Adarsh Implosion

३१ मजली आदर्शची बिल्डींग पाडायला छिन्नी हातोडा घेऊन चार वर्ष ठाक ठूक करत बसणार नाही, धक्काही देणार नाही...  किंवा ती एकाच बाजूला पडेल तर  बेंबीच्या देठापासून "आssssssss" ओरडत लेफ्ट टू राईट... राईट टू लेफ्ट पळायची सुध्दा वेळ येणार नाही... काळजी करू नका...
.
अश्या मोठ्या बिल्डींग पाडण्यासाठी Building Implosion method वापरतात. ज्यात ती इमारत काही क्षणातच मधोमध कोसळते. विषिष्ठ पद्धतीने अंतर्गत आणि बाह्य भागावर दबाव टाकतात. या पध्दतीत त्या इमारतीवरची गुरुत्वाकर्षण धरून ठेवण्याची शक्ती (क्रिटीकल सपोर्ट) कमी होतो, आणि ती इमारत स्वतःचं वजन धरू शकत नाही. चक्कर आलेला माणूस किंवा पत्याचा बंगला कोसळावा अशी ती इमारत बरोबर मध्यभागी कोसळते. ज्यामुळे आजुबाजूच्या इतर भागांना लहान धक्के बसण्याव्यतिरीक्त आणि धुळ सहन करण्याशिवाय इतर काहीच नुकसान होत नाही.
.
या प्रक्रीयेत इमारतीत तळापासून छोटे स्फोट घडवुन आणतात. आणि फक्त इमारती पाडायचे कामं करणारे Building Implosion Expert ची अख्खी टिम त्याठिकाणी असते.
.
भ्रष्टाचाराचा आदर्श असलेली बिल्डिंग पडणार. त्यात निघणारं प्रचंड स्टिल, वायरींग, प्लंबिंग मटेरीयल,  पुर्नवापर होऊ शकतं असं फ्लोरींग मटेरीयल, काच वगैरे गोष्टीं विकून येणारा पैसा सत्कारणी(च) लागो...
...
असो.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved