दानवेंना "साले" महागात पडतंय

शेतकरी रडतात साले said by रावसाहेब दानवे - भाजपा प्रदेशाध्यक्ष्य
...

दानवेंना साले महागात पडतंय... !

...

ऑफीसमध्ये पगारावर काम करणारे लोकं चिडचिड ऐकून घेत नाही... आपण कुणीही असो वा कितीही चांगले असो...!

पंधरा दिवसापूर्वी टाईट शेड्युलमध्ये एकाला असंच सुनावलं गेलं, दुसऱ्या दिवशी त्याने मेल वरुन त्याचं Resignation माझ्या तोंडावर मारलं, आणि एक महिन्याचं पेमेंट सोडून चालला गेला...

तरी मी त्याला "रडतात साले" वगैरे बोललो नव्हतो, फक्त ऑफीस अवर्स मध्ये टाईमपास करण्यावरुन सूनावलं होतं... ते पण पार्लमेंट्री भाषेत... ! 

(इथे माझं तंगडं माझ्याच गळ्यात पडलं, त्यामूळे मी ते सांगितलं नाही इतकंच...)

...

दानवे शेतकऱ्यांना नाही तर कार्यकर्त्यांना बोलले वगैरे सुरुय...

कार्यकर्ते काय दानवेंचे पगारी नोकर आहेत ? 

काहीही ऐकून घ्यायला ? 

तो माणूस त्याचा कामधंदा सोडून मागे फिरतो, काही लोकं घरी आई-वडिल, बायको-पोरांकडून बोलणे खाऊन फुकटात झेंडे मिरवतो त्याचाच तोंडावर अपमान करतात ? हे ऐकायला ? 

दानवेंचा आता जो उद्धार होतोय तो व्हायलाच हवा... कार्यकर्त्यांनीच त्यांचा माज उतरवायला हवा... !

या वाह्यात लोकांमूळेच पक्ष बदनाम होतो... !

...

पैसे घेऊन आपल्याकडे काम करणारे लोकं ऐकत नाही, त्यांची चूक असली तरीही.... !

फुकटात राबणारे कार्यकर्ते, मतदार का ऐकतील ? ते पण लोकशाहीत...

देवा... उलटी गिनती शुरु हो गयी .... लय शेकणार हे प्रकरण...

...

दुसरी बाजू : शेतकरी संघटनेच्या कुणीतरी माणसाने दानवेंची जीभ कापून आणणाऱ्याला ५ लाखाचं बक्षीस जाहीर केलंय - 

दानवेंनी माती खाल्ली... ! 

त्यांना विरोध करतांना

हे असे बावळट शेण खाताय !

चालू द्या !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved