले, एबीपी वेगळंच !
...
माणसाच्या ऋदयाला हात घालणारे आपले वाटतात, एबीपी गेली दहा वर्ष मराठी ऋदयावर अधिराज्य गाजवतेय... !
ऑनस्क्रिन टू ऑफस्क्रीन .... ही माणसं गोड, चॅनेल देखणं, विश्वासू माणसासारखं... हक्काचं !
...
Happy Birthday एबीपी माझा !
दहावं वर्ष.... शंभरावंही साजरं करू !
संपूर्ण टिमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved