सैराट

=सैराट=
मंजुळे भौ नी फॅन्ड्री काढला...
"उच्चवर्णीय शिस्टीम" च्या विरोधात
जब्या ने फिरकावलेला दगड म्हणून तो बकवास सिनेमा थोडा चाललापण...
पण
त्यात त्याला इतकी अक्कल नाही, शाळेत जाणाऱ्या मुलीवर - (मग ती मराठा असो, ब्राह्मण असो किंवा सो कॉल्ड जब्याच्या भाऊबंदकीतली असो)
कुठल्याही मुलाने (तो पण जब्या असो किंवा मराठा, बाह्मण असो )
लाईन मारली, छेड काढली तर त्याला विरोधच होणार... पोरांना फटकेच पडणार...
.
जब्या ऐवजी त्या मुलीवर तिच्याच जातीतल्या मुलानं लाईन मारली असती तरी त्याचा शेवट हा शोकांतिकाच असता... लहान वयात लग्न लाऊन द्यायला, लफडी करायला परवानगी द्यायला त्या मुलीचे किंवा त्या मुलाचेही पालक वेडे नाहीत...
.
लहान वयात, शालेय वयात होणारं पाहिलं प्रेम हा खुप हळवा विषय आहे. "शाळा" मध्ये जसा छान हाताळला, त्या मानाने सैराट, फॅन्ड्री थिल्लर वाटतात. बालवयात होणाऱ्या प्रेमाला जातीय रंग दिला तर आपण मोठा तीर मारलाय असं मंजूळेंना वाटत असेल, पण मराठी प्रेक्षक सुज्ञ आहेत. इथे शाहरूखखानला पडल्या, सैराट  पडेलच !
.
शाळेत जाणाऱ्या मुलीच्या सैन्डलवर फुलं ठेवणं, भर वर्गात छिछोरेगिरी करणं हे मंजुळेंना मसाला वाटत असेल. पण मंजूळेच्या सिनेमाव्यतिरीक्त "चांगल्या" मुली अश्या छिछोऱ्यांना वाऱ्यालाही उभं करत नाही...
.
"सैराट" पडल्याशिवाय मंजुळे सुधरणार नाही...
आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना / मुलींना चुकूनही दाखवू नका.... झिंगाटच करा च्यामारी...
#सैराट

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved