President Election नांदी !

राष्ट्रपती निवडणूक २०१७ चा शंख निवडणूक आयोगानं फुंकलाय....
राष्ट्रपतीपदाच्या संभाव्य लढतीत जी नावे समोर आली ती किती पात्र किती नाही हा भाग वेगळा,
पण - अमिताभ बच्चन, रतन टाटा या मंडळींपैकी कुणीही होवू नाही... ! त्यांना संविधानाचा गंध नाहीय... राष्ट्रपतीपदाची जबाबदारी काय हे शिकतच पाच वर्ष पूर्ण होतील... प्रतिभा पाटील बाईंसारखी गत होईल... खाया पिया कुछ नही ग्लास तोडा बाराना... किंवा
घेणं न देणं फुकटचं कंदील लावून येणं... वेग्रे !
.
लालकृष्ण अडवाणी एक योग्य आणि अनुकूल नाव आहे... ! अनुभवी सुद्धा ! भाजपा मध्ये त्यांचं योगदान बघता त्यांचा यथोचित सन्मान करण्याची ही योग्य संधी आहे
.
सुमित्रा महाजन सुद्धा त्या ताकदीच्या आहेत, पण त्या संसदेत असणं आधिक फायद्याचं आहे, जनरल सिंग, सुषमा स्वराज सुद्धा. ही मंडळी संसदेची ताकद आहे... त्यांनी या टर्मला राष्ट्रपती पदाच्या भानगडीत न पडणंच ठिक... !
..
अजित डोवाल हे एक तगडं नांव आहे... राष्ट्रपती डोवाल, मोदी पीएम, स्वराज परराष्ट्रमंत्री हे त्रिकूट पाकीस्तान - चीनचं ब्लड प्रेशर वाढवू शकतं... !
..
द्रौपदी मूर्मू (आदीवासी चेहरा) आणि थावरचंद गहलोत ही दोन नावंही रेस मध्ये आहे... लेटस् सी ! पण यांचीही गत प्रतिभा पाटील होवू शकते...
.
बाकी अजून कुणाला इच्छा असेल तर विचार करा, वेळ आहे...
१४ ते २८ जून अर्ज भरता येईल,
१ जुलै पूर्वी अर्ज मागे घेता येईल,
१७ जूलै ला मतदान
२० जुलैला मतमोजणी आणि निकाल...
नशीब फळफळलं तर
२६ जुलैला पदभार स्विकारुन २०२३ पर्यंत मज्जानी लाईफ !
आमची आठवण ठेवा फक्त... !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved