Poverty

आत्ताच ऐँशी वर्षाँच्या एक आजी कॉलनीतल्या महावीर मंदीराकडे काहीतरी खायला मिळेल या अपेक्षेने भर उन्हात सात आठ वेळा फिरुन गेल्या... त्या बालविधवा असल्यानं पुढे मागे कुणीच नाही. त्यामुळे एकट्या राहतात, पैसा नाही... आणि त्यात भूक... या वयात काम तरी काय करणार...
त्यांना बोलावलं, खायला दिलं, काही पैसे दिले तर भरुन आल्यानं आज्जी रडायला लागली... दोन दिवसांनंतर आज खातेय रे, हे ऐकून काळजात चर्र्र झालं.
.
आपण त्यांना खायला देणं हे आज शक्य आहे - ते पण समोर आले तरच... पण इतर वेळी काय ? या आज्जी सारख्या इतरांचं काय ? भूक खूप वाईट असते... कुणालाही भूकेमूळे तळमळतांना बघणं भयंकर असतं.
.
एकवेळ यांच्या भौतीक गरजा नाही पूर्ण करता आल्या तर चालेल, पण गरज वाटली तर स्वत: उपाशी राहून त्यांच्या पोटात काहीतरी ढकलणं, त्यांची भूक शमवणं हेच आपलं कर्तव्य असतं.
.
सकाळी उठल्यापासून दिवसभर अखंड खादाडी करुन, चार-पाच बॉटस्ल कोल्ड्रीँक ढोसून पण रात्री दिड दिड वाजता उठून खाणारा मी,
अश्या लोकांसमोर अपराधी वाटतो...
.
पण समोर अशी हजारो उपाशी माणसं दिसत असून आपण त्यांचं पोट भरु शकत नाही ही हतबलता सगळ्यांत वाईट असते...
.
दैव कट्टर असतं हेच खरं.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved