Madhuri Dixit
माधुरी दिक्षीत आजही त्यांच्या करोडो समवयस्कांचं पहला पहला प्यार आहेत. आणि याची सुरुवात हम आपके है कौन नंतरच झाली असावी... कारण आजही हम आपके मधल्या "पहला पहला प्यार है" गाण्यातल्या त्यांच्या अदा बघून भले भले घायाळ होतात, त्यांच्या टिव्हीवरच्या त्या नजरेलाही नजर भिडवू शकत नाहीत. uuimaaa सोबत... त्या पूर्ण सेगमेँटमधला त्यांचा अॅपिअरन्स लाजबाब आहे.
.
दिग्दर्शक सूरज बडजात्याने तो सेगमेँट जीव ओतून अप्रतीम घडवलाय. निशा आणि प्रेमच्या प्रेमाची गोड सुरुवात होते. मूकेपणे मंद प्रकाशात दोघांच्या नजरेने ते प्रेम फुलत जातं. त्यातला त्यांचा साधा आणि लाईट मेकअप, कर्ल हेअर्स, बोलके डोळे, साजेसं कॉस्ट्यूम आणि घायाळ करणाऱ्या नजरा सौँदर्याला चार चाँद लावतात. अप्रतिम सौँदर्य, अवखळ तारुण्य आणि
बॅकग्राऊंडला बालसुब्रमण्यमच्या आवाजातला अंतरा
"उसकी नजर, पलको कि चिलमनसे मुझे देखती...."
- माधुरी दिक्षीत याच क्षणी सुपरस्टार होते, आणि तिच्यावर करोडो जीव कुर्बान होतात...
.
डान्सर म्हणून माधुरी दिक्षीतांना तोड देणारं कुणीही नसेल... जिथे सैलाबच्या "हम को आजकल है..." वर कोळ्यांच्या कॉस्ट्यूम्समध्ये माधुरी दिक्षीत जितक्या दिलखुलास नाचतात, देवदासच्या डोला रे डोला मध्ये क्लासिकल स्टेप्सही तितक्याच आत्मियतेने करतात...
केवळ त्यांच्या डान्समूळे हिट झालेली खूप गाणी आहेत...
देवदास, सैलाब, राजा, मै कोल्हापूरसे आयी हू, हम आपके है कौन, आजा नच ले... केवळ त्यांच्या डान्सचे हिट आहेत...!
..
सौंदर्य, परफेक्शन, आणि आत्मियता या त्रिसूत्रीच्या जोरावर माधुरी दिक्षीतांनी एका पेक्षा एक दर्जेदार चित्रपट दिले... अवखळ तरुणी ते कुमारी माता, गुलाबी गँग ते कोठेवाली अश्या भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या, खूलवल्या आणि त्यांना न्याय दिला...
साजन, बेटा, खलनायक, अंजाम, रोजा, याराना, दिल तो पागल है, पूकार, लज्जा, दिल, अश्या अनेक सूपरहिट चित्रपटांना माधुरी दिक्षीतांनी आपल्या अभिनय, नृत्य आणि आवाजाने साज चढवला...
.
सूपरस्टार असून खऱ्या आयुष्यातही मर्यादेत राहणाऱ्या माधुरीजींचं संजय दत्त बरोबर असलेलं नातं मात्र चर्चेत आलं. पण कौटूंबिक मतभेद, संजय दत्तचे गुन्हेगारी संबंध यामूळे त्यांनी ते वेळीच संपवलं आणि डॉ. श्रीराम नेने यांच्यासमवेत सौ. नेने म्हणून अमेरीकेत सामान्य आयुष्याची सुरुवात केली.
..
आमच्या आधीची एक अख्खी पिढी खुलवणाऱ्या, त्यांचं पहिलं प्रेम असणाऱ्या, लाखोँच्या मनात राहणाऱ्या मराठमोळ्या पण सूपरस्टार अभिनेत्रीच्या आयुष्याचा आज सुवर्णमहोत्सव (५०) !
निसर्गनियमाने वयोपरत्वे वृद्धत्वाकडे झुकत असल्या तरीही त्यांच्या समवयस्कांसाठी त्या "माधी"च राहतील...
त्यांचं सौंदर्य, अभिनय, नृत्य हे चिरंतन आहे... !
बॉलीवूडच्या शुक्रतारा - माधुरी दिक्षीत नेने यांना सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा !