Posts

Ranmswere Wanna Cry Virus

जगभरात 'रॅन्समवेअर' व्हायरसचा धुमाकूळ शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' व्हायरसचा हल्ला शु...

Madhuri Dixit

Image
माधुरी दिक्षीत आजही त्यांच्या करोडो समवयस्कांचं पहला पहला प्यार आहेत. आणि याची सुरुवात हम आपके है कौन नंतरच झाली असावी... कारण आजही हम आपके मधल्या "पहला पहला प्यार है" गाण्य...

#मातृदिन #MothersDay पणजी

Image
#मातृदिन #MothersDay जन्म देते त्या आईइतकंच प्रेम आपल्यावर करणारी अजून एक व्यक्ती असते... आजी ! आपलं आई - आजी यांच्या इतकंच, त्यापेक्षा जास्त कोडकौतूक, अप्रूप कुणाला वाटत असेल तर ते म्...

दानवेंना "साले" महागात पडतंय

Image
शेतकरी रडतात साले said by रावसाहेब दानवे - भाजपा प्रदेशाध्यक्ष्य ... दानवेंना साले महागात पडतंय... ! ... ऑफीसमध्ये पगारावर काम करणारे लोकं चिडचिड ऐकून घेत नाही... आपण कुणीही असो वा कितीही चांगले असो...! पंधरा दिवसापूर्वी टाईट शेड्युलमध्ये एकाला असंच सुनावलं गेलं, दुसऱ्या दिवशी त्याने मेल वरुन त्याचं Resignation माझ्या तोंडावर मारलं, आणि एक महिन्याचं पेमेंट सोडून चालला गेला... तरी मी त्याला "रडतात साले" वगैरे बोललो नव्हतो, फक्त ऑफीस अवर्स मध्ये टाईमपास करण्यावरुन सूनावलं होतं... ते पण पार्लमेंट्री भाषेत... !  (इथे माझं तंगडं माझ्याच गळ्यात पडलं, त्यामूळे मी ते सांगितलं नाही इतकंच...) ... दानवे शेतकऱ्यांना नाही तर कार्यकर्त्यांना बोलले वगैरे सुरुय... कार्यकर्ते काय दानवेंचे पगारी नोकर आहेत ?  काहीही ऐकून घ्यायला ?  तो माणूस त्याचा कामधंदा सोडून मागे फिरतो, काही लोकं घरी आई-वडिल, बायको-पोरांकडून बोलणे खाऊन फुकटात झेंडे मिरवतो त्याचाच तोंडावर अपमान करतात ? हे ऐकायला ?  दानवेंचा आता जो उद्धार होतोय तो व्हायलाच हवा... कार्यकर्त्यांनीच त्यांचा माज उतरवायला हवा... ! या वाह्...

Brahmin vs Reservation

सच चूभा... मुक्ता टिळक बोलल्यात त्यात खोटं काय ? आरक्षणाच्या चड्ड्या काढून बराबरीका मुकाबला करो भै... खूप झालं... ! इथे दहावी न शिकलेले कालच्या प्रकरणावर तारे तोडताय... ... मुक्ता ट...

अक्षय_तृतिया

Image
#अक्षय_तृतिया खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते. गल्लीच्या मधोमध मोठे झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात. माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते. चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय वैशाखाचं उन्हं खडक तापुन लाल झाले वं माय तापुन झाले लाल आईच्या पायी आले फोड वं माय पायी आले फोड आईची बेगडी वाव्हन वं माय बेगडी वाव्हन तठे काय कन्हेरानं झाड वं माय कन्हेरानं झाड माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात. आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं ...

RIP Vinod Khanna

Image
अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन ! द बर्निंग ट्रेन, अमर अकबर ऍंथोनी यातल्या त्यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. चांगला माणूस गेला. कॅन्सरने घात केला... ... अश्या सुपरस्टार रांगड्या माणसाला आजारात खितपत पडलेलं बघवत नव्हतं... सुटका झाली बिचाऱ्याची.. भावपूर्ण श्रद्धांजली ! ... हम तुम्हे चाहते है ऎसे मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे #विनोद_खन्ना .... प्रिय विनोदजी अनेक दिवसांपासून तूम्ही आजारी होतात. आज जातो, उद्या जातो अशी मृत्युला सतत हुलकावणी देत देत शेवटी 'हलचल' माजवून आज 'अचानक' तूम्ही आमच्यातून निघून गेलात... आज तुमच्या अशा निघून जाण्याने 'अमर, अकबर, अँथोनी' 'इना मीना डिका' आणि 'रेश्मा और शेरा' देखील नक्कीच हळहळले असतील! जन्माला आलेला प्रत्येकजण शेवटी जाणार हा जरी 'कुदरत' चा 'फैसला' असला, तरी 'एक्का, राजा, रानी' चा प्युअर सिक्वेंस दाखवून खेळ अर्धवट सोडून तूम्ही असं निघून जायला नको होतं! शेवटी आपल्या आयुष्याचा 'लगाम' वरच्याच्या हातात आहे हेच सत्य आहे! चित्रपटसृष्टितले आमचे जेवढे म...

BooksDay पुस्तकदिन

Image
#पुस्तकदिन शनिवार-रविवारची निवांत दुपार, गॅलरीमध्ये खूर्चीवर बसून दोन्ही पाय कठड्यांवर ठेवून बाजूच्या टेबलवर "माझा" चा भरलेला ग्लास, आणि हातात पुस्तक... एक एक घोट गळा तृप्त करतं... एक एक अक्षर मन समृद्ध करतं... ! त्याला ना भाषेचं बंधन ना विषयाचं... कधीतरी ती मराठीतली कादंबरी असते, कधी गुजराथीतलं एखादं मासिक, हिंदीतली चित्रकथा किंवा कुठल्यातरी विषयावर इंग्लंडमधल्या कुणीतरी लिहीलेला प्रबंध... ते साहित्य असतं - काव्य असतं - गुढ असतं - विज्ञान असतं किंवा गणित असतं... हातात पुस्तक आहे ते वाचायचंय... ! तो लेखक समोर बसून त्याचा विषय मांडतो - त्यात जिवंतपणा आणतो, आणि तो विषय आपल्या मेंदूतल्या कुठलातरी कप्प्याची जळमटं काढून तिथे रहायला येतो... आणि आपण त्या नव्या बिऱ्हाडाचं आनंदाने स्वागत करतो.. !! ... रोज रात्री भगवद्गीता नव्याने काहीतरी सांगते, मनाच्या एका श्लोकातून समर्थ काहीतरी देऊन जातात.. ! कधीतरी आपली जुनी डायरी (जे स्वतःपूरतं पुस्तक असतं) भूतकाळातलं पीस अलगद फिरवून जातात... ... "पुस्तक"... खरं तर खजिना... मी चार मोठी कपाटं हा खजिना जपून ठेवलाय... सॉर्ट...

भांडणपुराण - भाग १

बऱ्याचदा, समोरचा माणूस नेमकं काय सांगतोय, त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे कि नाही हे न विचारता, न बोलता, रॅदर न बोलू देता एकतर्फी मताने निर्णय घेऊन झटक्यात काहीतरी स्टेप घेतली जाते... आणि तितक्याच वेगात संपर्काची साधनं खंडीत केली जातात... माझं झालं - तू तूझं तूझ्याजवळ ठेव सारखं...!! वर वर दिसायला हे सोप्पं वाटलं तरी अशी लोकं सोबत ठेवणं नेहमी धोक्याचं असतं... कारण कधी काय पाऊल उचलतील हे सांगता येत नाही... एका मर्यादे नंतर त्या व्यक्तीविषयी आदर, ओलावा, काळजी संपून भिती, नकारात्मकता याच गोष्टी बळावतात आणि त्या नात्याचा प्रवास अंताकडे सुरु होतो... ... वाद घालायचेत... नक्की घाला. पण बरोबरीची संधी द्यायला हवी... म्हणजे तुझं संपलं की माझी बाजू ऐकून घ्यावी लागेल... वाद अर्धवट सोडून निघून जाणं आणि नंतर दुसरी बाजू न ऐकता निर्णय घेणं म्हणजे आत्मघातकी ठरतं ... अशी माणसं विघ्नसंतोषी असतात... प्रामाणिक तर बिलकूल नसतात.. .. वाद घालून ते निर्णायक अंतापर्यंत नेले तर त्याचं महत्व राहतं... ते पण निर्णय पक्का... धर तर धर - तोड तर तोड... विषय संपतो... निकाल लागतो ! अर्धवट, मोघम राहीलं तर आधी खदखद न...

प्रिये

#प्रिये प्रियेच्या येङ्या ट्रेंडात कुछ रंग मेरे भी.. ... १. मी तुझा कंपायलर तू माझी इरर २. मी तुझा फोर जी तू माझी जियो ३. मी तुझा सिंहगड तू माझी सारसबाग ४. मी तुझा रशोगुल्ला तू माझी बर्फी ५. मी तुझा फाफडा तू माझी जिलबी ६. मी तुझा टॉम तू माझी जेरी ७. मी तुझा पेन तू माझी वही ८. मी तुझा समुद्र तू माझी नदी ९. मी तुझा चेक तू माझी सिग्नेचर १o. मी तुझा ससा तू माझी मांजर.. ११. मी तुझा तेजा... तू माझी तेजू.... प्रिये....

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved