GST 2
जीएसटी बद्दल खूप संभ्रम आहेत, आमच्या सारख्या छोट्या उद्योजकांची पुरती कोंडी झालीये, CA म्हणतात अजून काही सांगू शकत नाही १ जुलै नंतरच सगळे चित्र स्पष्ट होईल....
..
ह्यात कसली आलीये गोपनीयता ?? टॅक्स भरणाऱ्यांना कळायला नको का तांत्रिक बाबी ? परवा एका कार्यक्रमात भाजपचे राज पुरोहित म्हणाले की विश्वास ठेवा मोदी सगळे चांगलेच करणार आहे. विश्वासावर टॅक्स प्रणाली चालते ??
..
नोटबंदीवेळी झाला त्यापेक्षा भयाण आणि जास्त गोंधळ उद्यापासून होईल...
.
याहीपेक्षा वाईट घडणारी गोष्ट म्हणजे संघराज्य व्यवस्था, राज्यसरकारे, महापालिका आर्थिकदृष्ट्या केंद्राच्या ताब्यात जातील... स्पष्ट शब्दात सांगायचं तर भिकारी होतील.. आपण जो टॅक्स भरू तो केंद्रात जाणार - तिथून राज्यांना ग्राहकसंख्येवरुन तो देण्यात येईल... केरळ, उत्तर प्रदेश आणि बंगाल यांना जास्त वाटा मिळेल...
थोडक्यात मी महाराष्ट्रात राहतो - पुण्यात चित्रपट पाहीला त्यावर १८ टक्के टॅक्स भरणार, तो टॅक्स पुण्याच्या नाही तर यूपीच्या रस्त्यावरचं खड्डं बुजवणार...
महाराष्ट्र बसणार केंद्राकडे दे माय करत... !
.
अप्रत्यक्ष्य परीणाम नागरी विकासकामं... शेवटचा घटक ग्राहक यांच्यावर होतोय... घरं - फ्लॅटस् ८ ते १० टक्क्यानी महागणार आहे... पण त्याहीपेक्षा अंशतः जीएसटी कक्षेत येणाऱ्या माझ्यासारख्या लहान उद्योजकांना संभ्रम आहे -
आम्हाला तर खर्चाचे डोंगर दिसताय...
सीएने वाढवलेली फी, रजि. चार्जेस, फॉर टॅक्स जे पडतील ते चार्जेस आणि इतकंही करुन पुढे काय काय वाढून ठेवलंय याचा पत्ता नाही... !
..
यात जादाचे टॅक्स अॅड होतीलच !
जोपर्यंत रुटीन होत नाही - स्पष्ट होत नाही तोपर्यंत गोंधळ गोंधळ गोंधळ...
दुर्देवानं २०१९ त्याआधी उजाडलं तर कल्याण !
..
जीएसटी ४० टक्के फायदा दाखवतंय, तर मागे ६० टक्के गोंधळ घातलाय... ! पछताऐगा इंडीया.. ! त्यात बाबू लोकं आहेतच... कृत्रीम का होईना - महागाई वाढेल + उद्योगांना फटका बसेल... आणि बनाने चले अमरीका - बन गया बिहार होवून २०१९ ला खाड्कन जाग येईल... !
..
थोडक्यात... म्हातारी मेल्याचं दुःख नाही... काळ सोकावेल !