Congo India

ईस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज अथक प्रयत्नांनंतर सातवा आणि या सिरीजचा शेवटचा नेव्हीगेशन उपग्रह, IRNSS-1G हा PSLV XL C33 या रॉकेटद्वारे आकाशात प्रक्षेपित केला... १ जुलै २०१३ ते आज दरम्यात सात उपग्रह ३६००० किमी ऑर्बीटल उंचीवर प्रस्थापित केले गेले.. यापैकी तीन जीईओ आणि चार जीएसओ ऑर्बीटमध्ये आहेत.
ज्यामुळे भारताकडे आता स्वत:चे ग्लोनस आणि जीपीएस साधन निर्माण झाले आहे...
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे साधन खूप महत्वाचे आहे.
भारतीय विज्ञान इतिहासातला एक महत्वाचा क्षण झाला...
.
यापूर्वी भारताला अमेरीकेवर अवलंबून रहावं लागत होतं.
त्यामुळे "अब हमारे रास्ते हम खुद तय करेँगे" असे सूचक गौरवोद्गार पंतांनी काढले...
.
इस्रोचे शास्त्रज्ञ एकापेक्षा एक रत्न आहेत...! या मोहीमेसाठी एपीजेकलामांचाही पाठपुरावा होता... तत्कालीन पंतांनीही बरंच लक्ष घातलं होतं... सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं...! अभिमान बाळगावा अशी माणसं आहेत ही... :-):-)
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved