Ganesh Visarjan

आज गणपती परत जात नाही, फक्त गणेशोत्सव संपतो...
गणपती विसर्जन नव्हे - गणपती प्रतिमा विसर्जन...
गणपती चराचरात आहे.
..
॥ त्वंगुणत्रयातीतः ॥ त्वंदेहत्रयातीतः ॥ त्वंकालत्रयातीतः ॥ त्वंमूलाधारस्थितोऽसिनित्यम ॥ त्वशक्तित्रयात्मकः ॥ त्वांयोगिनोध्यायंति नित्यम्‌ ॥ त्वंब्रह्मात्वं विष्णुस्त्वंरुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वंवायुस्त्वंसूर्यस्त्वंचंद्रमास्त्वं ब्रहम्भूर्भुवःस्वरोम्‌ ॥
..
गणपती आपल्या शरीरात मूलाधार चक्रावर स्थिर आहे !
..
आज फक्त उत्सव संपला. त्या पार्थिव मुर्तीचे विधीवत पूजा करुन विसर्जन करणं योग्य. गळे काढून अभद्रासारखं रडणं काय, एखाद्या लहान बाळासारखं जवळ घेऊन पप्प्या घेणं काय... देव आहे तो... सोवळ्यातलं देवत्व आहे त्यात... !
..
त्वंवाङमयस्त्वंचिन्मयः ॥ त्वमानंदमयस्त्वंब्रह्मासि ॥ त्वसच्चिदानंदाद्वितीयोसि ॥ त्वंप्रत्यक्षंब्र्ह्मासि ॥ त्वंज्ञानमयोविज्ञानमयोसि ॥
सर्वजगदिदंत्वत्तोजायते ॥ सर्वजगदिदंत्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वजगदिदंत्वयिलयमेष्यति ॥ सर्वजगदिदंत्वयि प्रत्येति ॥ त्वंभूमिरापोनलीनिलोनभः ॥ त्वंचत्वारिवाक्‌पदानि ॥
.
गणपती अग्रदेवता आहे.
हे ब्रह्मांड त्यांचं आहे
त्यांना "निरोप" देण्याची आपली लायकी आहे कां ?
हा सोहळा फक्त अनुभवण्यासाठी, बेभान होवून नाचण्यासाठी...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved