महालया
. एकवेळ दैवी अस्तित्व नाकारेन, पण मृतात्मे, पितृ, मृत्यूपश्चात असलेलं जग यांवर माझा ठाम विश्वास आहे. माणसाचा मृत्यू हा फक्त शरीराने होतो, तिथे त्याचं केवळ भौतीक अस्तित्व संपतं, पण ती व्यक्ती आत्मरूपाने (पितृरुपाने) सदैव आपल्या आसपासच असते. मी या गोष्टीवर १०० टक्के विश्वास ठेवतो. आपला आत्मा ही एक शक्ती आहे. आणि The Law of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another. शक्ती निर्माण होत नाही, नष्ट होत नाही. ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाते. माणसाच्या मृत्यूनंतर शरीर संपतं, आत्मा जिवंत असतो. त्यामुळे मृत्यूपश्चात पितृविश्व आहे. भूत, आत्मा वगैरे गोष्टी सत्यात आहेत ! त्या आत्म्यांनाही तहान- भूक, इच्छा आहेत... आणि त्या इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा ते त्यांच्या वंशजांकडून ठेवतात. आपण खूप भूक लागल्यावर खायला मिळत नाही तोपर्यंत चवताळतो तसं या आत्म्यांच्याही या इच्छा तिव्र होतात आणि ते याची जाणीव वंशजांना करुन देतात. "पितृदोष" म्हणतात तो हाच ! एकवेळ देवाच्या पूजेला टाळाटाळ चा...