Posts

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी

फेसबुकवर आणि अन्य समाजमाध्यमांत सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी याबाबत प्रश्न विचारणारी पुढील पोस्ट फिरत आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींना हा प्रश्न पडला असल्याने त्याचे उत्तर. धन्यवाद. (ता. क. - 'कशावरही विश्वास ठेवायचाच नाही' या वृत्तीच्या लोकांनी कमेंट वगैरे करून वेळ वाया घालवू नये) एक प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गुरुपौर्णिमेला संघध्वजासमोर गुरु दक्षिणा ठेवायची पद्धत आहे. दहा रूपयांपासून दहा लाखांपर्यत कितीही रक्कम रोख स्वरूपात गुरुदक्षिणा म्हणून ठेवली जाते. देशभर कोट्यवधी जमणार्या या रकमेची कधीही पावती दिली जात नाही. त्यावर संघाने कधी करही भरलेला नाही. मग हे धन काळे म्हणायचे की, धवल? या प्रश्नाचे उत्तर- संघाच्या गुरुदक्षिणेत जमा झालेली सर्व रक्कम शाखेच्या बँक खात्यात जमा केली जाते. सर्व खर्च त्याच निधीतून केले जातात. या सर्व खर्चाचा सर्व तपशील व्यवस्थित ठेवला जातो. बँक अकाऊंट स्टेटमेंट्स असतात. वेळोवेळी सर्व खर्चाचे ऑडिट होत असते. संघाच्या नित्य कामाच्या खर्चासाठी गुरुदक्षिणेव्यतिरिक्त अन्य कोणताही निधी घेतला जात नाही. मोठया कार्यक्रम ख

रागचर्चा

शास्त्रीय गायक / गायिका म्हणवून घेण्याचा नक्की निकष काय? शास्त्रीय संगीताच्या  मैफिलीत श्रोता नक्की काय ऐकायला जातो ! किंबहुना त्याने काय ऐकायला जाणे अपेक्षित आहे ? रागगायन / ख्यालगायन, टप्पा, ठुमरी, नाट्यसंगीत, कजरी ... ? म्हणजे बघा आपण जेवायला जातो तेव्हा भारतीय जेवणाच्या ताटात Main Course म्हणजेच पोळी, भाजी, आमटी, भात -  या गोष्टी भरपूर (पोटभर) आणि चविष्ट मिळणं, खाणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग जर उत्तम desert मिळालं तर चंगळच ! पण desert हा काही main course नाही आणि तो पोटभर खाता येत नाही आणि खायला आपण गेलेलोही नसतो. तेव्हा तो किती खाणार ? तसच हल्ली शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत होत. शास्त्रीय संगीत मैफल म्हंटल कि ख्यालगायन हा main course अपेक्षित आहे. त्यात रागमांडणी, रागशुद्धता, सूर, लय, रागोच्चार  अशा अनेक गोष्टींची अपेक्षा असते. पण हे सगळं ना सांभाळता एक उपचार म्हणून नाममात्र ख्याल गायचा. म्हणजे समोर डोळ्याला पोहे दिसतायेत म्हणून त्याला पोहे म्हणायचे इतकच. पोहे, मीठ, मिरच्या, कडीपत्ता, साखर सगळं आहे. पण त्याच प्रमाण धन्यवाद !! पण मग पोह्यानंतर दिलेलं सरबत फारच कमाल चविष्ट आह

पेन पुराण

Image
जे काम तीन रुपयांच्या यूज अॅन्ड थ्रो पेननं होतं, त्यासाठी तीस रुपये खर्च करुन नव्वद टक्के नुकसान सहज करण्याची माझी कधीच इच्छा नसते... अॅनेक्स टू कॉलेज, मी बिनधास्त होलसेल अडीच रुपये कॉस्ट पडणारे यूज अॅन्ड थ्रो चे च पेन वापरतो... काळं-निळं-लाल-हिरवं ! तीन रुपयात तिच बोँब पडते, जी तीनशेच्या पार्करनं पडणारे... तसं माझं मराठी-इंग्रजीचं अक्षर वगैरे बरंय...! आणि ते पेन हरवलं तर हळहळ फार फार दहा मिनिटांची ! थोडक्यात गोडी. . पण पॉईँट वेगळाय, पोष्टीचा मुद्दा हा आहे... एक पेन - साधारण दहा-बारा ते पंधरा दिवस जातं, कधीकधी जास्त... ते सेट झालं, की आपलं त्याच्याशी नकळत छोटसं नातं तयार होतं, सवय होते... सहजता येते. आणि शेवटाकडे येता येता, ते आपलं होतं... त्याचा उत्तरार्ध आला की आपल्याही नकळत त्याची जपणूक सुरु होते... पण कुठल्यातरी क्षणी ऐन महत्वाच्या वेळी ते संपतंच... त्याचा शेवटचा क्षण येतो.! . "गुडबाय बडी, थॅंक यू...." ! त्या पेननं कुठलीतरी महत्वाची डिल फायनल केलेली असते, परीक्षा दिलेली असते, कुणालातरी पत्र लिहीलेलं असतं... महत्वाचा मजकूर लिहीलेला असतो... बरंच काही असतं... त्या आठवण

Childhood

बालपणाचं म्हणाल तर "शरीराने वाढला, अक्कल कधी वाढणार ?"... "तेजा, बालीशपणा कमी कर... बायको येईल वर्षभरात"... "लहान आहेस कां ?"... वगैरे डायलॉग्स् आमच्या घरात दररोज सुरू असतात... ... माझ्या फेवरेट प्लेलिस्टमध्ये ससा तो ससा, किलबिल किलबिल, अग्गोबाई ढग्गोबाई, ट्वीकल ट्वींकल, चॉकलेटचा बंगला वगैरे टॉपवर आहे... दिवसभरात एकदा तरी ते वाजतंच !... मोबाईलची रिंगटोनही "ससा तो ससा" आहे... (मला ओळखणारे यावरुन शंभर गोष्टी ऐकवतात...) . आजी मला अजूनही बोक्या म्हणते... कुणी ससा... अगदी चारचौघात जरी बोलले तरी मी मज्जेत रिस्पॉन्स करतो ! . टिव्ही लावला की छोटा भीमचा एक एपिसोड बघतोच ! बोर्नव्हिटा पितो... .... अजून बरंच काही... .. यावरून खूप लेक्चर ऐकावं लागतं, पण जे मनाला वाटतं, तेच करावं - तेच करतो... इतरांसाठी तो बालीशपणा असेल, पण I am very honest with myself... स्वतःशी औपचारीक, Artificial, mature वागून तीर मारायचा नाहीय... जे आवडतं ते आवडतं... maturity and myself याचा समन्वय साधतांना myself झाकोळलं जाणार नाही हेच बघायचं... हा मूळ स्वभाव न दाबता ख

Madhujal

मधुजाल दोन मोठ्या नोटा बंद करून खेळ सुरू झाला. बदलून देतांना त्यांच्या समप्रमाणात नवीन चलन आले. १.सर्व खाती पॅनकार्ड, आधारने जोडली आहेत अन् डिपाॅझिट फक्त अडीच लाख रोज भरता येतील. म्हणजे पन्नास दिवसात फार तर फार सव्वा कोट रूपये भरता येतील (ते ही कोणतीही चौकशी न झाल्यास, नशीबावर हवाला) आली का पंचाईत? २. कदाचित् काही दिवसात बँका रोख भरणा बंद करतील कारण कर्जाचे अन् ठेवींचे प्रमाण व्यस्त होत जाईल अन् मग सरकार 'मुद्रा योजने'त का कर्जवाटप केले नाही? ह्याचे कारण मागणार! मुद्राची प्रकरणे निकालात न काढता ती कुजवली बँकांनी. आली का पंचाईत? ३. कॅश कोणीही व्यवहारात स्विकारत नाहीये. त्या नोटा बदलून घ्याव्या लागतील, घोषणापत्र भरून. आली का पंचाईत? ४. एखाद्या चालू खात्यासमोर 'हातची रोकड' पाहता त्यालाही भरण्याची बंधने आहेत. ती कोणी व्यावसायिकाच्या वतीने भरली तर व्यावसायिकाला 'रोख हाती ठेवून व्याज का भरत होतात?' सारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. आली का पंचाईत? ५. ज्या पतसंस्था ठेवी घेत जातायेत त्या जर कचाट्यात सापडल्या तर तोंड दाबून बुक्क्याचा मार. कोण सांगेल माझा

गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाटानं...

= गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाटानं... = निर्णय योग्य - स्वागतार्ह - नो डाऊट ! पण - खरं सांगतो.. घाई झाली, दैनंदिन व्यवहार बारगळल्याने व्यावसायिक, वैयक्तीक नुकसान झालं... पैसा असूनही ठाणठाण झाली... नोटांसाठी जवळपास पूर्ण दिवस गेला... ज्याचा काळा पैसा या उक्तीशी काडीचाही संबंध नाही तो माणूस मात्र नाहक पैशाने आणि वेळेने भरडला जातोय, हाल होताय हे ही तितकंच खरंय ! . दैनंदिन व्यवहाराला पैसा लागतो त्यामुळे करन्सी नोट रिप्लेस करणं तितकंच महत्वाचं आहे... नंतर करता येईल या कॅटॅगिरीत नाहीय हा कार्यक्रम ! लगेच व्हायलाच हवं असं आहे ! . निर्णय स्वागतार्ह आहे, त्यासाठी हाल सोसणंही क्रमप्राप्त आहेच... पण एका मर्यादेबाहेर नको... ! प्रत्येक गोष्टीला दुसरी नकारात्मक बाजू असतेच, आणि ती खुल्या दिलाने मान्य करायलाच हवी... सरकारच्या या निर्णयाला सुद्धा तशी दुसरी बाजू आहे... टक्केवारीने नोटा विकल्या जाताय, अडाणी-अशिक्षित ठगवले जाताय, सामान्य लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, खाद्यपदार्थ - पेट्रोल सारख्या गोष्टींचा तुटवडा आलाय, बाहेरगावी असणाऱ्या लोकांचे खूप हाल होताय-होणारेत ! जन

:-D Alert

काळा पैसावाले लै तित्तरबित्तर झालेत. आणि सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागलंय पाचशे-हजार च्या नोटा वापरून बुक केलेली एयर तिकिटे नाॅन रिफंडेबल असणार रोखीने रेल्वे बुकींग करताना सीलिंग लावलेलं आहे. पॅनकार्ड न घेता रोखीने सोने विकले तर सोनारांवर कारवाई ! शिवाय आत्ता लगोलग आयकरविभागाच्या एकाच वेळेस अनेक ठिकाणी अनेक शहरात धाडी सुरू आहेत !

USA

हिलरी हरली याचे मला दु:ख झाले नाही. त्याची कारणे दोन............. एक म्हणजे मला ट्रम्प जिंकायलाच हवा होता. त्याची जागतिक दहशतवादाविरूद्धची भूमिका कुणाला टोकाची वाटेल पण तीच वास्तव आहे. आणि तो मुळात येडझवा असल्यामुळे, त्याच्यात ती मांडण्याचे धाडस आहे. अंमलबजावणी हा पुढचा भाग. दुसरी गोष्ट म्हणजे, हिलरी ही काही कोणी साध्वी नाही. सध्याची तिच्यावर शेकणारी प्रकरणं पाहता, हिलरी मला महा आतल्या गाठीची वाटली. तिचा नवराही तसाच. भोसडीचा भारतात आला होता. पण नंतर पाकिस्तानची मदत त्याने कमी केली नाही ती नाहीच. त्यापेक्षा मोदींची कार्यपद्धती मानणारा, तसेच दहशतवादाला रंग आणि धर्म नसतो हे म्हणणार्‍यांना, जागतिक दहशतवादाचा रंग हिरवा आहे आणि धर्म इस्लाम आहे, हे वास्तव ठणकावून सांगणारा ट्रम्प त्याच्या वेडझवेपणासकट मला जवळचा वाटतो. - धोंडोपंत आपटे (साभार)

Indian Currency

Image
काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद होणार आहेत. त्यामुळे ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारीच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात हा निर्णय जाहीर केला. काळा पैसा आणि चलनी नोटांमधील अफरातफरी रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चलनातून नोटा अचानक हद्दपार करण्यात आल्यानंतर आपल्या जवळील नोटांचे काय होणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू शकतो. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या असल्या तरी नागरिकांना आपल्याकडील नोटा बदलून घेता येणे शक्य आहे. जुन्या नोटांच्या बदल्यात बॅंक आणि पोस्ट कार्यालयातून नव्या नोटा मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना पुरावा देण्याची आवश्यकता आहे. . – १० नोव्हेबर ते ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बँक आणि पोस्ट कार्यालयात जमा कराव्या लागणार आहेत. हा कालावधी एकूण ५० दिवसांचा आहे. – नागरिकांना नोटा जमा करताना ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड

बरं_झालं_पुलं_तुम्ही_लवकर_गेलात

Image
पु.लं.तुम्ही तुमच्या साहित्यात देवांपासुन संतांपर्यंत..नेत्यांपासुन शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांवर कोपरखळ्या,निखळ विनोद केलेत. पण तुम्ही आज असे काही विनोद केले असते तर आम्ही ते सहन केले नसते!कारण आता आमच्या चित्तवृत्ती इतक्या अस्थिर,उतावीळ झाल्या आहेत..आम्ही आमच्या आर्दशांबद्दल,जातींबद्दल इतके पजेसिव्ह झालो आहोत की आम्ही तुमच्या नर्म विनोदाला न समजता आमच्या धार्मीक.. जातीय भावना दुखावल्यामुळे आम्ही तुमचे पुतळे जाळले असते. सोशियल साइट्सवर ''पु.ल.देशपांडे हेटर्स'' पेजेस तयार केले असते. बरं झालं तुम्ही आधीच गेलात.. तुम्हाला आज संगीत नाटकांवर प्रेम करणारे रावसाहेब भेटले नसते की इतिहास जगणारे हरीतात्या, चप्पल झिजेस्तोवर शिक्षण सेवा देणारे चितळे मास्तर भेटले नसतेच. कारण ती जमात आता कालबाह्य; नव्हे नामशेष झाली आहेत. आणि समजा आजच्या काळातल्या नारायणावर वा अंतु बर्व्यावर तुम्ही लिहीलं असतं तर तो म्हणला असता ''अरे आमच्यावर विनोद काय करतोस!!पहिले आमची रॉयल्टी दे''!! त्यामुळे बरंच झालं तुम्ही फार आधीच जन्मलात!आणि मुख्य म्हणजे आज तुमचे विनोद..शब्दातील मर्

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved