Posts

BanMedia

उद्या मी पण पत्रक वाटतो कि नवाकाळ, लोकमतच्या संपादकांची बायको घरी कुंटणखाना चालवते अशी बातमी त्यांच्या घरी काम करणाऱ्या धुणीभांडीवाल्या बाईनी दिली... अशी हि बातमी गावभर करतो... दोनतीन दिवसांनी खुलासा करतो कि सदर बाईनी दिलेली बातमी खोडसाळपणाची असून त्या संपादकांची बायको पतिव्रताच आहे.. चालेल??? मुद्दा हा आहे साहेब,बिग्रेड, स्वाभिमानी चिल्लर आहेत, ते नेहमीच खोटी माहिती पसरवत असतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.. तीच खोटी बातमी आपण पहिल्या पानावर कशी काय छापली? त्याबद्दल आपल्याला किती पैसे मिळाले? जर आपणास सदर माहिती खरी असल्यास त्याचे पुरावे का पुढील अंकात छापले नाहीत? चुकीचीच बातमी छापल्याबद्दल खुलासा करताय तर मग माफी का मागत नाही? हा मुद्दा आहे... समस्त हिंदुत्ववादी महाराष्ट्रीयन लोकांना नम्र विनंती आहे कि दिशाभूल करणाऱ्या बातमीबद्दल माफी न मागता केवळ खुलासा छापणाऱ्या दैनिक लोकमत आणि दैनिक नवाकाळ या दैनिकांवर बहिष्कार घालावा, तसेच पैसे घेऊन खोटी बातमी छापून पत्रकरितेला वेश्येचे स्वरूप देणाऱ्या या वृत्तपत्रांवर PTI ने कडक कारवाई करावी यासाठी PTI ला इ मेल करावेत... आपणही करा

श्रावण बाळ

श्रावण बाळ कालची रात्रीचीच घटना.... आमच्या घराजवळ एक रुग्णालय आहे. एक आई आणि मुलगा त्या रुग्णालयातून बाहेर आले. मुलगा मध्यमवयीन, अगदी बारीक, अशक्त वाटावा असाच त्याचा चेहरा होता. आई तशी वयस्कर आणि ती ही बारीकच. नुकताच चांगला पाऊस पडून गेला होता त्यामुळे त्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी जमलं होतं. ते दोघे बाहेर आले, मुलाच्या हातात कुठलेतरी कागद होते. बाहेर आल्या आल्या ती आई थोडी घाबरली आणि एका जागी एकदम थांबली. तसा मुलगा म्हणाला, थांब आपण हळूहळू जाऊ. माझा हात धर. तिने मुलाचा दंड धरला आणि लहान मूल कशी छोटी छोटी पावलं टाकत दुडूदुडू चालतं, तशी हळूहळू मुलाबरोबर जायला लागली. पाच सहा पावलंच ती दोघं पुढे आली असतील तेवढ्यात खाली रस्त्यावर पाणी साचलेलं त्या आईला दिसलं. ती परत एकदा थबकल्यासारखी थांबली. जोराचा पाऊस येऊन गेल्यावर जसं पाणी साचतं, तसंच आणि तेवढंच पाणी तिथे होतं पण ते पाणी पार करणंही त्या आईसाठी कठीण होतं. मुलगा म्हणाला, काही नाही होणार. माझा दंड असाच घट्ट धर, आपण हळूहळू जाऊयात. आईने मुलाचा दंड तर धरला होताच पण पाय पुढे टाकता येईना. हे पाहिलं आणि मी भराभरा पुढे गेले. व

जावडेकर मिडीया ट्रायलचे बळी ?

छिंदवाड्यात जावडेकर जे बोलले ते जसेच्या तसे : "कितने वीर... नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, पंडीत नेहरु... भगतसिंग, राजगुरु... **सभी जो फांसीपर चढे**... क्रांतीवीर सावरकरजी... बाकी महान स्वातंत्र्यसेनानी... ** कितनी लाठीया खायी... कितनी गोलीया खाई...** . भाषण नीट ऐकलं तर लक्षात येईल, नेहरू नंतर त्यांनी काही क्षण पॉज घेतला, ते वाक्य संपलं, नंतर भगतसिंग, राजगुरू यांचं नाव घेऊन " सभी जो फांसीपर चढे... असा सरळ शब्दप्रयोग आहे. यात "सभी..." म्हणजे जे जे फासावर गेले ते ते सगळे यांचा एकत्र उल्लेख आहे.... जर या पाच नावांनंतर "ये सभी" असतं तर होणारे आरोप ठिक होते... पण सरळ वाट असतांना मुद्दाम वाकड्या वाटेने मिडीया का जीव द्यायला जातंय... त्यात "फासी गये".... "कितनी लाठीया खायी... कितनी गोलीया खाई..."... हे "वैयक्तीक" त्या त्या लोकांसाठी आहे जे जे फासावर गेले... "किंवा"... गोळ्या झेलल्या... "किंवा"... काठ्यांनी मार खाल्ला...  आणि उर्वरीत महान स्वातंत्र्य सैनिक ... जे एकत्र एकाच वाक्यात जावडेकरांनी बसवलं नाही

Paluskar

Image
एकदा एका  राजदरबारी मैफलीत यांचे गाणे होते  गाताना  त्यांना  सिगार चा    वास आला त्यांनी धूम्रपान करणाऱ्या माणसाला ते  थांबवण्यास  सांगितले. डोळे अधू असल्यामुळे  ती व्यक्ती कोण हे त्यांनी पाहिले नव्हते. ते  धूम्रपान करणारे स्वतः  महाराजा होता तसे त्याला सांगण्यात आले हा उद्गारला या गान  दरबाराचा  मी महाराजा आहे त्यांना सांगा धूम्रपान  थांबवा नाही तर निघून जा असा बाणेदार पणा दाखवणारे महान गायक आणि संगीत शिक्षण महर्षी म्हणजे विष्णू दिगंबर पलुस्कर होत. भारतीय शास्त्रीय संगीतात  दिग्गज कलाकार आहेत, घराणेबाज  गायक आहेत, पण संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा  आणि हे संगीत गुरुशिष्य परंपरेच्या काहीश्या जाचक परंपरेतून मुक्त करण्याचा मान हा निः संशय पणे  विष्णू दिगंबर यांच्याकडे जातो  . कुरुंदवाड सारख्या छोट्या गावात जन्मलेला, अधू दृष्टी असलेला कलाकार  लाहोर मध्ये  जातो आणि  संगीत महाविद्यालय सुरु करतो हे विश्वास न बसणारे आहे गांधर्व महाविद्यालय या संगीत शिक्षण देणाऱ्या संस्थेची  निर्मिती करून संगीत ज्ञानाची  गंगोत्री या माणसाने सर्वसामान्य माणसाच्या माजघरात नेली.आणि विशेष म्हणजे कोणत

Casteism

सिंधूची जात हे गुगल सर्चवर पॉप्यूलर झाल्याची कुणीतरी पुडी सोडली, एकदम पुरोगामी झालेले इथे एकसूरात व्ह्यॉक्यू व्ह्यॉक्यू ओरडायला लागले... खरं तर जी गोष्ट तिथेच दाबायची, तिचा बोभाटा झाला... ज्याला काही पडलेली नाही तो तिची जात शोधू लागला... आधी ५००-७०० सर्च आता २९००० वर गेलंय ! . ज्याला तिची जात जाणून घ्यायचीय, शोधू द्या ना... असंही सगळं जातीवरच चालतं... काहींचं उघडपणे, काहींचं लपत-छपत. जातीत इंटरेस्ट सगळ्यांना असतो... आपलं ते पोर - त्याचं कार्ट असतंच ! पण या गोष्टींना उगाच वाढवून तिच्या यशाला झाकोळता कामा नये इतकंच ! . माझ्या आडनावावरूनच कळतं म्हणून मला अनूभव नाही, पण " तुह्या धर्म कोंचा ?" विचारुन ओळख करणारे इथे पण आहेत... हि कीड वरवरची नाही, आतमध्ये रुजलीय !..

Independence Day 2016

Image
स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात भारत "विकसनशील"च आहे... आणि "विकसित" होण्यासाठीचा प्रवास अजून खरं तर खूप मोठा आहे... स्वराज्य मिळालं... सूराज्य होण्याचा हा प्रवास आहे... . त्यासाठी डोळ्याला झापडं लाऊन, वर्षानूवर्षे आहे तिच सिस्टीम रेटत वर्ष ढकण्यापेक्षा हे सगळं एका बिंदूवर थांबवून, कायदा-घटना-सगळी सिस्टिम, देश यांची अभूतपूर्व अशी नव्याने रचना करण्याची आणि त्यासह पुन्हा नवी सुरुवात करण्याची गरज आहे... कालबाह्य गोष्टींना कवटाळून ठेवल्यानेच सत्तरीतही जिथे विज्ञान-तंत्रज्ञान-समृद्धीवर-शोध यांवर चर्चा व्हायला हवी तिथे वीज, स्वच्छता, गावं, रस्ते, बेरोजगारी, गरीबी, आरक्षण यांवरच भाषण द्यावं लागतंय ! . काही गोष्टी आधीपासूनच चुकल्यात...! . नेत्यांच्या मागे भाऊ-दादा करत तरुणाई आपली अक्कल गहाण ठेवणं जेव्हा बंद करेल तेव्हाच सूराज्याच्या दिशेने पहिलं सशक्त पाऊल टाकलं जाईल ! . तोपर्यंत सालाबादाप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ! . (प्रधानमंत्री दिड तासापासून अखंड बोलताय ! देशाविषयी, विकासासाठीची, शेवटच्या माणसासाठीची कळकळ जाणवते. आपलं भाग्य थोर, असं नेतृत्व मिळालं !

Relation and wedding

दिसायला सुंदर, आयटीमधली मुलगी बघून शॉर्ट टर्म रिलेशनशीपमध्ये लव्ह मॅरेज केलेल्या मित्राचं वैवाहिक आयुष्य ऑलमोस्ट खतरेमे है ! तो मित्र देशस्थ ब्राह्मण घरातला, स्वभावाने साधा आणि सरळ ! पाच आकडी कमावणाराय, वेलसेट आहे... ती मुलगी अतिमहत्वकांक्षी, अहंकारी वगैरे बोलण्यातूनच वाटते. ! दोन टोकं... दोघांचं कसं जमलं त्यांनाच माहित, पण फक्त वर्षभराचे राजा-राणी आता सेपरेशनच्या टोकावर बसलेय ! . "तिला ऑफीस, प्रोजेक्टस्, कामाशिवाय दुसरं काहीच दिसत नाय रे तेजा.., ना घर, ना मी, ना होणारं बाळ ! " रडत रडत मन मोकळं करणाऱ्या मित्राला कसं समजावू कळत नाहीय ! अश्या गोष्टींत आपण गप्प बसून समोर आहे त्याला धीर देणं इतकंच सोप्पं असतं. सल्ला वगैरे चुकूनही देवू नाही... त्याने तिला बऱ्याच गोष्टींत मोकळीक दिली होती, पण तिने गैरफायदा घेतल्याचं उघड उघड दिसत होतं...! ती चारचौघात त्याचा पाणउतारा करायची... वर्षभरात दोघांमधलं अंतर वाढत गेलं ! नवरा-बायकोत "मी" पणा घुसतोना,  तिथेच सगळं संपतं... कुणीतरी काहीतरी सोडावं लागतं !... कसंतरी गप्प बसवून त्याला पाठवलं ! वाईट वाटतंय... त्याचं प्रेम टू लग्न आणि

Proud

काल कार्यक्रमात हिंदी गाणे ऐकायला येऊन बसलेला एक माणूस भेटला... मी आणि शेखर जिथे बसलो तिथे मागेच बसला होता. "अबी कितोनी देर तोक चोलेगा ?"... त्याच्या ओ- कारातून तो बंगाली असल्याचं लगेच कळलं... ... धुळ्यातल्या अगदी जून्या भागात एक बंगाली चक्क गुरुपोर्णिमेचा इव्हेंट अटेंड करतोय... ग्रेट ! वेळ काढायचा होता... गप्पा सुरु केल्या... "आर यू फ्रॉम बेंगॉल ?" - येस... आय एम फ्रॉम कोलकॅटा... इथून जुजबी गप्पा सुरू झाल्या... तो धुळ्यात कुठल्यातरी कंपनीत काम करतो वगैरे गोष्टी झाल्या... शास्त्रीय संगीताची आवड आहे वगैरे बोलला... चांगलंय.... त्याच्याविषयी चांगलं मत तयार होत होतं, तोच कहानी मे ट्विस्ट आया... . "हमे योहापे बिलकोल अचा नई लोगोता..." - क्यो भाई... कहा अमारा कोलकॅटा... और कहा आपका धुलीया ? यू नो ... मुजे माराष्ट्रा अचा नई लोगोता... बेंगोल इज बेंगोल ! .... च्यामारी... दुखरी नस पकडली... धुळ्याला आणि महाराष्ट्राला बोलतोय.... शेख्या... घेऊ याला रिंगणात... धुळ्यात राहून, इथलं खाऊन महाराष्ट्राला बोलतोय... हर हर महादेव... . "ओहह... रिअली ?"

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी....

''अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी.... लाख चुका असतील केल्या, केली पण प्रिती..." पाडगावकरांच्या दर्दभऱ्या ओळींना यशवंत देवांनी तितकंच आर्त संगीत दिलंय... आणि भावगीतांचे भगवंत अरुण दातेंनी अक्षरशः जीव ओतलाय यात... ऐकलं... म्हणायचा ट्राय केला... . "तेजा आतून नाय येतय राजा... पून्हा एकदा ट्राय कर..." राजा... राजा... करत पाच - सहा वेळा झालं... तरीपण समाधान होईना... आतून येईना... काय करायचं ? आजींनी गुगली टाकली... - कॉलेजचं प्रेम आठव... प्रेमभंग आठव... त्याशिवाय नाही येणार आतून ! - कॉलेजचं प्रेम त्यात पण प्रेमभंग... हे म्हणजे परवा खालून वरुन जोरदार पाणउतारा झालेल्या "त्या" माणसाने "मी पंतप्रधान झालो तर" असा वस्तूनिष्ठ निबंध लिहीणं आणि त्यात पहिलं बक्षीस मिळवणं वेग्रेे... "नाय येणार ब्बॉ.... प्रेमभंग वगैरे नाय झालंय कधीच... प्रेमच नाय, तर प्रेमभंग कुठे ? - आडात नाय तर पोहऱ्यात कुठून येणार..." - मग गाणं बदलूयात कां ? ठिकंय... . आधी मी आगाऊपणा करुन हे गाणं घेतलेलं, तंगडं गळ्यात पडलं, नानांचंही काय वेगळं झालं ? त्यांनी पा

Helmate

हेल्मेट असेल तर पेट्रोल मिळेल ही शुद्ध चुतीयागिरी आहे... आणि सगळ्यांनी मिळून उधळून लावायला हवंय ! कारण यामूळे फक्त उद्धट पेट्रोलवाल्यांची चांदी होणार इतकंच. जर खूप घाईत हेल्मेट विसरलो, किंवा अपरीहार्य कारणाने (फॉर एक्स डोकं फुटलंय, मान दुखतेय वगैरे) घातलं नसेल आणि गाडी ठणठण असेल, emergency असेल, तर एकतर त्यांच्या दे भाऊ करत पाया पडा, किंवा ५-१० रुपये लिटरमागे जास्त मोजा... काळा बाजार वाढेल... परत मागे बसलेल्यांनापण हवंच... ISI मार्क असलेलंचं हवं वगैरे नाटकं आहेच ! . ज्याच्या डोक्यातून हे आलंय तो माणूस एकतर स्टार प्रवाह-झी मराठीचा नियमित प्रेक्षक असावा, किंवा यूगपूरुष केजरीवाल त्याचे आदर्श असावेत... नाहीच काही तर महागुरु पिळगांवकर त्याचे गुरु असावे...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved