Posts

Adarsh Implosion

Image
३१ मजली आदर्शची बिल्डींग पाडायला छिन्नी हातोडा घेऊन चार वर्ष ठाक ठूक करत बसणार नाही, धक्काही देणार नाही...  किंवा ती एकाच बाजूला पडेल तर  बेंबीच्या देठापासून "आssssssss" ओरडत लेफ्ट टू राईट... राईट टू लेफ्ट पळायची सुध्दा वेळ येणार नाही... काळजी करू नका... . अश्या मोठ्या बिल्डींग पाडण्यासाठी Building Implosion method वापरतात. ज्यात ती इमारत काही क्षणातच मधोमध कोसळते. विषिष्ठ पद्धतीने अंतर्गत आणि बाह्य भागावर दबाव टाकतात. या पध्दतीत त्या इमारतीवरची गुरुत्वाकर्षण धरून ठेवण्याची शक्ती (क्रिटीकल सपोर्ट) कमी होतो, आणि ती इमारत स्वतःचं वजन धरू शकत नाही. चक्कर आलेला माणूस किंवा पत्याचा बंगला कोसळावा अशी ती इमारत बरोबर मध्यभागी कोसळते. ज्यामुळे आजुबाजूच्या इतर भागांना लहान धक्के बसण्याव्यतिरीक्त आणि धुळ सहन करण्याशिवाय इतर काहीच नुकसान होत नाही. . या प्रक्रीयेत इमारतीत तळापासून छोटे स्फोट घडवुन आणतात. आणि फक्त इमारती पाडायचे कामं करणारे Building Implosion Expert ची अख्खी टिम त्याठिकाणी असते. . भ्रष्टाचाराचा आदर्श असलेली बिल्डिंग पडणार. त्यात निघणारं प्रचंड स्टिल, वायरींग, प्लंब...

Congo India

Image
ईस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज अथक प्रयत्नांनंतर सातवा आणि या सिरीजचा शेवटचा नेव्हीगेशन उपग्रह, IRNSS-1G हा PSLV XL C33 या रॉकेटद्वारे आकाशात प्रक्षेपित केला... १ जुलै २०१३ ते आज दरम्यात सात उपग्रह ३६००० किमी ऑर्बीटल उंचीवर प्रस्थापित केले गेले.. यापैकी तीन जीईओ आणि चार जीएसओ ऑर्बीटमध्ये आहेत. ज्यामुळे भारताकडे आता स्वत:चे ग्लोनस आणि जीपीएस साधन निर्माण झाले आहे... भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे साधन खूप महत्वाचे आहे. भारतीय विज्ञान इतिहासातला एक महत्वाचा क्षण झाला... . यापूर्वी भारताला अमेरीकेवर अवलंबून रहावं लागत होतं. त्यामुळे "अब हमारे रास्ते हम खुद तय करेँगे" असे सूचक गौरवोद्गार पंतांनी काढले... . इस्रोचे शास्त्रज्ञ एकापेक्षा एक रत्न आहेत...! या मोहीमेसाठी एपीजेकलामांचाही पाठपुरावा होता... तत्कालीन पंतांनीही बरंच लक्ष घातलं होतं... सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं...! अभिमान बाळगावा अशी माणसं आहेत ही... :-):-) - तेजस कुळकर्णी

सैराट

Image
=सैराट= मंजुळे भौ नी फॅन्ड्री काढला... "उच्चवर्णीय शिस्टीम" च्या विरोधात जब्या ने फिरकावलेला दगड म्हणून तो बकवास सिनेमा थोडा चाललापण... पण त्यात त्याला इतकी अक्कल नाही, शाळेत जाणाऱ्या मुलीवर - (मग ती मराठा असो, ब्राह्मण असो किंवा सो कॉल्ड जब्याच्या भाऊबंदकीतली असो) कुठल्याही मुलाने (तो पण जब्या असो किंवा मराठा, बाह्मण असो ) लाईन मारली, छेड काढली तर त्याला विरोधच होणार... पोरांना फटकेच पडणार... . जब्या ऐवजी त्या मुलीवर तिच्याच जातीतल्या मुलानं लाईन मारली असती तरी त्याचा शेवट हा शोकांतिकाच असता... लहान वयात लग्न लाऊन द्यायला, लफडी करायला परवानगी द्यायला त्या मुलीचे किंवा त्या मुलाचेही पालक वेडे नाहीत... . लहान वयात, शालेय वयात होणारं पाहिलं प्रेम हा खुप हळवा विषय आहे. "शाळा" मध्ये जसा छान हाताळला, त्या मानाने सैराट, फॅन्ड्री थिल्लर वाटतात. बालवयात होणाऱ्या प्रेमाला जातीय रंग दिला तर आपण मोठा तीर मारलाय असं मंजूळेंना वाटत असेल, पण मराठी प्रेक्षक सुज्ञ आहेत. इथे शाहरूखखानला पडल्या, सैराट  पडेलच ! . शाळेत जाणाऱ्या मुलीच्या सैन्डलवर फुलं ठेवणं, भर वर्गात छि...

Business

आज एका मोठ्या कंपनीचा एका प्रोजेक्टसाठी कॉल होता... मी गेलो. माझ्या कंपनीचं वय ७ महिने १० दिवस... माझं वय २३ वर्ष ४ महिने ९ दिवस... . त्यांनी Description समोर ठेवलं, - चांगलंय... बजेट समोर ठेवलं, - बरं ! पुढे ? Conditions ची रेकॉर्ड सुरु केली... एकापेक्षा एक कंडीशन... (माझ्या कंपनीच्या "बाल"वयाचा फायदा घेताय तर...) च्यामारी - मला अक्कल नाहीय, मला प्रोजेक्ट देऊन माझ्या सात पिढ्यांवर उपकार करताय किंवा मी भीक मागत गेलोय असं काहीसं रुड त्यांचं बोलणं होतं... त्याआधी तीन तास फुल्ल वेटींग करून डोकं फिरलेलं... सगळं ऐकलं, - आय रिड इट, बट आय एम नॉट इंट्रेस्टेड... - पहिला धक्का दिला... (तोंडावरच...) व्हाय ? यू मिन... आपको ये नही चाहीये ?... - hmm.. आय वोंट... अरे सर, यहाँपे कनेक्ट करने लोग मिन्नते करते है... आप सामने से रिजेक्ट कर रहे हो... - यस. Because आय एम ओनर ऑफ कंपनी, अॅन्ड आय एम हिअर फॉर द बिजनेस डील.. मै यहाँ पे जॉब माँगने के लिऐ नाही आया... अॅज यू ट्रिटेड... . त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं, बॅग उचलली, रस्ता पकडला... नंतर दोनदा कॉल आले... I a...

Kanya

तुला सांगतो कुलकर्ण्या, पुण्यात भलेभले येऊन आपली खिल्ली उडवून घेतात... प्रकांड पंडीतांच्या चड्ड्या बालगंधर्वतल्या भेदक नजरा पाहून ओल्या होतात... कुलकर्ण्या, तिथे हा कन्हैया का कान्या आमचं शष्प पण नाही रे... त्याला इथे त्याचं मत मांडायला नाही, तर त्याची लायकी तपासण्यासाठी बोलावलं होतं... जोपर्यँत पुणे तुमची लायकी ठरवत नाही, तोपर्यँत तुम्ही कुणाच्या गणतीत नसतात... . हा कान्या मेला अगदीच थिल्लर... काय त्याची ती गावंढळ भाषा... मेल्याला स्वत:ची चड्डी बदलता येत नाही, पंतांना काय सल्ले देतो... तो म्हणे पंतांना विकायला निघाला होता ? च्यामारी, अरे तुझा पगार किती, बोलतो किती ? पंतांनी आणि नानांनी ठरवलं तर तुला किलोने मंडईत विकतील... मी सांगतो कुलकर्ण्या, हा कान्या यां फुरोगाम्यांसाठी एका रात्रीचा फक्त, वापरुन घेतील, हौस फिटली की सोडून देतील लेकाचे... त्यांच्यात मेला तो जित्या नालायक रे... तोच आग लावतो, त्यालाच खाज असते जास्त... आणि कान्या नाय टिकणार या लोकांसमोर, लिहून घे... ते पोरगं वर्षभरात गावाकडे शेतीच करेल... बघच तू ! ते सोड, मला सांग... त्याचही म्हणे, मागे कुठल्यातरी म्हातारी सोबत लफ...

गुढ - २

मेलेली माणसं स्वप्नात येण्याचा विषय या ठीकाणी सुरूय... त्यावर मी माझे सत्य अनुभव सांगतोय. या अनुभवांना मी दैवी देणगी समजतो. . (१) माझी आजी गेली त्या रात्रीचा हा अनुभव : १९९९ मी सहा वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं स्पष्ट आठवत नाही. पण एकुण घटना, ते वाक्य माझ्या मनावर कोरली गेलीय. मी तेव्हा सुट्टीत मुंबईत होतो. आजी धुळ्यात. दिवसभरात रुटीननंतर मला रात्री गाढ झोप लागली. आणि माझी आजी अचानक स्वप्नात आली. ती रडत होती. "मी जातेय हा तेजस... मी देवाकडे जातेय... तू खूप मोठा हो... दादांना (माझे आजोबा) आणि माझ्या जयाला (माझे पप्पा) सांभाळ." आणि आजीने मला जवळ घेतलं... खुप रडली... आणि गेली... हे स्वप्न इथे संपलं. मी खडबडून उठलो, आणि आईला जसंच्या तसं सांगितलं... - असं काहीच नसतं रे, झोप शांत. असं म्हणून आईने मला झोपवलं. पण अर्ध्या तासात घरुन खरंच आजी गेल्याचा फोन आला. विशेष म्हणजे ती ज्या साडीत मला स्वप्नात दिसली तीच साडी तिच्या मृत शरीरावर होती. - ती मला भेटून गेली. . (२) अहमदनगरला असलेली माझी समवयस्क आतेबहिण तीन वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला अचानक गेली. नंतर १५ दिवसातच तीचे वडी...

गुढ - २

मेलेली माणसं स्वप्नात येण्याचा विषय या ठीकाणी सुरूय... त्यावर मी माझे सत्य अनुभव सांगतोय. या अनुभवांना मी दैवी देणगी समजतो. . (१) माझी आजी गेली त्या रात्रीचा हा अनुभव : १९९९ मी सहा वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं स्पष्ट आठवत नाही. पण एकुण घटना, ते वाक्य माझ्या मनावर कोरली गेलीय. मी तेव्हा सुट्टीत मुंबईत होतो. आजी धुळ्यात. दिवसभरात रुटीननंतर मला रात्री गाढ झोप लागली. आणि माझी आजी अचानक स्वप्नात आली. ती रडत होती. "मी जातेय हा तेजस... मी देवाकडे जातेय... तू खूप मोठा हो... दादांना (माझे आजोबा) आणि माझ्या जयाला (माझे पप्पा) सांभाळ." आणि आजीने मला जवळ घेतलं... खुप रडली... आणि गेली... हे स्वप्न इथे संपलं. मी खडबडून उठलो, आणि आईला जसंच्या तसं सांगितलं... - असं काहीच नसतं रे, झोप शांत. असं म्हणून आईने मला झोपवलं. पण अर्ध्या तासात घरुन खरंच आजी गेल्याचा फोन आला. विशेष म्हणजे ती ज्या साडीत मला स्वप्नात दिसली तीच साडी तिच्या मृत शरीरावर होती. - ती मला भेटून गेली. . (२) अहमदनगरला असलेली माझी समवयस्क आतेबहिण तीन वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला अचानक गेली. नंतर १५ दिवसातच तीचे वडी...

Hanuman Jayanti

Image
विश्वासानं डोकं ठेवता येईल असा खांदा मिळवणं खूप महत्वाचं असतं... मग तो माणसाचा असो, वा देवाचा... या चिमुरडीने जगातल्या सगळ्यात सेफ आणि वार्म खांद्यावर डोकं ठेवलंय... . निस्वार्थ आणि नित्सिम भक्ती, आदर, परफेक्शन आणि शक्ती, यांचं प्रतिक असलेला... विश्वातला पहिला सुपरहिरो, शक्तीमॅन... हनुमान... तो चिरंजीव आहे... आज शक्तीचा जन्म झाला. . आपल्यात हनुमानाच्या शक्तीचाच अंश आहे... प्रामाणिकपणा आणि कर्मभक्ती यांचा संगम साधला की आपल्यातला तो अंश जिवंत होईल. . कारण, तो चिरंजीव आहे. "किती आले, किती गेले संपले भरारा... तुझ्या परी नामाचा रे अजुनी दरारा..." . Photo Curt. : Manjushadidi Joglekar

Poverty

आत्ताच ऐँशी वर्षाँच्या एक आजी कॉलनीतल्या महावीर मंदीराकडे काहीतरी खायला मिळेल या अपेक्षेने भर उन्हात सात आठ वेळा फिरुन गेल्या... त्या बालविधवा असल्यानं पुढे मागे कुणीच नाही. त्यामुळे एकट्या राहतात, पैसा नाही... आणि त्यात भूक... या वयात काम तरी काय करणार... त्यांना बोलावलं, खायला दिलं, काही पैसे दिले तर भरुन आल्यानं आज्जी रडायला लागली... दोन दिवसांनंतर आज खातेय रे, हे ऐकून काळजात चर्र्र झालं. . आपण त्यांना खायला देणं हे आज शक्य आहे - ते पण समोर आले तरच... पण इतर वेळी काय ? या आज्जी सारख्या इतरांचं काय ? भूक खूप वाईट असते... कुणालाही भूकेमूळे तळमळतांना बघणं भयंकर असतं. . एकवेळ यांच्या भौतीक गरजा नाही पूर्ण करता आल्या तर चालेल, पण गरज वाटली तर स्वत: उपाशी राहून त्यांच्या पोटात काहीतरी ढकलणं, त्यांची भूक शमवणं हेच आपलं कर्तव्य असतं. . सकाळी उठल्यापासून दिवसभर अखंड खादाडी करुन, चार-पाच बॉटस्ल कोल्ड्रीँक ढोसून पण रात्री दिड दिड वाजता उठून खाणारा मी, अश्या लोकांसमोर अपराधी वाटतो... . पण समोर अशी हजारो उपाशी माणसं दिसत असून आपण त्यांचं पोट भरु शकत नाही ही हतबलता सगळ्यांत वाईट असते....

Karve

Image
कुठल्याही देवाला, धर्माला शिव्या न घालता, आपल्याच नावे तथ्य नसलेल्या ओव्या न रचता, सत्यशोधच्या नावाखाली सापडलेल्याच गोष्टी पुन्हा शोधल्याच्या पुड्या न सोडता, आपल्यालाच सगळी अक्कल आहे, बाकीचे मुर्ख आहेत असं न बरळता, आपलंच कल्याण ज्यांनी केलं त्यांना कृतघ्नपणे शिव्या न घालता, आणि आपल्या अडचणीँचा बाऊ न करताही निस्वार्थ वृत्तीने मृदू स्वभावाने सभ्य भाषेत सर्वधर्मीय स्त्री शिक्षण, विधवा विवाह, अनाथसेवा, गरीब-स्त्री-अनाथांचे कल्याण करणे शक्य आहे, हे सप्रमाण सिद्ध करणाऱ्‍या, त्याच मार्गावर जगणाऱ्‍या "खऱ्‍या महात्म्याच्या", भारतरत्न महर्षी डॉ. धोँडो केशव कर्वे यांचा आज जन्मदिन. . ज्यांचं कार्य त्यांच्यानंतर आजही कुठलाच गाजावाजा न करता, कुठल्याही जातीधर्माला शिव्या न काढता, सभ्य आणि सुसंस्कृतपणे योग्य मार्गावर सुरु आहे. . या "महात्म्याचा" सहवास एकशेचार वर्षे होता..!! . (कर्वे - रानडे - टिळक - सावरकर - चाफेकर - आपटेँचाही महाराष्ट्र)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved