Posts

Guru... Guide...

Image
= गुरु = जन्माला आल्यापासून आपला प्रवास शेवटाकडे सुरु असतो... हा प्रवास जितका आनंदाचा, तितकाच खडतर ! गुबली बूबली करून एक गाल ओढून भलं मोठ्ठं हसू आणणारा तर त्याचवेळी दुसऱ्या गालावर खाsडकन मारणारा... नक्की काय सुरुय हे आपल्याला उमजतही नसतं, ... मंजील कहा - कहा रुकना है... काहीच माहीत नसतं... पण तरीही हा प्रवास सुरू असतो. अखंड... असंख्य अडचणी झेलत, त्यातून वाट काढत, सहज होत असतं सगळं ! कुठून येतं इतकं बळ ? कोण देतं इतकी अक्कल ? कोण आपली नौका पार लावतं ? ... जिथे आपलं विचार करणं थांबतं, मर्यादा येते - कड येतो तिथे मार्ग दाखवायला निसर्गाने एक अद्भूत शक्ती निर्माण केलीय, गुरु ! आपला रस्ता दूरपर्यंत असतो, त्या प्रवासात मार्गदर्शन करतो अशी व्यक्ती किंवा शक्ती... आपलं बळ, आपली अक्कल, आपले विचार, आपल्या संकटकाळी वाट दाखवणारे आणि चूक झाली तर दोन झापड कम तडाखे लावणारे गुरु...! आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, बायको, मित्र-मैत्रीण, बालवाडीत शिकवलेल्या बाई ते पीएचडी गाईड, गाणं शिकवणारे गुरु, भौतीक ज्ञान देणारे शिक्षक हे प्रत्येकालाच लाभतात. कुणी क्षणोक्षणी तर कुणी गरज असतांना आपलं काम करतात, ते दा

Ashadhi Ekadashi

आजचा दिवस विठ्ठलाचा ? बिलकूल नाही... हा दिवस वारकऱ्यांचा, त्यांच्या प्रामाणिक निष्ठेचा... गाढ विश्वासाचा... अगम्य इच्छाशक्तीचा... ! आजचा देव पंढरपूरातल्या त्या गाभाऱ्यात भेटणारच नाही... तो चंद्रभागेच्या पाण्यात डुबकी मारतांना भेटेल पंढरीतल्या रस्त्यांवर बेभान नाचतांना भेटेल कुठे दर्शन रांगेत उभा दिसेल त्या वारकऱ्यांच्या सोयीकरता अन्न-पाणी वाटतांना दिसेल... तोच देव उद्यापासून पंढरपूरचे रस्ते, मैदानं स्वच्छ करतांनाही दिसेल... त्या पोलीसांमध्येही तो आहे... विठ्ठल आज पंढरपूरच्या चराचरात आहे.. विठ्ठल आज वारकऱ्यांत आहे... तिथेच रमलाय ...! - तेजस कुळकर्णी

GST 2

जीएसटी बद्दल खूप संभ्रम आहेत, आमच्या सारख्या छोट्या उद्योजकांची पुरती कोंडी झालीये, CA म्हणतात अजून काही सांगू शकत नाही १ जुलै नंतरच सगळे चित्र स्पष्ट होईल.... .. ह्यात कसली आलीये गोपनीयता ?? टॅक्स भरणाऱ्यांना कळायला नको का तांत्रिक बाबी ? परवा एका कार्यक्रमात भाजपचे राज पुरोहित म्हणाले की विश्वास ठेवा मोदी सगळे चांगलेच करणार आहे. विश्वासावर टॅक्स प्रणाली चालते ??  .. नोटबंदीवेळी झाला त्यापेक्षा भयाण आणि जास्त गोंधळ उद्यापासून होईल...  . याहीपेक्षा वाईट घडणारी गोष्ट म्हणजे संघराज्य व्यवस्था, राज्यसरकारे, महापालिका आर्थिकदृष्ट्या केंद्राच्या ताब्यात जातील... स्पष्ट शब्दात सांगायचं तर भिकारी होतील.. आपण जो टॅक्स भरू तो केंद्रात जाणार - तिथून राज्यांना ग्राहकसंख्येवरुन तो देण्यात येईल... केरळ, उत्तर प्रदेश आणि बंगाल यांना जास्त वाटा मिळेल... थोडक्यात मी महाराष्ट्रात राहतो - पुण्यात चित्रपट पाहीला त्यावर १८ टक्के टॅक्स भरणार, तो टॅक्स पुण्याच्या नाही तर यूपीच्या रस्त्यावरचं खड्डं बुजवणार... महाराष्ट्र बसणार केंद्राकडे दे माय करत... ! . अप्रत्यक्ष्य परीणाम नागरी विकासकामं... शेवटचा घटक ग्र

GST And Confusions

Image
जीएसटी बद्दल बराच गोंधळ आहे, सामान्य नागरीक राहीले ठिकाणावर, छोट्या मोठ्या कंपनीचे सीईओ (ज्यांना जास्त मार पडणार आहे...) सीए,सीएस सुद्धा गोंधळलेले आहेत... नेमकं प्रकरण काय हेच उमजत नाहीय, जो तो भलतेच तारे तोडतोय... पण १ जुलैपासून, नोटबंदी वेळी झाला सेम गोंधळ होईल... स्पेशली "ग्राहक" वर्गाची वाट लागणार आहे... दुकानदार आणि सर्व्हीस प्रोवायडर जीएसटीच्या नावाने काहीतरी बरळून तथ्य नसलेले चार्जेस वाढवतील, आणि जीएसटीबद्दल अक्कल नसल्याने ग्राहक लूटले जातील... कृत्रीम महागाई निर्माण झाली की रोजच्या रोज मोदी-जेटली उद्धारस्तोत्र तय है .... एकुण प्रकरण काय हे उमजत निदान वर्ष-दिडवर्ष जाईल, तोपर्यंत १ जुलै २०१७ ते १५ जुलै २०१७ दरम्यान सेट झालेल्या किमतीच कायम राहतील... खुलेआम एमआरपी शंभरची वस्तू ११८-१२० ला विकली जाईल... पुढची दिड वर्ष हा छूपा भ्रष्टाचार १०० टक्के होत असेल... ... ज्याला जीएसटी पूर्ण उमजलंय त्याने या गोंधळाचा फायदा घेऊन हात नाही धुतले तर त्याचा भारतरत्न देऊन गौरव करावा इतकं महान कार्य ठरेल... .. बाकी जर जास्त गोंधळाचं प्रकरण झालं तर डोन्ट माइंड, जेटलीमूळे २०१९ ला

HitlarKaka

सोसायटीत काही लहान मुलं क्रिकेट खेळत होती... खेळता खेळता छोटाश्या कारणाने भांडण झालं... एकमेकांच्या गचांड्या पकडून पार पटकून पटकून आपटणं सुरु होतं... दे दणादण... . इतक्यात बर्वे काका आले... बर्वे काकांचा सोसायटीच्या लहान पोट्याहोत कड्डक दरारा... त्यांना पाहीलं की पोरं जागा मिळेल तशी धूम ठोकतात... काका नजरेस पडताच बाकीची टिम गुल... आणि स्वत:च्याच तंद्रीत प्रदीर्घ भांडत असलेल्या दोघांपैकी एकाचं लक्ष तिकडे गेल्यावर "हिटलर काका आले... पळ" म्हणत एका क्षणात धूम ठोकली... आणि दुसऱ्‍यानं आऊटहाऊसमागे लपण्यासाठी एकमेकांना कव्हर केलं... काही क्षणांपूर्वी यांच्यात महायुद्ध रंगलं होतं, अशी शंकाही येणार नाही...!! . लयीच भारी... अश्या भन्नाट लहान लहान घटना मोराच्या जादुई पिसासारखं बरंच काही करुन जातात... :-):-):-)

HajiAli

Image
बरीच स्थानं आहेत जी आशिर्वाद देतांना हिंदू मुस्लीम बघत नाहीत... मनापासून केलेली प्रार्थना तिथे फळाला येते... काही अनुभव येतात आणि ती स्थानं श्रद्धास्थानं होतात... ! "दरगाह" हे मुस्लीम पंथाचं जागृत स्थान... मुस्लीमच नाही तर हिंदू धर्मीयही मनापासून दरगाह समोर नतमस्तक होतात... ! .. "हाजीअली" हे माझं श्रद्धास्थान... मी तीन ठिकाणं माझं घर समजतो... हक्काचं स्थान असावं असं... ! एक : गाणगापूर, दोन : शेगांव आणि तिसरं मुंबईतला हाजीअलीचा दरगाह... ! . दरगाह हे मूळातच जागृत असल्याची प्रचिती अनेक घटनांतून मिळालीय... हाजीअलीच नाही, तर इतरही अनेक... ! धुळ्यात आमच्या घराशेजारी एका पडक्या वाड्यात दरगाह होता... तिथे ते पिरबाबाका ठाणा म्हणून प्रसिद्ध आहे. पण वाडा पडला तसं ती जागा दुर्लक्षित झाली. वाड्याच्या ढिगाऱ्यात दाबली गेली. नंतर तो वाडा विकत घेऊन टॉवर बांधायचे प्रयत्न अनेकांकडून झाले, पण काहीतरी व्हायचं आणि काम बंद पडायचं... पाच वर्षांपूर्वी एका माणसानं तो घेतला, आधी तो दरगाह शोधून त्याचं व्यवस्थित बांधकाम केलं... एक फकीर सेवेसाठी ठेवला. नंतर त्याचं बांधकाम कुठल्याही अडचणीशिवा

Cinematic Wedding

लग्नाची Cinematic फोटोग्राफी, व्हिडीओ फील्म तयार करण्याच्या नादात मूळ गाभा हरवतो... आणि Artificial क्षण तयार करण्यासाठी खऱ्या क्षणांशी छेडछाड होते... ! एका मित्रानं तीन लाख रुपये खर्च करून सिनेमॅटीक व्हिडीओ फिल्म तयार केली... ती दाखवली... त्यात बरेच एक्स्प्रेशन्स होते, पण नॅचरल वाटत नव्हते, .... यासाठी दोनदा रिटेक घेतला, बाबांना रडायची अॅक्टींग जमत नव्हती एकदा मंगळसूत्र घालतांना नीट एक्स्प्रेशन्स आले नाही म्हणून दोनदा घालावं लागलं .. फोटोतूनपण बऱ्याच गोष्टी एक तर गायब, किंवा ओव्हर इफेक्ट्सनी डेकोरेट केलेल्या... सगळं छान, पण बरंच मिसिंग होतं.. लग्नसोहळा नाही, तर चित्रपट वाटलं ! . त्या मित्राला घोड्यावर बसतांना खूप धडपडावं लागलं.. ते प्रकरण गाजलं... कुजबूज / चर्चा / मस्करी झाली... पण तो अख्खा सिन त्या वेडींग फिल्ममधून गायब ... त्या लग्नाची आयडेंटीटी ठरावी अशी गोष्ट... ! Its not a commercial movie... इथे सगळं चालतं, तेच हवं असतं... . मूळात लग्न/मुंज हा सोहळा आहे, त्या सोहळ्यातले प्रत्येक क्षण जगायचे, आणि कुठलाही Artificialness न ठेवता साठवायचे यासाठी फोटोग्राफी... त्यात येणार

Happy Birthday ABP Majha

Image
Happy Birthday ABPMajha २४ तास बातम्या देणारं पहिलं मराठी न्यूज चॅनेल स्टार माझा बरोब्बर दहा वर्षांपूर्वी सुरु झालं. सहज भाषा, आकर्षक आऊटलेट, आपले वाटणारे विषय आणि २४ तास मराठी बातम्या या बळावर न्यूजचा राजा या बिरुदावर स्थिरावलं... ! स्टार माझाचं एबीपी माझा झालं.. दरम्यान शेकडो चॅनेल आले - गेले... पण एबीपी माझाचा आपलेपणा कुणाकडेही नव्हता... ! . तळागाळात पोहचलेलं नेटवर्क, खात्रीदायक बातमी, ओरडणं नाही, आदळ आपट नाही, आकांड तांडव नाही आणि इगो अॅटीट्यूड नसलेली भाषा आणि बातमीच्या मूळापर्यंत पोहचलेले - सामान्य माणसांत रमणारे प्रतिनिधी ही एबीपी माझाची ओळख झाली. पाणी, हुंडा, विज्ञान, धर्म, व्यवसाय उद्योगधंदा, करीयर, संस्कृती, शेती, दुष्काळ यांवरच्या अभ्यासपूर्ण ग्राऊंड रिपोर्टस् सह बाप्पा माझा, देव माझा, दिंडी, जत्रा सारखे धार्मिक कार्यक्रम, निवडणूक वारी, माझा कट्टा, माझा चर्चा सारखे टॉक शो, महाराष्ट्र देशा, मुंबई इस्ट वेस्ट, माझा एक्स्प्रेस सारखे न्यूज शो आणि घे भरारी, खेळ माझा, ढँड्टॅढॅन सारखे मनोरंजनाचे शो असे एक से एक दर्जेदार कार्यक्रम देशभर लोकप्रिय झाले...! एबीपी माझा महाराष्ट्राचं,

Cricket Legends

जम्बो (अनिल कुंबळे) द वॉल (राहूल द्रविड) दादा (सौरव गांगुली) VVस्पेशल (व्ही.व्ही.एस लक्ष्मण) मास्टर ब्लास्टर (तेंडूलकर सचिन) .. दुसऱ्या गृप मध्ये विरेंद्र सेहवाग गौतम गंभीर हरभजनसिंग युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनी .. बीसीसीआयला वरचे पाच देव नशीबानं मिळाले, आणि त्यावर बोनस खालचे पाच ! ही दहा नावं एकदाच झाली, शेवटची ! यांच्यासारखे पुन्हा होणार नाही ... अशी पंचकं सारखी होत नाहीत... भारतीय टिम हे असतांना जगजेत्ती होती... ! ... आपल्याकडे वरचे पाच होते तसे ऑस्ट्रेलियन टिममध्येही एक भारी सिक्सर होतं .. रिकी पाँटींग अॅडम गिलक्रिस्ट मॅथ्यू हेडन शेन वॉर्न मॅक्ग्रा आणि ब्रेट ली .. हे जोपर्यंत होते, येलो जर्सीला बघून भलेभले टरकायचे ... ! .. पाकीस्तानचेही, इंजमाम उल हक शोऐब अख्तर कामरान अकमल यूनिस खान ही चौकडी होती.. .. श्रीलंकेकडे सनथ जयसूर्या माहेला जयवर्धने मुरलीधरन कुमार संगकारा चामिंडा वास हे पंचक होतं ! .. विंडीजची जोडी ब्रायन लारा क्रिस गेल ... खरं क्रिकेट, टफ फाईट वगैरे तेव्हाच होतं.. क्रिकेटचा सूवर्णकाळ होता ! ही टिम संपली आणि क्रिकेटचा आत्मा

President Election नांदी !

Image
राष्ट्रपती निवडणूक २०१७ चा शंख निवडणूक आयोगानं फुंकलाय.... राष्ट्रपतीपदाच्या संभाव्य लढतीत जी नावे समोर आली ती किती पात्र किती नाही हा भाग वेगळा, पण - अमिताभ बच्चन, रतन टाटा या मंडळींपैकी कुणीही होवू नाही... ! त्यांना संविधानाचा गंध नाहीय... राष्ट्रपतीपदाची जबाबदारी काय हे शिकतच पाच वर्ष पूर्ण होतील... प्रतिभा पाटील बाईंसारखी गत होईल... खाया पिया कुछ नही ग्लास तोडा बाराना... किंवा घेणं न देणं फुकटचं कंदील लावून येणं... वेग्रे ! . लालकृष्ण अडवाणी एक योग्य आणि अनुकूल नाव आहे... ! अनुभवी सुद्धा ! भाजपा मध्ये त्यांचं योगदान बघता त्यांचा यथोचित सन्मान करण्याची ही योग्य संधी आहे . सुमित्रा महाजन सुद्धा त्या ताकदीच्या आहेत, पण त्या संसदेत असणं आधिक फायद्याचं आहे, जनरल सिंग, सुषमा स्वराज सुद्धा. ही मंडळी संसदेची ताकद आहे... त्यांनी या टर्मला राष्ट्रपती पदाच्या भानगडीत न पडणंच ठिक... ! .. अजित डोवाल हे एक तगडं नांव आहे... राष्ट्रपती डोवाल, मोदी पीएम, स्वराज परराष्ट्रमंत्री हे त्रिकूट पाकीस्तान - चीनचं ब्लड प्रेशर वाढवू शकतं... ! .. द्रौपदी मूर्मू (आदीवासी चेहरा) आणि थावरचंद गहलोत ही

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved