Business

आज एका मोठ्या कंपनीचा एका प्रोजेक्टसाठी कॉल होता...
मी गेलो.
माझ्या कंपनीचं वय ७ महिने १० दिवस...
माझं वय २३ वर्ष ४ महिने ९ दिवस...
.
त्यांनी Description समोर ठेवलं,
- चांगलंय...
बजेट समोर ठेवलं,
- बरं ! पुढे ?
Conditions ची रेकॉर्ड सुरु केली...
एकापेक्षा एक कंडीशन...
(माझ्या कंपनीच्या "बाल"वयाचा फायदा घेताय तर...)
च्यामारी
- मला अक्कल नाहीय, मला प्रोजेक्ट देऊन माझ्या सात पिढ्यांवर उपकार करताय किंवा मी भीक मागत गेलोय असं काहीसं रुड त्यांचं बोलणं होतं...
त्याआधी तीन तास फुल्ल वेटींग करून डोकं फिरलेलं...
सगळं ऐकलं,
- आय रिड इट, बट आय एम नॉट इंट्रेस्टेड...
- पहिला धक्का दिला... (तोंडावरच...)
व्हाय ? यू मिन... आपको ये नही चाहीये ?...
- hmm.. आय वोंट...
अरे सर, यहाँपे कनेक्ट करने लोग मिन्नते करते है...
आप सामने से रिजेक्ट कर रहे हो...
- यस. Because आय एम ओनर ऑफ कंपनी,
अॅन्ड आय एम हिअर फॉर द बिजनेस डील..
मै यहाँ पे जॉब माँगने के लिऐ नाही आया...
अॅज यू ट्रिटेड...
.
त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं, बॅग उचलली, रस्ता पकडला...
नंतर दोनदा कॉल आले...
I am still on my decision...
.
माझ्या कंपनीने "नाकारलेलं" पाहिलं प्रोजेक्ट...
.
मला खूप छान वाटतंय...
कारण मी आज पहिल्यांदा "मालकासारखा" वागलो. माझी सुरुवात आहे, कंपनी लहान आहे. नुकसान झालं, पण मी त्या मग्रुरी पुढे झुकलो नाही याचं वेगळंच भारी वाटतंय...
बऱ्याच मोठ्या कंपनीशी टाय अप केलेल्या छोटया कंपनी अस्तित्व, हक्क गमावून बसतात. सुरुवात याच ठिकाणी होते...
.
अनुभव मिळाला,
स्वतःच्या नजरेतली स्वतःची किंमत वाढली...
हे कमीय कां ?

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved