Posts

RIP जेटली

Image
सुषमा स्वराज, पर्रीकर, मुंडे, अनंथ कुमार, प्रमोद महाजन आणि आज जेटली ! भाजपाचे हे चेहरे कमी वयात गेले... सगळे एकापेक्षा एक विद्वान, प्रकांड पंडीत असलेले... ! त्यांच्या निधनाचं दु:ख झालं कारण त्यांचे पाय जमीनीवर होते. ते तत्वाने जगले... ! भाजपाच्या जडणघडणीत या मंडळीँनी आयुष्य वेचलंय... संघाची बळकट माणसं होती ही. . अर्थमंत्री आणि मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स म्हणून जेटलींचे काही निर्णय वैयक्तीक न पटणारे होते. पण तो एक भाग सोडला तर त्यांची विद्वत्ता, वत्कृत्व, भाजपाच्या वरच्या फळीतलं नेतृत्व आणि कायद्याचं ज्ञान याला तोड नाही... संसदेत बोलायला उभे राहीले की विरोधकही बेँच वाजवायचे... ! कॉँग्रेसच्या बऱ्‍याच नेत्यांची मुलं जेटलीँकडे इंटर्नशीप केलेली...! ते कायद्याचं विद्यापीठ होते. मोदीँनी नोटबंदी, जीएसटी, बॅँक मर्जीँग असे भव्य निर्णय जेटलींच्या भरवश्यावर घेतलेय. जेटली भले मास लिडर नव्हते, पण भाजपाचं पान त्यांच्याशिवाय हलणारं नव्हतं. . अरुण जेटली भाजपासाठी थिँक टॅँक होते. भाजपाची इंटलअॅक्च्यूअल प्रॉपर्टी होते... भाजपाच्या मूळ तत्वाचा चेहरा अरुण जेटली होते... ! भाजपासाठी ते संकटमोचक ह...

वरची रेषा मोठी करण्यासाठी खालची रेषा लहान काढावी लागते

Image
एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल किँवा निवड करण्यात गडबड होत असेल तर साधं आणि सोप्पं काम करावं - त्यापेक्षा वाह्यात गोष्टीचा अनूभव घ्यावा... मी अनेकदा असं ट्राय केलंय... . बायकोला गोरेगांवला आवडत नव्हतं. काही ना काही कमी वाटायचं... माझं ऑफीस अंधेरीत, आणि आधीपासून सवय वेस्टर्नची आहे त्यामूळे मी शक्यतोवर वेस्टर्नलाच राहण्याचा ट्राय करतो... मागचा पुर्ण आठवडा तिला फिरवलं... नालासोपारा, वसई रोड, विरार पर्यँत. सेँट्रल लाईनला उल्हासनगर, बदलापूर वगैरे, नवी मुंबईत पनवेल पर्यँत... आता  गोरेगांव आमच्यासाठी स्वर्ग झालंय  :-D . मी स्वत: पुणे की मुंबई अश्या निवडीत अडकलो होतो. तेव्हा एकीकडे मुंबईतल्या इंडस्ट्रीचे फोटो लावले आणि दुसरीकडे पुण्यातल्या मंडईचे... मला तिथली टिपीकल कचकच आवडत नाही. त्यामूळे मुंबईची निवड मला सहज वाटली. . करंट अकाऊंट महाराष्ट्र बॅँकेत उघडावं की नको याच्या विचारात होतो. मी एक दोनदा एसबीआय जावून आलो. आता महाराष्ट्र बॅँकेत अकाऊंट आहे. . गाडी घेवून ऑफीसला जायचं नाही... बाईकवर मस्त वाटतं. .. मनात फूटबॉल सुरु होतं... त्यामूळे रोजच्या ट्रॅकवर मुद्दाम ट्राफीकच्या वेळेला गेलो...

= बहीण =

काही गोष्टीँना रक्ताच्या नात्याचं कंम्पलशन नसतं... ते कुठेही फुलतं, घट्ट होतं... टिकतं... काही नाती अशीच आयुष्यात आली, बहरली... रक्ताच्या नात्यांइतकीच ती नाती घट्ट झाली... कदाचित कणभर जास्तच ! . ही नाती कुठे जुळली कशी जुळली हे आता निट आठवतही नाही... पण वीण घट्ट आहे. . पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्या वडीलांची ट्रिटमेँट सुरु होती आणि त्यात कुठलीशी फॉर्म्यालिटी करण्यासाठी ओळख हवी होती. तिचा मला फोन आला, फॉर्म्यालिटीज पुर्ण झाल्या. पुढच्या रक्षाबंधनाला राख्या आल्यात. वैयक्तीक नातं कौटूंबिक झालं... ! ७ वर्षाँपासून आता दर रक्षाबंधनाला राख्या येतात. दर आठवड्याला फोन येतात. तिला माझ्या घरी सख्ख्या मुलीप्रमाणे समजतात... तिच्या नवऱ्‍याविषयी सख्या मेव्हण्यासारखा आदर वाटतो... सख्खी मोठी बहीण असती तर तिने जो जीव लावला असता तोच सायलीदिदी लावतेय... ती कुणालाही सांगतांना तिला तीन भाऊ असल्याचं सांगते...! नशीबानं मिळतात काही गोष्टी.. !. . मयुरी-वर्षा... नाशिकच्या दोघी बहीणी. कुठे ओळख झाली, कधी झाली आठवत नाही... राखीसाठी येतात, भाऊबीजेला येतात. कुटूंबही एकमेकांशी दुधात साखर एक व्हावी तशी झाली.....

सुषमा स्वराज

Image
जाणारं माणूस जातं, नंतर उरते ती भयाण शांतता. अनेक प्रश्नांचं काहूर मनात साचत जातं - ज्यांची उत्तरं कधीही मिळत नाहीत ! सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं देश हळहळला. पण आज एका माणसावर नियतीने जो घाला घातलाय त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. . ते म्हणजे सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल ! . निवडणूकांपूर्वी जेव्हा सुषमाजीँची मुलाखत झाली तेव्हा त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देतांना "आता माझा पुर्ण वेळ पती, कुटूंबिय यांना देणार" असं जाहीर केलं. ट्विट पण होतं. त्यावेळी त्यांचे पती तिथे होते. प्रचंड आनंद होता त्यांच्या चेहऱ्‍यावर... त्यांनी सुद्धा ट्विट, टिव्ही यांना मुलाखत देऊन आपला आनंद व्यक्त केलेला. . केँद्रात मंत्री असणारी पत्नी - त्यामूळे समाजकारणाभोवती केँद्रीत झालेला संसार, प्रोटोकॉल्स, शेड्यूल यांत कौटूंबिक गोष्टीँचा त्यागच करावा लागतो. सुषमा स्वराज यांच्या राजकीय निवृत्तीने त्या माणसाला मनापासून आनंद झालेला. राजकारणामूळे हरवलेल्या क्षणांना परत मिळण्याचं सुख त्यांच्या चेहऱ्‍यावर दिसत होतं. . नियतीला ते बघवलं नाही. आत्ता तर संसार सुरु झालेला, इतक्यात संपला ! कालचा दिवस...

370 - 35 A

Image
लोकसभेत कॉँग्रेसच्या सदस्यांनी आत्ता परत फारुख अब्दुल्ला बद्दल बाउंन्सर टाकला... अमित शहांनी चौथ्यांदा अधिकृत स्टेटमेँट दिलं... की फारुख अब्दुल्ला जेल, नजरकैदेत नाही. त्यांची तब्येत पुर्ण ठणठणीत आहे - ते बाहेर येत नाही तर कनवटीवर बंदूक लावून तर बाहेर आणू शकत नाही... जर आजारी आहेत तर हॉस्पीटल मध्ये जावं..."... . स्पिकर ओम बिर्ला सुद्धा भारी माणूस आहे. ओठांवर आलेलं मिश्कील हसू दाबत त्यांनी अमित शहांना चेअर कडूनच निर्देश केलं... "डॉक्टर्सकी टिम बनाकर आप फारुख अब्दुल्लाजी के घर  भेज दो, और जानकारी लो..." . झालं ! ये लगा सिक्सर... कॉँग्रेसचा नो बॉल ठरला.  :-D फारुख अब्दुल्लाचं देणं न घेणं झालं बेणं...! आता बाहेर यावं लागणार, स्टेटमेँट द्यावं लागणार ! नाही दिलं तर सभागृहातल्या त्यांच्याच सदस्यांच्या तोँडावर मारलं जाणार... तब्येत खराब बोल्ले तर डॉक्टर तयार, आता कॉँग्रेसच्या सदस्यांना फारुख अब्दुल्लाच्या नावाचा वापर करता येणार नाही... :-D . नाक दाबून तोँड उघडणं काय असणं ते असं असतं ! 

कॅप्टन कूल

Image
आज एका माणसाची महत्वाच्या क्षणी निर्णायक संयम भूमिका राहिली. सभापती, उपराष्ट्रपती वैकय्या नायडूजी ! . आज दुपारच्या सत्रात सभागृहात आल्यानंतरही त्यांनी आपण या महत्वाच्या विषयावर असलेल्या चर्चेत समोर नसण्याबद्दल खेद व्यक्त केला... जबाबदारी याला म्हणतात... केवळ संचालन करणं एवढंच नसून प्रत्येक सदस्याच्या आधिकाराचा मान ठेवत, शब्द न शब्द ऐकून त्यावर नियंत्रण ठेवणंही महत्वाचं असतं... कुठे महत्व द्यायचं कुठे नाही - यावर ते पक्षपात न करता निर्णय देतात. सिब्बलने काहीतरी पुड्या सोडल्यान ंतर उजवीकडच्या सदस्यांनी गोँधळ घालायला सुरुवात केली. त्याला महत्व न देता - "दो मिनट मे संविधात बदल नही जायेगा, मै यहॉँपे बैठा हूँ... क्या रिकॉर्ड मे जायेगा ये मै देख रहा" म्हणत प्रकरण शांत तर केलं, पण एकाच वाक्यात सिब्बलची हवा सोडली... ! . खमका मॉनीटर असला तर वर्ग ठिकाणावर राहतो. सकाळी गोँधळ सुरु झाला, त्यात मुर्दाबादच्या घोषणा, रडणं यांतही खमकेपणे सभापतीँनी एक बाजू लावून धरली. पीपीडीच्या दोघांनी कपडे फाडल्यानंतर त्यांना उचलून बाहेर फेकलं... ! . रेणूका चौधरी हसल्यानंतर याच माणसानं कडक शब्दा खडसावलं हो...

370 and 35A

Image
अमित शाह - नरेँद्र मोदी भारतीय संघराज्याला मिळालेले खऱ्‍या अर्थाचे रत्न आहेत ! भारत आज एकसंघ होतोय. आर्टिकल १ आज खऱ्‍या अर्थाने प्रबळ झालं...! काश्मीर भारताला मिळालं. . ३७० (काही जाचक कलमं) रद्द झालं... त्यामूळे ३५ए आपोआप निष्क्रीय ठरलं. त्यात काश्मीरचं विभाजन होवून लद्दाख-जम्मू, वेगळं राज्य झालं. काश्मीर वेगळं राज्य झालं. तिथे केँद्रशासन लागू झालंय... ! सगळाच मामला निकाली निघाला. काश्मीरमध्येही आता भारतीय राज्यघटना लागू झाली. केँद्रशासित असल्याने सगळ्या नाड्या आपोआप मोदी सरकारच्या हाती आल्यात...! . तिथे आता पाकीस्तानच्या घोषणा देणाऱ्‍यांची तोँड बंद करण्याचं षडयंत्र मोदी सरकाने रचलंय  :-D   :-P  णिशेद  :-D . आज नेहरुंच्या अतिअतिअति परम परम परम पवित्र आत्म्याला खऱ्‍या अर्थाने शांती मिळेल. हे यश नेहरुंचं आहे...  :-P   :-D  अब्ब्दुल्ला आणि मुफ्ती खानदानाच्या कारकिर्दीची सुदैवी अखेर झाली... हे यश नेहरुंचं आहे  :-D   :-D   :-P . धन्य ते काश्मीर, धन्य ते नेहरु, धन्य त्या सोनीयाजी...  :-D  

House in Metro

मोठ्या शहरात (उदा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे) भाड्याचं घर चांगलं की स्वत:चं ? हा एक प्रश्न समोर आला. आणि दुसरं म्हणजे गोरेगांवची एक बिल्डीँग पडल्यावर जमीनीचं खरेदीखत न केल्याने बिल्डरनं पुन्हा बांधून न देत हात वर केल्याची, आणि त्यामूळे अनेक कुटूंब उघड्यावर आल्याची एक बातमी वाचली... तसंच कॅम्पाकोला बद्दलही झालं होतं... . करायचं काय ? यासाठी मी स्वत:चा एक ट्रॅक तयार केलाय. पटतोय कां बघा. . आधी प्रश्नाच्या पहिल्या भागाचा विचार करु... भाड्याचं घर हवं की स्वत:चं ? तर याबद्दल माझं मत आहे... प्रॅक्टीकली भाड्याचं, इमोशनली स्वत:चं...! . स्वत:चं घर घेतांना शक्यतोवर संपुर्ण रक्कम (किमान ८० टक्के तरी) तयार असली तरंच स्वत:चं घर घेण्याचा विचार करा... किँवा फार फार तर ईएमआय आपल्याला खरंच झेपेल असा असेल तरंच... ! ते सुद्धा वेळ आल्यानंतर. योग्य पद्धतीने. (याच लेखात दिलंय ते) . भाड्याच्या घराचे काही टेँशन्स नसतात... आणि महत्वाचं म्हणजे ते हवं तेव्हा बदलता येतं. आपल्या सोयीने त्यात आधीक ऐमिनिटीज् अॅड करता येतात. शहरात आल्यानंतर किमान काही वर्ष सेट होईपर्यँत तरी शहाण्याने स्वत:चा फ्लॅट घेण्याचा विचार करु ...

= संडे ज्ञान =

Image
आपल्या आजुबाजुचे लोक - नातेवाईक, ओळखीपाळखीचे आणि तत्सम टाईप लोक्स... . यात दर ३ मागे १ व्यक्ती नग टाईप असतो... तोँडावर इतकं गोड बोलतात, वाटतं - आता आपले पाय धुवून पाणी पितात की काय... तेच आपल्या मागे आपल्याबद्दल गॉसीपीँग, त्रागा, याने अस्संच केलं, तस्संच केलं बडबड... आणि आपलं वाईट कसं होतं हे पाहत किँवा ते करुन आनंद मिळवण्यात त्यांची जय असते... अशी उपद्रवी टाळकी मॅक्स आपल्या विरुद्ध गृप्स करुन राहतात... . बऱ्‍याचदा अश्या टोळक्यांचा उपद्रव आपल्याला कळत असतो... पण आपल्याला कळतंय हे त्यांना कळलेलं नसतं... त्यामूळे त्यांच्याशी वागण्यात आपण जरासं टाईट केलं तरी त्यांचं गडबडतं... . बायकोनं विचारलं... ए आहो, हाऊ टू डिल विथ धिस काईँड ऑफ पिपल्स ? टेँशन नाट - याद रखीयो - १. गॉसीपीँग करणारे जळतात, कारण त्यांचं स्टॅँडर्ड (वैचारिक, शैक्षणिक) आपल्या लेव्हलचं नसतं... २. आपल्या बद्दल गॉसीप्स, म्हणजेच आपल्याला महत्व आहे. ३. टोळके जमवून आपल्याबद्दल बोलतात, म्हणजे आपण एकटेच त्या टोळक्याला भारी पडलोय. ४. महत्वाचं - ते लोक्स आपल्याला जेवायला देत नाहीत. सो यूनिवर्सल मूलमंत्र- लेट देम गो टू द हेल ! बी हॅप्पी...

व्यवसायात भेटणारे नग

. ओळखीचं कुटूंब एका कौटूंबिक सोहळ्यात भेटलं... त्यातल्या काकांशी ओळख तशी जुनी. काकू पहिल्यांदाच भेटल्या. त्यांचा एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा वयाने १० वर्ष मोठा. ज्याने काहीतरी प्रोजेक्ट केलाय...! असा एकूण बॅकग्राऊंड - आता काकू आणि त्यांचा मुलगा "नग" कसे झाले याची ही कहाणी. . कौटूंबिक सोहळ्यात भेटल्यावर कसं काय याची विचारपूस झाली आणि काकूंनी त्यांच्या मुलाची ओळख सांगितली. त्याने कुठलातरी ग्राफीक्स मध्ये प्रोजेक्ट केलाय... तो मुलगा त्यावेळी तिथे नव्हता. त्याला स्टार्टअप करायचंय, आणि अॅज अ इस्टॅब्लीश्ड् सेटअप तू त्याला मदत कर - इति काकू. व्यवसाय, शिक्षण किँवा नोकरी यासाठी ज्याला मदत हवी त्याला माझ्याकडून शक्य ती (आर्थिक : क्षमस्व) मदत करायचा मी प्रयत्न करतो. त्यात कधी कधी चांगले प्रोजेक्टस मलाही मिळतात - अर्थातच व्यवसायिक फायदा होतो. प्रामाणिक मदत करतो, बाकी ज्याचं त्याचं तो जाणे. . तर, काकूंनी त्यांच्या मुलाला मदत करण्याबद्दल सांगितलं... मी त्या धावपळीत माझं कार्ड दिलं. आणि त्याला फोन करायला सांगा, किँवा मुंबईला ऑफीसला पाठवा म्हणून बोललो. . दोन दिवस गेले, काकूंचा फोन आला. - मी ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved